Tuesday, 27 April 2021

वाशी शहाराच्या काही भागात ताप,चिकून गुणिया सदृश्य आजाराची साथ

 वाशी शहाराच्या काही भागात ताप,चिकून गुणिया                     सदृश्य आजाराची साथ

सांडपाण्यात डासांची उत्पत्ति होऊन साथरोग पसरल्याचे तपासात निष्पन्न


वाशी :- शहरातील पारा रोड , आदर्श नगर, महावितरण कार्यालय या भागात ताप, चिकून गूणिया सदृश्य आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. मागील दहा ते पंधरा दिवसापासून सदरील भागात रुग्णाचे प्रमानात वाढ होत असून परिसरात कुठल्याही प्रकारची उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. आरोग्य विभाग व नगरपंचायत प्रशासनचे काम अत्यंत ढीम्मपने सुरू असून नगरीकातून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
 कोरोंनाच्या प्रादुर्भावामुळे अगोदरच हैराण असलेल्या वाशीकरांच्या चिंतेत ताप, चिकून गूणिया सदृश्य आजाराचे रुग्ण आढळून अधिकच भर पडली आहे. शहरातील पारा रोड , आदर्श नगर, महावितरण कार्यालय या भागात ताप, चिकून गूणिया सदृश्य आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. एकाच कुटुंबातील सर्वच व्यक्ति आळीपाळीने आजारी पडत असल्याचे निदर्शनास येत आहे. 
 सदरील आजारचे रुग्ण मागील दहा ते पंधरा दिवसापासून आढळून येत असून त्यावर कुठल्याही प्रकारची ठोस अशी तातडीची उपाययोजना करण्यात आलेली नाही. नगरपंचायत कडून केवळ धूळफवारणी करण्यात आली. त्याचा कुठलाही परिणाम दिसून आला नाही. मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असल्याचे लक्षात येऊनही आरोग्य विभागाला त्या ठिकाणी पाचारण करणे अपेक्षित होते मात्र तसे लवकर होताना दिसत नाही. परिणामी प्रशासनचे काम अत्यंत ढीम्मपने सुरू असल्याने निदर्शनास येत असून यामुळे त्या भागातिल नगरीकातून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने ठाम उपाययोजना राबवून आजारचे निदान करून त्यावर तत्काळ नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी वाशी शहरवासीयातून होत आहे. 
(लाखोंची उधळण तरीही स्वछता नाही : शहर स्वछतेसाठी नगरपंचायत कडून लोखो रुपयांचे टेंडर दिले आहे. मात्र लाखो रुपयांच्या निधीची उधळण करूनही शहरात स्वछता होताना दिसत नाही. ठेकेदारकडून नालेसफाई कामे व्यवस्थित होत नसल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही परिणामी डासांची उत्पत्ति मोठ्या प्रमाणात झाली असून त्यामुळेच या भागात साथरोगाचा फैलाव झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.)

खाजगी दवाखाने फुल्ल :- थंडी-ताप, सांधे दुखी यामुळे हैराण असलेले रुग्ण कोरोंनाच्या भीतीपोटी खाजगी दवाखान्याचा आधार घेत आहेत. परिणामी खाजगी दवाखानेही फुल्ल झाले असून औशोधोपचारासाठी ताटकळत राहण्याची वेळ येत आहे..

‘दर्जेदार’ नाले सफाईसह , शहर स्वछतेची गरज :- शहरस्वछतेवर नगरपंचायत कडून वर्षी लाखो रुपयांची उधळण केली जाते. तरीही शहरातील बहुतांशी भागात सांडपाणी वाहतूक करणार्या नाल्या तुंबल्या आहेत. परिणामी त्यातून पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे नाल्यात सांडपाण्याची डबकी साचली आहेत. परिणामी शहरात डासांचा उपद्व्याप वाढला आहे. त्यामुळे शहर स्वछता नियमित व दर्जेदार करण्याची मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे. 





 साचलेल्या सांडपान्यात डासांच्या आळयांची उत्पत्ति मोठ्या प्रमाणात झाली असून त्यामुळे या भागात चिकनगुणिया सदृश आजारचे रुग्ण दिसत आहेत. त्यासंबधिची माहितीही आम्ही नगरपंचायत प्रशासनाला दिली आहे. ज्या नागरिकाणा काहीही त्रास जाणवत असेल त्यांनी ग्रामीण रुग्णालयात उपचार घ्यावेत. नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. :
                                              डॉ. जी. आर. महेंद्रकर, 
                                             तालुका आरोग्य अधिकारी 

No comments:

Post a Comment

तेरणा पब्लिक स्कूल मध्ये इको फ्रेंडली गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा संपन्न

  तेरणा पब्लिक स्कूल मध्ये इको फ्रेंडली     गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा संपन्न उस्मानाबाद, उस्मानाबाद येथील तेरणा पब्लिक स्कूलमध्ये पर्या...