तेरणा पब्लिक स्कूल मध्ये इको फ्रेंडली गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा संपन्न
उस्मानाबाद,
उस्मानाबाद येथील तेरणा पब्लिक स्कूलमध्ये पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा दिनांक 29 ऑगस्ट रोजी प्राचार्य श्री विलास बचाटे यांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडली.
सदर कार्यशाळेमध्ये चौथी ते सातवी पर्यंतच्या दोनशे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. माती, हळदी- कुंकू, नैसर्गिक रंग, जलरंग यांचा वापर करून विद्यार्थ्यांनी गणेश मूर्ती रंगविल्या व नंतर शाळेत त्याचे प्रदर्शन भरवण्यात आले. सदर प्रदर्शनास विद्यार्थी व पालक वर्गाने मोठा प्रतिसाद दिला. पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेची संकल्पना प्राचार्य श्री. विलास बचाटे सर यांची होती तर मार्गदर्शन कलाशिक्षक अमोल शिंदे यांचे होते.


No comments:
Post a Comment