Tuesday, 20 April 2021

वाशी शहराच्या पाणीपुरवठा जलवाहिनिची दुरूस्ती सुरू


     वाशी शहराच्या पाणीपुरवठा जलवाहिनिची दुरूस्ती सुरू, 

    तात्काळ दुरूस्ती साठी प्रयत्न .

    वाशी : शहराला पाणीपुरवठा करण्यार्या  जलवाहिनिवर मालवाहू ट्रक पलटी झाल्याने शहरात मागील दोन दिवसापासून पाणीपुरवठा बंद आहे. फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी दोन दिवसाचा अवधी लागण्याची शक्यता आहे. परिणामी शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. 

    राष्ट्रीय महामार्गालगत बीड येथून उस्मानाबाद कडे जाणारा मालवाहतुक ट्रक (एमपी. ०९ एचएच ०४६९) सोमवार (दि.१९) रोजी वंजरवाडी तलावातून शहराला पाणीपुरवठा करण्यार्यान लोखंडी जलवाहिनीवर पलटी झाला. त्यामुळे शहराची जलवाहिनी फुटली परिणामी मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. ऐन उन्हाळयात शहराला अगोदरच चार दिवसानंतर  पाणीपुरवठा केला जातो. त्यातच आता जलवाहिनी फुटल्याने शहरातील बहुतांशी भागात आठ ते दहा दिवसाची निर्जळी असणार आहे. परिणामी नागरिकाणा पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. जलवाहिनी दुरूस्ती साठी नगरपंचायत प्रशासन व पाणीपुरवठा विभागाकडून तत्काळ दुरूस्ती सुरू  केली आहे.  पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी काही दिवसाचा अवधि जाणार असून उपलब्ध पाण्याचे शहारवसीयणी काटेकोर नियोजन करणे गरजेचे आहे.

    No comments:

    Post a Comment