सेवानिवृत्ती निमित्त
हनुमंत लोहार यांचा सत्कार
उस्मानाबाद ,
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेड चे मुख्याध्यापक श्री.हनुमंत लोहार सेवानिवृत्त होत असल्याने त्यांना आज रोजी निरोप देण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षणविस्तार अधिकारी श्री.प्रकाश पारवे , केंद्रप्रमुख श्री.अनुरथ नागटिळक, शिक्षक संघटनेचे श्री.बापू पडवळ, श्री.शेषेराव राठोड, क्रस्टाईब संघटनेचे जिल्हा आश्रमशाळा प्रतिनिधी श्री.सतिश कुंभार, मुख्याध्यापक शिंदे सर, आश्रमशाळा पर्यवेक्षक श्री शेख सर, श्री.दिपक पोतदार, श्री.रत्नाकर पाटील उपस्थित होते.क्रास्टाईब संघटनेचे प्रतिनिधी श्री.सतिश कुंभार तर्फे आदरणीय लोहार सरांचा छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक प्रतिमा,शाल -श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला खेड व केंद्रातील शिक्षक - शिक्षीका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
