Monday, 26 July 2021

प्रहार संघटनेच्या वतीने शिक्षण राज्यमंत्री यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर

    प्रहार संघटनेच्या वतीने  राज्यमंत्री    यांना  विविध मागण्यांचे निवेदन सादर

बहुजनांचा लोकनेता/

अमरावती -  शासकीय विश्रामगृह अमरावती येथे प्रहार संघटनेच्या वतीने राज्य कार्याध्यक्ष अविनाश तांदळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री मा.ना.श्री. बच्चु भाऊ कडू व त्यांचे स्वीय सहाय्यक श्री. राहुल मोहोड यांना शिक्षक - शिक्षकेत्तर ,महिला व बालविकास कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत निवेदन सादर करण्यात आले यावेळी १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत असलेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना विना अट लागू करण्यात यावी ,राज्यातील वस्तीशाळा शिक्षकांची मूळ नियुक्ती दिनांकापासून ची सेवा ग्राह्य धरण्यात यावी, राज्यातील ज्या वस्तीशाळा शिक्षकांना अद्याप पत्राद्वारे डी. एल. एड साठी परवानगी संधी मिळालेली नाही त्या वस्ती शाळा शिक्षकांना डि.एल. एड.साठी संधी उपलब्ध करुन देण्यात यावी, सन २०११ ते २०१८ पर्यंत काम केलेल्या सर्व अतिथी निदेशकांना विना अट नियुक्त्या देऊन सेवेत कायम करून घेणे व नियमित वेतन देणे, राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांची संच मान्यता पूर्ण झाल्यानंतरच आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवावी, कोविड-१९ कर्तव्य बजावत असताना ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस विनाअट तात्काळ सेवेत अनुकंपा तत्त्वावर सामावून घ्यावे, राज्यातील सर्व शिक्षकांना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सेवा मोफत मिळावी यासाठी स्मार्ट कार्ड वितरीत करण्यात यावेत, आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदल्या जि. प. प्राथमिक शिक्षकांच्या प्रमाणे जि.प.माध्यमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात याव्यात, शिक्षण विभागातील पर्यवेक्षकीय पदे तात्काळ भरण्यात यावीत ,राज्यातील सर्व विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ देण्यात यावा ,राज्यातील दिव्यांग शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना स्कूटर विथ अडॅपशन तात्काळ देण्यात यावे, राज्यातील दिव्यांग शिक्षक कर्मचाऱ्यांना प्रत्येक वर्षी संवर्ग १ मध्ये बदली मध्ये सूट मिळावी, ऑनलाइन शिक्षक जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली धोरणामध्ये अँजिओप्लास्टी झालेल्या शिक्षकांना हृदयशस्त्रक्रिया अंतर्गत संवर्ग १ चा लाभ मिळणे बाबत , सातव्या वेतन आयोगातील खंड १ व खंड २ मधील त्रुटी तात्काळ दुरुस्त करण्यात याव्यात, राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांचे वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी बाबत प्रशिक्षणे तात्काळ सुरु करावेत जेणेकरून शिक्षक वंचित राहणार नाहीत, राज्यातील सर्व शिक्षकांचे पगार सीएमपी प्रणालीद्वारे दरमहा एक तारखेला करण्यात यावेत, सन२०२१-२२ यावर्षी बदलीपात्र शिक्षकांची सेवाज्येष्ठता ३१ मे ऐवजी ३० जून धरण्यात यावी, सर्वसाधारण क्षेत्रातील सेवा पाच वर्षे ऐवजी तीन वर्ष करण्यात यावी . तसेच महिला व बाल विकास विभागाअंतर्गत अंगणवाडी सेविकांना शासकीय सेवेत सामील करून घ्यावे तसेच किमान वेतन लागू करावे, अंगणवाडी सेविकांना दिलेला मोबाईल ॲप मातृभाषा मराठी भाषेतून असावे, अंगणवाडी सेविकांना अवांतर कामे देऊ नयेत , लहान मुलांना , स्तनदा मातांना , गरोदर मातांना चांगल्या दर्जाचा पूरक आहार देण्यात यावा, ग्रामविकास विभागाकडे असलेले पर्यवेक्षिका बाबतचे पद महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित करावे, ज्या पर्यवेक्षिकांकडे पाच वर्षापेक्षा अतिरिक्त बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून पदभार दिलेला आहे त्यांना सेवाजेष्ठतेने पदोन्नती देण्यात यावी. वरील सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली व मा. ना.श्री. बच्चुभाऊ कडू यांनी याबाबत मंत्रालयीन स्तरावरील अधिकारी यांची पुणे येथे बैठक घेऊन वरील प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन प्रहार संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश तांदळे , हिरामण कांगरे जिल्हाध्यक्ष बीड, गणेश नवले जिल्हा उपाध्यक्ष बीड, गणेश नागरगोजे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बीड ,अंकुश मिसाळ जालना जिल्हा अध्यक्ष यांना दिले.

Friday, 16 July 2021

विविध मागण्या साठी एकल महिला संघटनेचा वारदवाडी येथे रास्ता रोको अंदोलन संपन्न

 

विविध मागण्या साठी एकल महिला संघटनेचा वारदवाडी येथे रास्ता रोको अंदोलन....

परंडा ,महागाई कमी करावी,संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात यावा  या सह विविध मागण्या साठी एकल महिला संघटनेच्या वतीने गुरूवार दि १५ जुलै रोजी वारदवाडी फाटा येथे तालूका अध्यक्षा मंदा पाटील,सचिव अनिता नवले यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको अंदोलन करण्यात आले .

    सरकार विरोधात घोषणाबाजी करीत तासभर रास्ता रोको अंदोलन केल्याने परंडा बार्शी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती या अंदोलनात परंडा तालूक्यातील महिला सह तुळजापुर,लोहारा ,उस्मानाबाद येथील कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या .

    एकल महिलांना संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ  योजना,तसेच रेशन कार्ड,व धान्य मिळत नाही तसेच अनेक महिलांना पंचायत समीती कडून घरकुलाचा लाभ मिळत नाही , जास्त आलेले विज कमी केले जात नसल्याच्या तक्रारी  महिलांनी मांडल्या .


  एकल महिलांना संजय गांधी , श्रावणबाळ योजनेचा लाभ दयावा महगाई कमी करावी,घरकुल देण्यात यावे,ज्या महिलांना रेशन कार्ड नाही त्यांना रेशन कार्ड देण्यात यावे,ज्यां महिलांना धान्य मिळत नाही त्यांना तात्काळ धान्य वाटप करावे,हिंगणगाव येथे बस सेवा सुरू करावी इत्यादी मागण्याचे निवेदन नायब तहसिलदार गणेश सुपे यांना देण्यात आले या वेळी सहाय्यक पोलिस निरिक्षक राजकुमार ससाने,तलाठी विनोद चुकेवाड यांची  उपस्थिती होती. 

    या आंदोलनात संघटनेच्या तालूका अध्यक्षा मंदा पाटील , सचिव अनिता नवले,अनुराधा अंबुरे,नौशाद सय्यद गिरिजाबाई गायकवाड,उर्मीला महंतराज, कांता शिंदे,अश्वीनी शेळके,लक्ष्मी चौधरी,पुनम मोरे,गिरजाबाई गायकवाड,श्रीमती मारकड यांच्या सह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या .

Wednesday, 14 July 2021

कोरोना मुक्त अंतर्गत रुई गावात रा.गे.शिंदे महाविद्यालयाच्या वतीने                             मास्क वाटप, वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न.
रंडा - दि. 14 जुलै 2021 परंडा येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने कोरोना मुक्त अंतर्गत रुई गावांमध्ये मास्क वाटप आणि वृक्ष लागवड कार्यक्रम घेण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ दीपा सावळे या उपस्थित होत्या . तर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ सचिन चव्हाण, प्रा सचिन साबळे आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी रुई गावच्या सरपंच कुसुम जगताप, उपसरपंच मीराबाई राजेंद्र लिमकर व सदस्य सुमित लिमकर, सुहास मुळीक, राजेंद्र पाटील आणि पोलीस पाटील विलास पाटील हे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सचिन चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले होते. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ दीपा सावळे यांनी उपस्थित सर्व गावकऱ्यांना कोविड-19 च्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले . तसेच नॅक या अतिश्य महत्त्वाच्या टीमसोबत गावकऱ्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार मानले. गावातील सर्व लोकांनी स्वतःची काळजी घ्यावी गावामध्ये कोणताच रोग येणार नाही यासाठी सर्वांनी स्वतःची आणि गावाची स्वच्छता ठेवावी , प्रतिकारशक्‍ती वाढावी म्हणून सर्वांनी लस घ्यावी स्वतःची घराची आणि समाजाची काळजी घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे . आम्ही महाविद्यालयाच्या वतीने आपल्या गावांमध्ये विविध उपक्रम राबवत आहोत रुई गाव हे महाविद्यालयाने दत्तक घेतले आहे तेव्हा आपला समन्वय महत्त्वाचा आहे असे यावेळी प्राचार्या डॉ दीपा सावळे यांनी सांगितले. यावेळी उपस्थित सर्व गावकऱ्यांना मास्क चे वाटप करण्यात आले तसेच सर्वांना एक एक झाड देण्यात आले व गावामध्ये वृक्ष लागवड करण्यात आली . या कार्यक्रमासाठी गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी कोविड - 19 चे पालन करत मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार डॉ सचिन चव्हाण यांनी मानले.

Tuesday, 13 July 2021

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची चित्ररथ व एलईडी व्हॅनद्वारे जिल्ह्यात प्रसिध्दी

 

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची  चित्ररथ व  एलईडी व्हॅनद्वारे                                                जिल्ह्यात प्रसिध्दी


जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी हिरवी झेंडी दाखवून केले मार्गस्थ


 

उस्मानाबाद,

- सामाजिक न्याय विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांची विविध माध्यमांद्वारे प्रसिध्दी केली जाते. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नागरिकांसाठीच्या योजनांच्या प्रसिध्दीवर यात प्रामुख्याने भर दिला जातो. या चित्ररथांवर सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे फ्लेक्स लावण्यात आले असून एलईडी व्हॅनवरही योजनांची माहिती फ्लेक्सद्वारे दाखवण्यात आली आहे. एलईडी व्हॅनवर दृकश्राव्य माध्यमांचा वापर करुनही योजनांची माहिती दिली जाणार आहे. आज सकाळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी या चित्ररथास आणि एलईडी व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले आहे.


हा चित्ररथ जिल्ह्यातील सर्व तालुक्यात 20 दिवस विविध गावांना भेटी देऊन तेथे थांबून माहिती देणार आहे. दररोज किमान 60 ते 70 किमींचा प्रवास करुन प्रतीदिन तीन गावांना भेटी देणार आहे. हा चित्ररथ जिल्ह्यातील 60 गावांमध्ये जाणार आहे. एलईडी व्हॅन जिल्ह्यातील 66 गावांमध्ये जाणार आहे. दररोज दोन-तीन गावांमध्ये जाऊन माहिती देण्याचे काम करण्यात येणार आहे. या चित्ररथ व एलईडी वाहनातून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची पुस्तिका व पोष्टर ठेवण्यात आले आहेत. त्याचे वितरणही करण्यात येणार आहे.

येथील जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आज सकाळी या दोन्ही व्हॅनला मार्गस्थ करताना निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बी.जी.अरवत, जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे आदी उपस्थित होते. या चित्ररथ व एलईडी व्हॅनवरील माहिती घेताना किंवा पाहताना नागरिकांनी कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्यशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

आरटीई अंतर्गत शाळा प्रवेशाची 23 जुलैपर्यंत मुदत वाढ

 


आरटीई अंतर्गत शाळा प्रवेशाची 23 जुलैपर्यंत मुदत वाढ

 





उस्मानाबाद,

  • वंचीत व दुर्बल घटकातील आर.टी. ई. मोफत 25 टक्के प्रवेशा दि.23 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

  •  बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायदयानुसार दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना प्रवेशासाठी शाळांना आर.टी.ई.अंतर्गत लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेमध्ये जावून आर.टी.ई. पोर्टलवरील दिनांकानुसार मूळ प्रमाणपत्रे आणि छायाकिंत प्रती घेवून आपल्या पाल्याचा तात्पुरता प्रवेश दि.11 जून 2021 ते 09 जुलै 2021 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. 
  • परंतु ब-याच पालकांनी मुदतीत प्रवेश घेतले नसल्याने शासनाने दि.23 जुलै-2021 पर्यंत पालकांसाठी आणि गटशिक्षणाधिकारी यांच्यासाठी मुदतवाढ दिली आहे.    
  • शाळेच्या मुख्याध्यापकांनी संबंधित पालकांना एस.एम.एस. करून कळवावे.एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही,याची मुख्याध्यापकांनी आणि पालकांनी नोंद दक्षता घ्यावी.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने पालकांना शाळेत जाऊन प्रवेश घेणे शक्य नसल्यास व्हॉटस्अॅप,ई-मेल व्दारे कागदपत्रे शाळेस पाठवून मुख्याध्यापकांशी भ्रमणध्वव्दारे संपर्क साधून प्रवेश निश्चीत करून घ्यावा,असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ.अरविंद मोहरे यांनी केले आहे.

न्यूमोकोकल कॉन्जुगेट लसीच्या मोहिमेस उस्मानाबाद येथे सुरुवात

                       न्यूमोकोकल कॉन्जुगेट लसीच्या मोहिमेस                     उस्मानाबाद येथे सुरुवात

उस्मानाबाद,

 न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन या लसीचा नियमित कार्यक्रमात समावेश करण्यात आलेला आहे. ही लस जिल्ह्यातील सर्व शासकीय लसीकरण केंद्रावर आजपासून मोफत मिळणार आहे.

 र्स्ट्रेप्टोकोकस न्युमोनी बॅक्टेरीयामुळे होणारा न्युमोनिया हा पाच वर्षाच्या आतील बालकांमधील न्युमोनियाचे प्रमुख कारण आहे. न्यूमोकोकल न्युमोनिया हा श्वसन मार्गाला होणारा एक संसर्ग आहे. ज्यामुळे फुप्फुसांवर सूज येवून त्यात पाणी भरु शकते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. खोकला, धाप लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे इत्यादी या आजाराची लक्षणे आहेत.जर आजार गंभीर असेल तर मुलांना खाण्या-पिण्यात अडचण येवू शकतात, फिट येवू शकते, बेशुध्द होवू शकतात आणि मृत्यू देखील होवू शकतो.

पीसीव्ही या लसीकरणामुळे बालकांमधील न्यूमोकोकल आजार आणि त्यामुळे होणारे मृत्यू टळू शकतात. गंभीर न्यूमोकोकल आजार होण्याचा धोका दोन वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये दिसून येतो. परंतु एक वर्षाच्या आतील बालकांमध्ये तो धोका सर्वात अधिक असतो. पीसीव्ही लसीकरणाने या गंभीर न्यूमोकोकल आजारापासून बालकांचे संरक्षण तर होईलच पण सोबतच समाजातील इतर घटकांमध्ये न्यूमोकोकल आजाराचा धोका कमी होईल. न्यूमोकोकल आजार टाळण्यासाठी पीसीव्ही लसीकरण हा सगळ्यात कमी खर्चीक व प्रभावी उपाय आहे.


सार्वत्रिक लसीकरण मोहिमेत बालकांना पीसीव्ही लसीचे तीन डोस :- पहिला डोस सहाव्या आठवड्यात, दुसरा डोस चौदाव्या आठवड्यात आणि बुस्टर डोस नऊ महिने या वयात दिला जाणार आहे. न्यूमोकोकल आजारापासून संरक्षण मिळविण्यासाठी सर्व पात्र बालकांना हे तिनही डोस मिळतील याची खात्री करुन घ्यावी.

या पीसीव्ही लसीकरणाचा नियमित लसीकरणात समावेशाचा जिल्हास्तरीय शुभारंभ येथील स्त्री रुग्णालयात आज करण्यात आला.या प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी.के.पाटील, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी, निवासी वैद्यकीय अधिकारी (बा.सं.), डॉ.सचिन बोडके, स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीमती गवळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीमती शैलजा ठोंबरे, डॉ.सोनटक्के, डॉ. माने, डॉ. मिनीयार, अधिसेविका श्रीमती सुमित्रा गोरे,श्रीमती देशमुख,श्रीमती भाटे, अधिपरिचारिका श्रीमती दाने यांच्यासह आरोग्य कर्मचारी मोठया प्रमाणात उपस्थित होते. न्यूमोकोकल आजार टाळण्यासाठी पीसीव्ही लसीकरण हा सगळयात कमी खर्चीक व प्रभावी उपाय असल्याने जिल्हयातील सर्व पात्र बालकांना ही लस द्यावी,असे आवाहन डॉ.पाटील व डॉ.मिटकरी यांनी केले आहे.

Monday, 5 July 2021

कास्ट्राईब तर्फे उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांचे स्वागत

  कास्ट्राईब  तर्फे उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी  राहुल गुप्ता यांचे स्वागत 


उस्मानाबाद, 
जिल्हा परिषद उस्मानाबाद चे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांचे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ उस्मानाबाद शाखेच्यावतीने स्वागत करण्यात आले त्यावेळी आश्रम शाळा प्रतिनिधी सतीश कुंभार, जिल्हाध्यक्ष बापू शिंदे, ज्येष्ठ उपाध्यक्ष सुधीर जाधवर , सचिव चंद्रकांत माळाळे , राज्य उपाध्यक्ष हरिभाऊ बनसोडे, सदस्य ज्योतीराम शिंदे
 आदी उपस्थित होते.