Tuesday, 27 April 2021

नळदुर्ग चे सुपुत्र झिया शेख याने सहकारी विद्यार्थ्यांसोबत तयार केला लो कॉस्ट ऑक्सिजन व्हेंटिलेटर

 नळदुर्ग चे सुपुत्र झिया शेख याने सहकारी विद्यार्थ्यांसोबत तयार केला 

      लो कॉस्ट ऑक्सिजन व्हेंटिलेटर


नळदुर्ग :-  नळदुर्ग चे सुपुत्र झिया शेख व त्यांच्या सहकारी विद्यार्थ्यांनी  कारच्या वायपर मोटारचा वापर करून बनविले आहे लो काॅस्ट ऑक्सिजन व्हेंटिलेटर.या विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकीचे शिक्षण येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागातुन झाले आहे. सध्या कोरोना महामारीमुळे आज अनेक रुग्णांना अत्यावश्यक असलेल्या ऑक्सिजन व्हेंटिलेटरची सोय करणे कठीण होत चालले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर याचा फार मोठा ताण पडत आहे. आरोग्य यंत्रणेवर येणारा हा ताण लक्षात घेता सोलापुर येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले झिया मुनीर शेख, संतोषी वाले व पुजा गुरव या विद्यार्थ्यांनी आपत्कालीन व्हेंटिलेटर सिस्टीम तयार केली आहे.



 यामध्ये प्रामुख्याने रुग्णाला जेवढ्या ऑक्सिजनची गरज आहे तेवढाच तो घेईल. यावरून या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या लो काॅस्ट व्हेंटिलेटरची कार्यक्षमता लक्षात येते. त्याचबरोबर ऑटोमॅटिक मशिनद्वारे त्याचे पल्स रेट मोजले जातील. जेणेकरून उपचार करताना डॉक्टरांना यामुळे सोपे पडेल. महागड्या व्हेंटिलेटर सिस्टिमच्या तुलनेत ही यंत्रणा अगदी कमी किमतीत असल्याने या व्हेंटिलेटरचे नाव विद्यार्थ्यांनी लो काॅस्ट ऑक्सिजन व्हेंटिलेटर असे ठेवले आहे. ही सिस्टीम बनविण्यासाठी या विद्यार्थ्यांना प्रा. डॉ. शशिकांत हिप्परगी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ऑक्सिजन व्हेंटिलेटरमुळे प्रत्येक रुग्णालयात त्याच्या अभावामुळे आज कित्येक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी व रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी कमी किमतीचे व्हेंटिलेटर बनविण्याचा आणि प्रत्येक छोट्या, छोट्या रुग्णालयात व ग्रामीण भागातील रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे असे झिया मुनीर शेख याने म्हटले आहे.          


*************************
हे व्हेंटिलेटर असे कार्य करते

या व्हेंटिलेटरमध्ये एएमवीयू बॅग, कृत्रिम मॅन्युअल ब्रिथिंग युनिट बॅग आणि त्यातुन बाहेर येणारी हवा दाबुन रुग्णाला योग्य असा ऑक्सिजन पुरवठा व्हावा अशी सोय करण्यात आली आहे. एएमवीयू बॅग दाबण्यासाठी मोटारीच्या वायपरची मोटार वापरली आहे. त्याचबरोबर मानवी श्वासोच्छ्वासानुसार त्या मोटारीचा वेग नियंत्रित करण्यासाठी स्पीड कंट्रोलर वापरला आहे. हा प्रकल्प सुरुवातीला सेन्सर वापरून रुग्णाच्या ह्रदयाचा ठोका तपासतो. त्याचा डाटा इनपुट म्हणुन दिला जातो. रुग्णाच्या ह्रदयाचा ठोका किंवा नाडीची स्थिती आर्दूनोच्या मदतीने दर्शवितो. यानंतर डॉक्टरांच्या मदतीने वायूबीजने सेट केले जाते. यामध्ये चार चाकी गाड्याचे वायपर मोटारीचा वापर करून अगदी कमी किमतीत हे व्हेंटिलेटर प्रयोजिक तत्त्वावर बनवले आहे. यामध्ये आरोग्य क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेऊन हे व्हेंटिलेटर बाजारात विक्री साठी असल्याचेही झिया शेख याने म्हटले आहे. 
*************************
नळदुर्गच्या झिया शेख व त्यांच्या सहकारी विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे लो काॅस्ट ऑक्सिजन व्हेंटिलेटर आजच्या कोरोनाच्या महामारीच्या काळात गरीबांसाठी दिलासा देणारे आहे. असे आरंभ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचिव व भाजयुमोचे शहर अध्यक्ष श्रमिक पोतदार यांनी म्हटले असुन झिया शेख ची ही कामगिरी दैदिप्यमान व कौतुकास्पद आहे असेही श्रमिक पोतदार यांनी म्हटले आहे.
**************************
 नळदुर्ग नगरपालिकेतील कर्मचारी मुनीर शेख यांचे चिरंजीव झिया शेख यांने लो कास्ट ऑक्सिजन व्हेंटिलेटर तयार करून नळदुर्ग शहराचा नावलौकिक केल्या बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक करुन अभिनंदन केले जात आहे.

No comments:

Post a Comment

तेरणा पब्लिक स्कूल मध्ये इको फ्रेंडली गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा संपन्न

  तेरणा पब्लिक स्कूल मध्ये इको फ्रेंडली     गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा संपन्न उस्मानाबाद, उस्मानाबाद येथील तेरणा पब्लिक स्कूलमध्ये पर्या...