Saturday, 29 May 2021

महिला रुग्णालयात स्त्री जन्माचे स्वागत.. अनोखी परीच्या वाढदिवसानिमित्त कपडे वाटप..

महिला रुग्णालयात स्त्री जन्माचे स्वागत.. अनोखी परीच्या वाढदिवसानिमित्त कपडे वाटप..

उस्मानाबाद :- महिला रुग्णालयात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांनी त्यांच्या मुलीचा अनोखी परीचा वाढदिवस जिल्हा शासकीय स्त्री रग्णालयात स्त्री जातीच्या जन्मलेल्या बाळाला नवीन कपडे व जन्म दिलेल्या बाळाच्या मातेला गुलाब पुष्प देऊन स्त्री जन्माचे स्वागत या सदराखाली साजरा करण्यात आला.गेल्या वर्षी याही वर्षी कोरोना जैविक विषाणुच्या महासंकटात हा कार्यक्रम शासनाच्या नियमानुसार घेतला.. 'काहीजण आजही मुलगी जन्माला आल्यानंतर नैराश्य,नाराजीचा सूर आरवतांना दिसताहेत,हि मनोवृत्ती बदलली पाहिजे,स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,बेटी बचाओ बेटी पढाओ ही भावना मनात बाळगली पाहिजे,आज एक मुलगी भविष्यात देश चालवू शकते तर अंतराळात यशस्वी कामगिरी करु शकते हे आपण पाहिले व पाहत आहोत,स्त्री जन्माचे स्वागत केले पाहिजे व स्त्री भ्रूणहत्या रोखुन तिचे संरक्षण केले पाहिजे,स्त्री जन्माचे स्वागत याला स्मरुन दरवर्षी श्री गणेश रानबा वाघमारे यांनी अनोखी परीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा जो वर्षानुवर्षे उपक्रम राबवित आहेत ते समाजहित व जनहितार्थ असुन स्तुत्य उपक्रम आहे,असे प्रतिपादन वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्मिताताई गवळी मॅडम यांनी व्यक्त केले.

तर सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे साहेब व तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ एकनाथ माले साहेब यांच्या कार्यकाळात स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्याची यशस्वी कामगिरी व देशात प्रथम क्रमांक पटकाविला होता ही बाब गौरवर्णीय होती,याची आठवण त्यांनी करून दिली.यात प्रामुख्याने वैद्यकीय अधीक्षक डॉ.स्मिता ताई गवळी मॅडम, परिचारिका भाटे मॅडम, पल्लवीताई चव्हाण,अनिता कोळी,गुरुनाथ माळी,गणेश रानबा वाघमारे,संजय गजधने सचीन चौधरी,दिपक पांढरे,विशाल घरबुडवे अन्य इतर उपस्थित होते,डाॅक्टर नर्स व उपस्थित मान्यवरांनी सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांना अनोखी परीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

Tuesday, 25 May 2021

सॅनिटयजर, व ,1500 ,मास्कचे वाटप

 

सॅनिटयजर, व ,1500 ,मास्कचे वाटप


*संतगाडगेबाबा स्वयसेवी संस्था देवसिगा

* मराठवाडा लोकविकास मंच

* महाएनजीओ फेडरेशन पुणे

*गुंज दिल्ली

*जिल्हा माहिती कार्यलय

यांचे योगदान



नळदुर्ग,

दिनांक 25/5/2021 रोजी संतगाडगेबाबा स्वयसेवी संस्था देवसिगा ता तूळजापूर जि उस्मानाबाद व ,मराठवाडा लोकविकास मंचचे नियञन विश्वनाथ आण्णा तोडकर, तसेच महाएनजीओ फेडरेशन पुणे, गुंज दिल्ली , जिल्हा माहिती कार्यलयात याच्या वतिने, आज , सालेगाव,  गुजुटी, नळदुर्ग कोव्हीड सेंटर, बस्वतवाङी याठीणी गरीब अतिगरीब लोकासाठी सॅनिटयजर, व ,1500 ,मास्कचे वाटप करण्यात आले आले व तसेच शासनाने सुरूकेलेल्या विविध योजनाची महिती सोसलडिसटनस ठेवुन सांगन्यात आल्या यावेळी  संस्थेचे अध्यक्ष तानाजीराव जाधव,  कार्यकरते नेताजी शिन्दे, बब्रुवान पारवे, तनिष्क जाधव हे होते तर सालेगावचे  नारयण गणपती गुरव सरपंच, एन बी भोरे ग्रामसेवक आमोल मारूती काबळे, भीमसेन माने, मनाजी साळुंखे,हे होते  तसेच गुंजुटी येथे सरस्वती कारे सरपंच, मुळे ,व्ही डी ,ग्रामसेवक, आयुब मुजावर उपसरपंच, योगेश शिन्दे, राहुल माने होते  तसेच नळदुर्ग वसंतनगरवरिल कोव्हीड सेंटरसाठी डाॅआकाकंशा गोरे मॅडम, सिस्टर  गायकवाड मॅडम, निहाल काझी, रोठड सर नळदुर्ग कोव्हीड सेंटर उपस्थित होते तर बस्वतवाङी येथील प्रा जि प शाळांवर नेताजी शिन्दे याच्या कॅरनटाईन व्यक्ती साठी  पंधरासे मास्क चार बॅटल चारलिटर सॅनिटयजर आतिशय गरजु लोकासाठी वाटप केले.

सोयाबीन बियाणे खरेदी व लागवड करताना काळजी घेण्याचे शिवार हेल्पलाइन कडून आवाहन.

सोयाबीन बियाणे खरेदी व लागवड करताना काळजी घेण्याचे शिवार हेल्पलाइन कडून आवाहन.

 
_पुढील नुकसान टाळण्यासाठी खबरदारीचे उपाय_



उस्मानाबाद / प्रतिनिधी

     लवकरच खरीप २०२१ चा हंगाम जवळ येत आहे. शेतकऱ्यांची बियाणे खरेदी करण्यासाठी धावपळ सुरू आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बियाणे उगवण क्षमतेबद्दल गोंधळ उडाला होता. या वर्षी प्रशासनाने योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना काही उपाय पण सुचवले आहेत.
       शेतकऱ्यांनी संबंधित कृषी निविष्ठा विक्रेत्याकडून सोयाबीन बियाणे खरेदी केल्यानंतर सात दिवसाच्या आत सोयाबीनची उगवण क्षमता तपासणी करावी. उगवण शक्ती मध्ये ७० टक्के पेक्षा कमी बियाणे उगवून आले तर तात्काळ कृषी निविष्ठा विक्रेत्यांना संपर्क करावा. याविषयी कृषी निविष्ठा विक्रेत्यांमार्फत सुद्धा जनजागृती करण्यात येत आहे. जर ०७ दिवसाच्या आत शेतकऱ्यांनी उगवणक्षमता तपासणी केली नाही आणि तसेच बियाणे पेरले व त्यामुळे जर काही अडचण आली तर याबाबत शेतकऱ्यांना बियाणे उगवणूक संदर्भात कुठल्याही प्रकारचा आक्षेप नाही अशा आशयात विक्रेते शेतकऱ्यांकडून लेखी स्वरुपात लिहून घेत आहेत.
      बियाणे हे लागवड करण्याच्या ०८ ते १० दिवसापूर्वी खरेदी करावे. सोयाबीन हे नाजूक बियाणे आहे, त्यामुळे त्याची धूळ पेरणी करू नये. उगवनशक्ती ७० टक्के पेक्षा जास्त असेल तरच लागवड करावी अन्यथा करू नये. बियाण्यास पेरणीपूर्वी बुरशीनाशक व जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन बियाणे हे अत्यंत नाजूक असते त्याचे बाह्य आवरण पातळ असते व बियाण्यातील बीजांकुर व मुलांकुर बाह्य आवरनाच्या लगत असल्यामुळे बियाणे हाताळतांना काळजी घ्यावी. सोयाबीनची पेरणी साधारणतः ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतर व जमिनीमध्ये पेरणीयोग्य ओल असतानाच करावी. पेरणी योग्य खोलीवर करावी.(मध्यम ते भारी जमिनीत पेरणी ०३ ते ०३.५० सेमी. पेक्षा जास्त खोलीवर केल्यास त्याचा उगवणशक्ती वर विपरीत परिणाम होतो.) 
सोयाबीन बियाण्याची पेरणी पाणी साचलेल्या जमिनीत पाण्याचा निचरा होऊन वाफसा झाल्याशिवाय करू नये. बियाण्याची वाहतूक करताना किंवा खरेदी केल्यानंतर बियाणे घरी आणताना आणि पेरणीसाठी साठवून ठेवताना बियाण्याची पिशवी जास्त आदळआपट होणार नाही, त्याची कमीत कमी हाताळणी होईल ही काळजी घ्यावी. खरेदी करतेवेळी स्वतः बियाणे खरेदीदाराचा मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे. शेतकर्‍यांनी बियाण्याची वाहतूक करताना बियाण्याच्या पिशवीवर खताचे पोते किंवा इतर कोणतीही वजनदार वस्तू टाकू नये. तसे झाल्यास बियाण्याची उगवणक्षमता कमी होण्याची शक्यता असते. 
    शेतकन्यांनी खरेदी केलेल्या बियाण्याच्या कंपनीचे नाव, लॉट क्रमाक ई बिलाप्रमाणे बॅगवर चेक करुनच घ्यावे. सदरील सोयाबिन बियाण्याची खरेदी केल्यानंतर त्या बियाण्याची लागवड करण्याच्या अगोदर उगवण शक्ती पडताळणी करण्याकरीता त्या प्रत्येक लॉटच्या एका गोणी मधून लेबल व शिलाई ज्या बाजुने आहे, ती तशीच बंद ठेवून त्याच्या विरुध्द बाजुने १०० ते १५० बिया काढाव्यात. त्याची उगवनशक्ती ७०% टक्केच्या वर असल्यास शेतकयांनी बियाण्याची लागवड करावी. जर ७०% टक्केच्या कमी उगवनशक्ती असल्यास सदरील बियाण्याची बॅग सिलबंद स्थितीत परत करण्यात यावी. परत करतांना मूळ बिल सोबत आणने अनिवार्य आहे. सर्व प्रक्रिया खरेदी बिलाच्या तारखे पासून ०७ दिवसाच्या आत करावी. त्यानंतर आपणास उगवनशक्ती बदल कोणताच आक्षेप नाही असे ग्राह्य धरण्यात येईल.
      बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांना कोणतीही अडचण आल्यास तात्काळ शिवार हेल्पलाइनला ८९५५७७१११५ संपर्क साधावा. हेल्पलाइन सकाळी १० ते रात्री ६ पर्यंत मोफत आहे, अशी माहिती शिवार फाऊंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांनी दिली. 
  यासाठी कृषी विभाग,जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, राष्ट्रीय सेवा योजना, मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शनासाठी एम.एच.आय , व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय उस्मानाबाद या शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी संस्था सर्वांचे सहकार्य मिळत आहे.

अणदूर येथील वत्सला नगर भागात लसीकरणाची स्वतंत्र व्यवस्था करावी - डॉ जितेंद्र कानडे

 अणदूर येथील वत्सला नगर भागात लसीकरणाची स्वतंत्र व्यवस्था करावी - डॉ जितेंद्र कानडे

नळदुर्ग :-  तुळजापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या अणदूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वत्सला नगर,सिद्धार्थ नगर,बसवेश्वर नगर,बजरंग नगर आदी भागातील नागरिकांना कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत स्वतंत्र लसीकरण केंद्र करून लसीकरण करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य डॉ जितेंद्र कानडे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, अणदूर ग्रामपंचायत अंतर्गत तीन तांडे व वत्सलानगर हा भाग येतो,अणदूर प्राथमिक आरोग्य केंद्र व वत्सलानगर मधील अंतर जवळपास एक ते दीड किलोमीटर येते.येथील जास्तीत जास्त नागरिक हे शेती व शेतीची कामे करणारे आहेत.या भागातील नागरिकांनी लोकसंख्या ही जवळपास ७ ते ८ हजार पेक्षा अधिक आहे. ही लोकसंख्या पाहता येथे आपले आरोग्य उपकेंद्र पण मंजूर झालेले आहे.आता पर्यंत घेण्यात आलेल्या लसीकरण शिबिरात या भागातील नागरिकांना म्हणावी त्या प्रमाणात लस मिळाली नाही. त्याचे कारण लसीकरण व या भागातील अंतर हे ही असू शकते.त्यामुळे या भागातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीत अणदूर प्राथमिक केंद्रांतर्गत स्वतंत्र लसीकरण मोहीम घेतल्यास याचा फायदा होऊन जास्तीत जास्त नागरिकांना याचा लाभ होईल. तसेच नियमित लसीकरणासाठी होणारी प्रचंड गर्दी पाहता अणदूर प्राथमिक आरोग्य केंद्रात अपंगांसाठी स्वतंत्र लसीकरण व्यवस्था करणे गरजेचे आहे.तरी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी या अर्जाची दखल घेऊन स्वतंत्र लसीकरण व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य डॉ जितेंद्र कानडे यांनी केली आहे.

अन्नदा व परिवर्तन सामाजिक संस्थेच्या वतीने २७२ गरजुवंत कुटुंबीयांना किराणा किटचे वाटप

अन्नदा व परिवर्तन सामाजिक  संस्थेच्या वतीने  गरजू कुटुंबीयांना किराणा किटचे वाटप

नळदुर्ग :- कोरोना महामारीच्या संकटकालीन परिस्थितीमध्ये सापडलेल्या गरजूवंत लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने अन्नदा संस्था मुंबई व परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने २५ मे रोजी नळदुर्ग शहरातील एकल महिला, विधवा ,निराधार ,परित्यक्ता ,गोर गरीब गरजूवंत २७२ कुटुंबाना नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत पोलीस उपनिरीक्षक कैलास लहाने नळदुर्ग नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड , परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक सचिव मारुती बनसोडे ,यांच्या हस्ते किराणा किटचे वाटप करण्यात आले.

या वेळी माजी सैनिक मधुकर लोखंडे ,पप्पू सुरवसे, उमेश गायकवाड, प्रमोद लोंढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष,बशीर शेख यांच्यासह  आदी उपस्थित होते.

नेहरू युवा केंद्राच्या वतीने वॉरियर कार्यक्रमास सुरुवात

 नेहरू युवा केंद्राच्या वतीने वॉरियर कार्यक्रमास सुरुवात



परंडा प्रतिनिधी -

नेहरू युवा केंद्र संघटन भारत सरकार व युनिसेफ यांच्या अंतर्गत यंग वारियर कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कोविड-१९ संदर्भात व्हाट्सअप च्या माध्यमातून जनजागृती तसेच वेबिनार च्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.या यंग वारियर कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील आदीकाधिक युवकांनी सहभागी होऊन देशहित कार्यासाठी पुढे यावे असे आवाहन नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद (भारत सरकार) जिल्हा युवा समन्वयक धनंजय काळे यांनी जिल्ह्यातील सर्व युवकांना आवाहन केले आहे.


"यंग वॉरियर या बाबत जाणून घ्या."

"व्हाट्सएपच्यामाध्यमातून या ९६५०४१४१४१ नंबर वरती वाय डब्ल्यू ए ( YWA ) असा मेसेज टाकावा.किंवा +91-8066019225 या नंबर मिस कॉल देऊन ही सहभागी होऊ शकतो.

व्हाट्सएप वरती U Report UNICEF यांच्या कडून काही माहितीवजा प्रश्न विचारले जातील त्या त्या प्रश्नांची उत्तरे देत आपण प्रशिक्षनाचा भाग बनून यशस्वी रित्या माहिती व प्रशिक्षण पूर्ण करून घेण्यात यावे. प्रशिक्षण पूर्ण होताच आपणाला प्रमाणपत्र मिळेल.तसेच आपणास मिळालेले प्रमाणपत्राचा स्क्रिनशॉट खालील नंबर वरती पाठण्यात यावा"

 यंग वारियर बाबत अधिक माहिती साठी नेहरू युवा केंद्र स्वयंसेवक रणजीत महादेव पाटील यांच्याशी ९७६७३७३५०५ नंबर वरती संपर्क करावा. 

Sunday, 9 May 2021

विवाह समारंभात ही दोन्ही पाहुणे मंडळींची रॅपिड टेस्ट करणे गरजेचे

 विवाह समारंभात ही दोन्ही पाहुणे मंडळींची रॅपिड टेस्ट करणे गरजेचे


उस्मानाबाद / बाळासाहेब अणदूरकर

     ध्या वाढता फैलाव चिंताजनक दिसून येत आहे. बाधितांच्या आकड्याबरोबरच मृत्यूचाही आकडा वाढत आहे त्याचा रोकथाम करण्यासाठी प्रशासनाने कडक प्रतिबंध करणे गरजेचे आहे त्याचाच एक भाग म्हणून विवाह समारंभाच्या ठिकाणी ही प्रशासनाने रॅपिड टेस्ट करणे गरजेचे आहे. जेणेकरून काही प्रमाणात वाढत्या आकड्याला पायबंद घालण्यास मदत होणार आहे.त्यामुळे प्रशासनाने उपस्थित दोन्ही पाहुणेमंडळीची रॅपिड टेस्ट करूनच विवाह समारंभ पार पाडण्याची गरज अत्यावश्यक झाली असल्याने प्रशासनाने याबाबत कडक पावले उचलावीत असा सूर नागरिकांतून निघत आहे.

को रो ना च्या वाढत्या आलेखाने आता उच्च सीमा गाठली आहे. दैनंदिन उस्मानाबाद जिल्ह्याचा कोरोना बाधितांचा आकडा सातशे-आठशे च्या पुढे असतो आणि मृत्यू ही वीस च्या आसपास असतात. हा आलेख असा वाढला आहे की मोबाईल उघडताच सोशल मीडिया वरती पहिली पोस्ट असते ती म्हणजे भावपूर्ण श्रद्धांजली!काही दिवसांपूर्वी अशा मोबाईल पोस्टला प्रतिसाद म्हणून भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलं जात होतं दुरची - अनोळखी व्यक्ती असत.परंतु आता निकटची माणसे क्षणातच जग सोडताना पाहून अगदी श्रद्धांजली वाहने तर दूरच पोस्ट पाहतानाही भीती वाटत आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण असतानाच त्यात भर ही शिक्षित - उच्चशिक्षित जबाबदार पण बेजबाबदारपणे वागणाऱ्या नागरिकांची आहे. विना मास्क गर्दी करणे मग ती पालेभाज्या ची खरेदी असो किराणा दुकान असो किंवा मेडिकल सर्व ठिकाणी नियम मोडून खरेदी विक्री सुरू आणि त्यातूनच कोरोना प्रसारास गती मिळते . प्रशासन सतत वेळोवेळी सुधारित सूचना देत आहे परंतु नागरिक मात्र प्रशासनास दोष देत व राजकीय पुराण्या पुढाऱ्यांना दोष काढत अशा कडक नियमन मधूनही पळवाट निघते का? हे शोधताना दिसत आहे.कोरोना काळातील सर्व नियम धाब्यावरती बसवून लग्न समारंभ उत्सव हे खोट्या प्रतिष्ठेचे पांघरून घेत गर्दी जमवताना पाहावयास मिळत आहेत. कोरोनाला पायबंद घालण्यासाठी प्रशासनाने विवाह समारंभाकरिता पंचवीस व्यक्तींची मर्यादा घातलेली आहे. परंतु विविध ठिकाणाहून जमणार्या पंचवीस व्यक्ती कश्या आहेत हे समजत नाही. त्याकरिता प्रशासनाने सदर समारंभाच्या ठिकाणी यात सहभागी होणाऱ्या व्यक्तींची रॅपिड अंटिजेन टेस्ट करून सहभागी होऊ दिले पाहिजे कारण यामध्ये जर एखादा कोरोना बाधित जर असेल तर त्यामुळे त्याचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. अशा पद्धतीने जर रॅपिड टेस्टची व्यवस्था समारंभा ठिकाणी केली तर या ठिकाणातून होणाऱ्या प्रादुर्भावापासून रोखता येऊ शकेल. कारण अशा बिकट काळात ही नागरिक विवाह समारंभाच्या बाबतीत गंभीर दिसत नाहीत अशी सुरक्षा जर नसेल तर म्हणावे लागेल की,"लगीन वरात. , आणि कोरोना घरात " 


बेवजाह घर से निकलने की क्या जरुरत है!

और मौत से आखे मिलाने की क्या जरुरत है!


जिंदगी रहेमत है खुदाकी उसे संभाल के रख !

कबरस्थान सजाने की क्या जरुरत है!


सबको मालूम है बाहर की हवा कातिल है!

फिर कातिल से उलझने की क्या जरुरत है!


दिल को बहलानेको घर मे ही मजा काफी है !

यूंही गलियो में भटकनेकी जरूरत क्या है!


प्रतिक्रिया

लग्न समारंभाला २५माणसांनाच परवानगी असतांना अनेक जण जमा होत असल्याने कोरोनाची वरात आता प्रत्येक व—हाडींच्या घरा—घरात पोहचते की काय?असा सवाल नव्याने ऊभा राहिला आहे.कोरोनाचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत लग्न समारंभाला अधिक गर्दी केली म्हणून कांही कुटुंबाला दंड ही लावला जातो आहे हे जरी खरे असले तरी यामुळे कोरोनाचा प्रसार वाढतचआहे.कोरोनाला ब्रेक द्यायचाच असेल तर लग्न समारंभातील सर्व सहभागींची त्याच क्षणी कोरोना चाचणी केली तर कोरोनाला रोकता येईल आशा चाचणी करण्यासाठी आरोग्य यंञनेवर तान येईल पण हे केलेच पाहिजे.

                                                        प्रा.राजा जगताप



तेरणा पब्लिक स्कूल मध्ये इको फ्रेंडली गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा संपन्न

  तेरणा पब्लिक स्कूल मध्ये इको फ्रेंडली     गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा संपन्न उस्मानाबाद, उस्मानाबाद येथील तेरणा पब्लिक स्कूलमध्ये पर्या...