Sunday, 31 October 2021

सेवानिवृत्ती निमित्त हनुमंत लोहार यांचा सत्कार

             सेवानिवृत्ती निमित्त 

 हनुमंत लोहार यांचा सत्कार 

उस्मानाबाद ,

                 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेड चे मुख्याध्यापक श्री.हनुमंत लोहार सेवानिवृत्त होत असल्याने त्यांना आज रोजी निरोप देण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षणविस्तार अधिकारी श्री.प्रकाश पारवे , केंद्रप्रमुख श्री.अनुरथ नागटिळक, शिक्षक संघटनेचे श्री.बापू पडवळ, श्री.शेषेराव राठोड, क्रस्टाईब संघटनेचे जिल्हा आश्रमशाळा प्रतिनिधी श्री.सतिश कुंभार, मुख्याध्यापक शिंदे सर, आश्रमशाळा पर्यवेक्षक श्री शेख सर, श्री.दिपक पोतदार, श्री.रत्नाकर पाटील उपस्थित होते.क्रास्टाईब संघटनेचे प्रतिनिधी श्री.सतिश कुंभार तर्फे आदरणीय लोहार सरांचा छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक प्रतिमा,शाल -श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला खेड व केंद्रातील शिक्षक - शिक्षीका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


Friday, 15 October 2021

दसरा शुभ चिंतन

                दसरा शुभ चिंतन

आपट्याची पानं त्याला हृदयाचा आकार

 मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार

 आनंदाच्या क्षणांना सर्वांनी केला स्वीकार

तुम्हाला सर्वांना माझ्या व माझ्या परिवाराकडून विजयादशमी व दसरा सणा निमित्त मनःपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा

 तसेच तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाने ,आनंदाने, भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो ही सदिच्छा .

Monday, 11 October 2021

भावपूर्ण श्रद्धांजली

               भावपूर्ण श्रद्धांजली


Wednesday, 6 October 2021

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

 महात्मा गांधी व लालबहादूर     शास्त्री जयंती साजरी 


 शिंगोली,

येथील विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा व आदर्श विमुक्त जाती प्राथमिक आश्रमशाळेच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला प्राथमिक मुख्याध्यापक शिंदे, पर्यवेक्षक शेख, आर. बी. पाटील, सतीश कुंभार, खबोले, पडवळ, बडदापुरे, जाधव, कांबळे व कागे तसेच शिक्षकेतर कर्मचारी माळी, भिसे, मस्के, चव्हाण, बनसोडे उपस्थित होते.