Saturday, 24 April 2021

मी तुमचा “प्राणवायू” म्हणजेच “ऑक्सीजन” बोलतोय

          मी  तुमचा “प्राणवायू”                  म्हणजेच....“ऑक्सीजन” बोलतोय !

वाशी/ विक्रांत उंदरे 

 “नमस्कार, मी तुमचा “प्राणवायू” म्हणजेच “ऑक्सीजन” बोलतोय”; ‘आवाज येतोय ना माझा तुम्हाला?’ ‘आवाज पोहोचत असेल असच समजून मी आपल्याशी काही बोलायला आलो आहे. माझ्या “निसर्ग” नावाच्या कुटुंबाच्या काही अडीअडचणी आणि आमच्या भावना नेहमीप्रमाणेच आताही तुम्हाला सांगान्याचा प्रयत्न करतोय. यावेळी फक्त बदल एवढाच आहे की, माझ्या कुटुंबाने ही जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. आशा आहे आता तरी तुम्ही आमच्या समस्या समजून घेताल आणि तुमच्या वागण्यात काहीतरी ‘पर्यावरण पूरक’ बदल होईल. 

“तु तर खूप मोठा झालास रे” , “तु आता रेल्वेने , जहाजाने फिरू लागलास म्हणे”, असे म्हणून माझा मोठा भाऊ नायट्रोजन मला बोलत होता. एवढ्यातच माझा लहाना भाऊ कार्बनडाय ऑक्साइड मला म्हणाला “काल परवा तर न्यायालयानेच तुझी ‘भीक मागा, चोरी करा पण ऑक्सीजन उपलब्ध करा’ असेच निर्देश दिल्याचे एकायला आले.” हे सांगत असतानाच त्याने “महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे हात जोडून ‘पाया पडतो पण आम्हाला ऑक्सीजन द्या’ आशी आर्त विनवणी केली म्हणे , हे  खरय का ? अशी विचारणा केली. त्यावर मी निशब्द होतो.  तर आर्गोंन, नियोन, हेलियम, मिथेन, हयड्रोजन, ओझोन , झेंनिन, क्रिपटोण हे लहान बांधव यांची मात्र निरागसपणे  किलबिल सुरू होती. 

आमच्या आईसाहेब हवा हे शांतपणे एकूण घेत होत्या आणि मानसाच्या कोविड च्या या बिकट काळात सुरू असलेल्या चिंताजनक परिस्थितीच आकलन करत होत्या. त्यावर आईने मला जवळ घेतलं आणि मला म्हणाली “प्रथ्वीवरील प्रत्येक प्राण्याला तुझी गरज आहे. प्रत्येक साजिवात प्राण राहण्यासाठी तुझी आवश्यकता आहे. म्हणूनच तुझ नाव प्राणवायू आहे. हे खर आहे की, तुला तेवढं महत्व दिला जात न्हवत; कारण तु मोफत मिळतोस आणि सहज उपलब्ध होतास म्हणून दुर्लक्षित होतास. 

पण तुझं महत्व तर अनन्यसाधारण आहेच आणि आज मात्र ते अधोरेखीत होतय.” हे बोलतानाच तिला नाशिक येथे झालेल्या दुर्घटनेची आठवन झाली आणि तिचे डोळे पाणावले. दबक्या आवाजात हुंदका देत ती म्हणाली “काही रुग्णांनाच तुझा पुरवठा करण्यात मानव कमी पडतोय आणि तु न मिळाल्याने किती निष्पापाणा आपले प्राण गमवावे लागत आहेत रे” असे म्हणत तिने मला कवठाळले. मग मी विचार केला की माणूस सध्या कोट्यवधी रुपये खर्चूनही काही रुग्णांना ऑक्सीजन देण्यात कमी पडतोय तो पुरेसा पुरवठा करू शकत नाही.  निसर्ग मात्र अविरत पणे सातत्यापूर्ण ऑक्सीजनचा पुरवठा करतोय’ त्या बदल्यात माणूस निसर्गाला काय देतोय? तर फक्त पर्यावरण आणि निसर्गाची हानीच.


आणि मग मी ठरवलं आज मानवाला बोलायचच कसल्याही परिस्थितित ; त्याच्या चुकामुळे आमच्या निसर्गाला होत असलेल्या वेदना , आमची होत असलेली हानी त्याला सांगायचीच. “ आमची ही सहनशक्ति संपते कधी कधी आणि मग निसर्गाचा प्रकोप होतो ; तो तुम्हाला सहन होत नाही. म्हणून माझी एकच विनंती आहे तुमचा विकास करताना आमचा पण थोडातरी विचार करा , आमच्या पण भावना समजून घ्या. निसर्गाने केलेला प्रकोप हा प्रकोप नसतो. तर तुम्ही केलेल्या निसर्गाच्या हानी सुधारन्यासाठी ती दीलेली एक संधि असते. 

  ऑक्सीजनचा पुरवठा करण्यासंधरबात बैठकांचे सत्र सुरू आहेत. त्यातून ऑक्सीजनचे उत्पादन वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. ती आजची गरज आहेच ते करावेच लागेल यात शंकाच नाही. मात्र हे माणसा निसर्गातील ऑक्सीजन चे घटत चाललेले प्रमाण वाढवण्यासाठी तु काय करतोस. ऑक्सीजन सिलेंडर भरण्याठी तु मोठ मोठे प्लांट लावशील आणि ऑक्सीजन सिलेंडर रीफील करशील पण या प्रथ्वीतलावरील ऑक्सीजन रीफील करणारे वृक्षरूपी प्लांट कधी उभा करणार ?. आज होत असलेली झाडांची तोड, वाढत असलेले वायुप्रदूषण यावर कसा अंकुश लावणार?. काही लोकांना ऑक्सीजन पुरवठा करण्यात तुम्ही हतबल आहात तर  विचार करा जर वेळीच तुम्ही सुधारले नाहीत तर एक दिवस असाही येईल की प्रत्येकाला ऑक्सीजन पुरवावा लागेल. त्यावेळी तुमच्या यंत्रणा  कोलमडून जातील. एकच यंत्रणा अशावेळी तुम्हाला उपयोगी पडेल ती आमची निसर्गाची यंत्रणा. आणि तुमच्या चुका तिलाही पोखरून टाकत आहेत. जर निसर्गही हतबल झाला तर हे मानवा तुझ अस्तित्वला कुठे तरी धोका आहे. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. तुला आता माझे महत्व लक्षात आले आहे. आता तरी तुझ्या पृव्रत्तीत सुधार कर , तुझ्या “सेल्फिश” स्वभावात बदल कर आणि निसर्गाला जप.



म्हणून माझ एक सांगणं आहे. रोपे लावा आणि ती जगवून त्याची झाडे करा, उपलब्ध वृक्ष आता तरी तोडू नका त्याचे संवर्धन करा. ज्याप्रमाणे आज शासन ऑक्सीजन उपलब्धतेसाठी युद्धपातलीवर प्रयत्न करत आहे. तसेच प्रयत्न आता पर्यावरण रक्षणासाठी सुद्धा होणे गरजेचे आहेत. पर्यावरणाची जर अशीच हानी होत राहिली तर येणार्या् काळात माझी निसर्गातील उपलब्धता कमी होत जाईल. त्यामुळे पर्यावरण वाचवा माणूस वाचेल... 

आता थांबतो. तुमच्याकडून आमच्या भावनाचा आणि समस्यांचा विचार होईल आणि त्यावर अमलबजावणी सुरू होईल एवढी आशा बाळगतो.  माझ्या बोलण्याने कोणाला दुख झाले असले तर माफी मागतो आणि थांबतो. एवढच .. बोलतो पुन्हा कधीतरी असाच.

No comments:

Post a Comment