प्रहार संघटनेच्या वतीने राज्यमंत्री यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर
बहुजनांचा लोकनेता/
अमरावती - शासकीय विश्रामगृह अमरावती येथे प्रहार संघटनेच्या वतीने राज्य कार्याध्यक्ष अविनाश तांदळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री मा.ना.श्री. बच्चु भाऊ कडू व त्यांचे स्वीय सहाय्यक श्री. राहुल मोहोड यांना शिक्षक - शिक्षकेत्तर ,महिला व बालविकास कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत निवेदन सादर करण्यात आले यावेळी १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत असलेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना विना अट लागू करण्यात यावी ,राज्यातील वस्तीशाळा शिक्षकांची मूळ नियुक्ती दिनांकापासून ची सेवा ग्राह्य धरण्यात यावी, राज्यातील ज्या वस्तीशाळा शिक्षकांना अद्याप पत्राद्वारे डी. एल. एड साठी परवानगी संधी मिळालेली नाही त्या वस्ती शाळा शिक्षकांना डि.एल. एड.साठी संधी उपलब्ध करुन देण्यात यावी, सन २०११ ते २०१८ पर्यंत काम केलेल्या सर्व अतिथी निदेशकांना विना अट नियुक्त्या देऊन सेवेत कायम करून घेणे व नियमित वेतन देणे, राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांची संच मान्यता पूर्ण झाल्यानंतरच आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवावी, कोविड-१९ कर्तव्य बजावत असताना ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस विनाअट तात्काळ सेवेत अनुकंपा तत्त्वावर सामावून घ्यावे, राज्यातील सर्व शिक्षकांना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सेवा मोफत मिळावी यासाठी स्मार्ट कार्ड वितरीत करण्यात यावेत, आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदल्या जि. प. प्राथमिक शिक्षकांच्या प्रमाणे जि.प.माध्यमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात याव्यात, शिक्षण विभागातील पर्यवेक्षकीय पदे तात्काळ भरण्यात यावीत ,राज्यातील सर्व विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ देण्यात यावा ,राज्यातील दिव्यांग शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना स्कूटर विथ अडॅपशन तात्काळ देण्यात यावे, राज्यातील दिव्यांग शिक्षक कर्मचाऱ्यांना प्रत्येक वर्षी संवर्ग १ मध्ये बदली मध्ये सूट मिळावी, ऑनलाइन शिक्षक जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली धोरणामध्ये अँजिओप्लास्टी झालेल्या शिक्षकांना हृदयशस्त्रक्रिया अंतर्गत संवर्ग १ चा लाभ मिळणे बाबत , सातव्या वेतन आयोगातील खंड १ व खंड २ मधील त्रुटी तात्काळ दुरुस्त करण्यात याव्यात, राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांचे वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी बाबत प्रशिक्षणे तात्काळ सुरु करावेत जेणेकरून शिक्षक वंचित राहणार नाहीत, राज्यातील सर्व शिक्षकांचे पगार सीएमपी प्रणालीद्वारे दरमहा एक तारखेला करण्यात यावेत, सन२०२१-२२ यावर्षी बदलीपात्र शिक्षकांची सेवाज्येष्ठता ३१ मे ऐवजी ३० जून धरण्यात यावी, सर्वसाधारण क्षेत्रातील सेवा पाच वर्षे ऐवजी तीन वर्ष करण्यात यावी . तसेच महिला व बाल विकास विभागाअंतर्गत अंगणवाडी सेविकांना शासकीय सेवेत सामील करून घ्यावे तसेच किमान वेतन लागू करावे, अंगणवाडी सेविकांना दिलेला मोबाईल ॲप मातृभाषा मराठी भाषेतून असावे, अंगणवाडी सेविकांना अवांतर कामे देऊ नयेत , लहान मुलांना , स्तनदा मातांना , गरोदर मातांना चांगल्या दर्जाचा पूरक आहार देण्यात यावा, ग्रामविकास विभागाकडे असलेले पर्यवेक्षिका बाबतचे पद महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित करावे, ज्या पर्यवेक्षिकांकडे पाच वर्षापेक्षा अतिरिक्त बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून पदभार दिलेला आहे त्यांना सेवाजेष्ठतेने पदोन्नती देण्यात यावी. वरील सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली व मा. ना.श्री. बच्चुभाऊ कडू यांनी याबाबत मंत्रालयीन स्तरावरील अधिकारी यांची पुणे येथे बैठक घेऊन वरील प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन प्रहार संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश तांदळे , हिरामण कांगरे जिल्हाध्यक्ष बीड, गणेश नवले जिल्हा उपाध्यक्ष बीड, गणेश नागरगोजे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बीड ,अंकुश मिसाळ जालना जिल्हा अध्यक्ष यांना दिले.





