नगरसेवक अजित चौधरी यांच्यामार्फत कोविड रुग्णांना मोफत अंडी वाटप
मुरूम/प्रतिनिधी
मुरूम नगर पालिकाचे नगरसेवक तथा युवासेनेचे उमरगा तालुका प्रमुख अजित चौधरी यांच्यामार्फत मुरूम येथील कोविड केअर सेंटर मधील रुग्णांना आजपासून दररोज मोफत अंडी वाटप करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आले आहे
कोरोनाच्या या काळात रुग्णाची रोग प्रतिकार शक्ती वाढावी,
रुग्ण लवकर बरे होण्यासाठी बळ मिळावे म्हणून सामाजिक बांधीलकीच्या नात्याने रुग्णांना आजपासून मोफत अंडी वाटप करण्यात येत आहे असे नगरसेवक अजित चौधरी यांनी सांगितले
मागील वर्षभरापासून चौधरी यांच्याकडून गरजू लोकांना धान्य देण्याचे कार्य सुरू आहे
या उपक्रमाचे सुरुवात करताना आरिफ कुरेशी, विशाल मोहिते, जयसिंह खंडागळे तसेच कोविड सेंटर मधील कर्मचारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment