बाहेरगावी राहुन पोस्टर्स च्या माध्यमातून जनजागृती करणाऱ्या नगराध्यक्षा रेखाताई जगदाळे यांचे संकटकालीन परिस्थितीमध्ये तरी शहरात आगमन होणार का ?
नळदुर्ग :- बाहेरगावी राहून पोस्टरच्या माध्यमातून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव पासुन बचावासाठी जनजागृती करणाऱ्या नळदुर्ग नगरपालिकेच्या नगराध्यक्षा रेखाताई जगदाळे यांचे प्रत्यक्ष शहरात आगमन होऊन कोरोना महामारीच्या संकटकालीन परिस्थितीमध्ये सापडलेल्या नळदुर्गकरांना दिलासा देण्याचे काम करतील का ? असा प्रश्न शहरवासीयांच्या वतीने उपस्थित होत आहे.कारण कोरोनाने उस्मानाबाद जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव पासुन बचावासाठी व कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ संदीप पालवे, जिल्हा आरोग्य चिकित्सक धनंजय पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आरोग्य, पोलीस, महसूल व नगरपालिका प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता आपल्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र काम करीत आहेत. त्याच बरोबर खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील,आमदार कैलास पाटील या लोकप्रतिनिधींसह जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेचे नगराध्यक्ष कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना आरोग्य व इतर अडचणी दूर करण्यासाठी रस्त्यावर उतरून काम करीत आहेत.याच्या विपरीत परिस्थिती नळदुर्ग शहराची आहे. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित हानी होत असल्याने नागरिकांमध्ये एका प्रकारची भीती निर्माण झाली आहे.त्याच बरोबर शहरात देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असल्याने नळदुर्गकरांच्या समोर देखील कोरोना महामारीचे मोठे संकट उभे आहे. अशावेळी नळदुर्ग नगरीच्या प्रथम नागरिक या नात्याने नगराध्यक्षा रेखाताई जगदाळे हे स्वतःशहरात उपस्थित राहून संकटकालीन परिस्थितीमध्ये नगरपालिका, पोलीस व आरोग्य प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सोबत समन्वय साधून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव पासुन शहरवाशीयांचा कसा बचाव करता येईल यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे मात्र ज्यांचे कर्तव्य आहे ते नळदुर्ग नगरपालिकेच्या नगराध्यक्षा रेखाताई जगदाळे हे गेल्या अनेक महिन्यापासून बाहेरगावी आहेत. कोणते ही युद्ध असो किंवा स्पर्धा असो त्याला लढण्यासाठी कॅप्टनची ( सेनापती) ची गरज असते मात्र शहरात कोरोनाच्या विरोधातील युद्ध लढताना नळदुर्गच्या प्रथम नागरिक असलेल्या सेनापती (नगराध्यक्षा) गैरहजर असल्यामुळे हा युद्ध लढायचे कसं जिंकायचं कसं हा प्रश्न नळदुर्ग शहरातील नागरिकांना पडला आहे. त्याचबरोबर उपनगराध्यक्ष पद देखील एक वर्षापेक्षा जास्त कालावधी पासून रिक्त असल्याने आपल्या समस्या सोडविण्यासाठी कुठं जायचं असा प्रश्न शहरवासीयांच्या समोर उभा आहे. कारण नळदुर्ग नगरपालिकेच्या नगराध्यक्षा रेखाताई जगदाळे हे नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून सतत बाहेरगावी राहत असल्याने त्यांचे आगमन शहरात राष्ट्रीय सण असलेल्या 15 ऑगस्ट, 26 जानेवारी किंवा नगरपालिकेत पालिकेत होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या वेळीच होते. त्यामुळे नॉटरिचेबल नगराध्यक्षा म्हणून त्यांची ओळख शहरवाशीयां मध्ये निर्माण झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट अतिशय घातक असल्याने बेड व ऑक्सिजनची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्याने अनेकदा रुग्णांना आपले जीव गमवावे लागत आहे अशी गंभीर परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये एका प्रकारची घबराट पसरली आहे अशावेळी पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती करण्यापेक्षा प्रत्यक्षात शहरात हजर राहून लोकांना दिलासा देण्याचे काम नगराध्यक्षांनी करणे गरजेचे आहे मात्र नळदुर्गकरांची शोकांतिका अशी आहे की सध्याच्या घडीला नळदुर्गकरांची समस्या सोडवून दिलासा देणारा कोणी वालीच नसल्याने नळदुर्गकरांची अवस्था आईविना पोरका होऊन भरकटलेल्या मुलासारखी झाली आहे. आजच्या घडीला नळदुर्ग शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याकरिता नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत, सुधीर मोटे, पोलीस उपनिरीक्षक कैलास लहाने, मुसा शहा, मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, नळदुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ राहुल जानराव डॉ ज्योती तीर्थ, डॉ.एम.एम.शेख, डॉ यशवंत नरवडे यांच्यासह पोलीस, नगरपालिका व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी जनजागृती व इतर माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम करीत आहेत. मात्र ज्यांची जबाबदारी आहे. ते लोक रस्त्यावर उतरून काम करण्याऐवजी केवळ पोस्टरच्या माध्यमातून स्वतःचा उदो उदो करून घेण्याकरिता व श्रेय लाटण्यासाठी मी केले मी केले म्हणून पोस्टरबाजी करीत आहेत. त्यामुळे एका प्रकारची नाराजगी शहरवासीयांच्या वतीने व्यक्त केली जात आहे. व शहरवासीयांच्या वतीने अशी मागणी केली जात आहे की नगराध्यक्षा रेखाताई जगदाळे यांनी तात्काळ शहरात येऊन कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव पासुन बचावासाठी रस्त्यावर उतरून उपाययोजना कराव्यात.
**************************
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः धुमाकूळ घातल्याने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव पासुन बचावासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लावल्याने हातावर पोट असलेले लहान व्यापारी व मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे लोक पूर्णपणे आर्थिक अडचणीत सापडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे अशा वेळी त्यांना मदत करणे गरजेचे आहे. त्यामुळे नाही त्यावेळी समाजसेवा, दानशूरपणाचा गाजावाजा करत पोस्टरबाजी व सोशल मीडियातून स्वतःची वाहवा करून घेणारे तथाकथित समाजसेवक अशा या संकटकालीन परिस्थितीमध्ये गरजुवंत लोकांना मदत करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:
Post a Comment