विविध मागण्या साठी एकल महिला संघटनेचा वारदवाडी येथे रास्ता रोको अंदोलन....
परंडा ,महागाई कमी करावी,संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात यावा या सह विविध मागण्या साठी एकल महिला संघटनेच्या वतीने गुरूवार दि १५ जुलै रोजी वारदवाडी फाटा येथे तालूका अध्यक्षा मंदा पाटील,सचिव अनिता नवले यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको अंदोलन करण्यात आले .
सरकार विरोधात घोषणाबाजी करीत तासभर रास्ता रोको अंदोलन केल्याने परंडा बार्शी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती या अंदोलनात परंडा तालूक्यातील महिला सह तुळजापुर,लोहारा ,उस्मानाबाद येथील कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या .
एकल महिलांना संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ योजना,तसेच रेशन कार्ड,व धान्य मिळत नाही तसेच अनेक महिलांना पंचायत समीती कडून घरकुलाचा लाभ मिळत नाही , जास्त आलेले विज कमी केले जात नसल्याच्या तक्रारी महिलांनी मांडल्या .
एकल महिलांना संजय गांधी , श्रावणबाळ योजनेचा लाभ दयावा महगाई कमी करावी,घरकुल देण्यात यावे,ज्या महिलांना रेशन कार्ड नाही त्यांना रेशन कार्ड देण्यात यावे,ज्यां महिलांना धान्य मिळत नाही त्यांना तात्काळ धान्य वाटप करावे,हिंगणगाव येथे बस सेवा सुरू करावी इत्यादी मागण्याचे निवेदन नायब तहसिलदार गणेश सुपे यांना देण्यात आले या वेळी सहाय्यक पोलिस निरिक्षक राजकुमार ससाने,तलाठी विनोद चुकेवाड यांची उपस्थिती होती.
या आंदोलनात संघटनेच्या तालूका अध्यक्षा मंदा पाटील , सचिव अनिता नवले,अनुराधा अंबुरे,नौशाद सय्यद गिरिजाबाई गायकवाड,उर्मीला महंतराज, कांता शिंदे,अश्वीनी शेळके,लक्ष्मी चौधरी,पुनम मोरे,गिरजाबाई गायकवाड,श्रीमती मारकड यांच्या सह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या .


No comments:
Post a Comment