Tuesday, 7 December 2021

शिंगोली आश्रमशाळेत महामानवास अभिवादन

                       

शिंगोली आश्रमशाळेत महामानवास अभिवाद

शिंगोली,

विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा व आदर्श विमुक्त जाती प्राथमिक आश्रमशाळा, शिंगोली ता.उस्मानाबाद  शाळेत संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन  करण्यात आले.सर्व प्रथम मुख्याध्यापक श्री.राठोड सर,श्री.शिंदे सर, पर्यवेक्षक श्री शेख सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.रत्नाकर पाटील सर,श्री.सतिश कुंभार सर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रमाला शाळेतील श्री.खबोले सर,श्री.शानिमे सर,श्री.बडदापूरे सर तसेच शिक्षकेतर कर्मचारी भिसे, माळी,मस्के, चव्हाण  उपस्थित होते. या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमात श्रीमती कांबळे नी "भिम वंदना गीत" सादर केले.सदरिल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील आर.बी.सरांनी व आभार प्रदर्शन पडवळ सरांनी केले.

तेरणा पब्लिक स्कूल मध्ये इको फ्रेंडली गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा संपन्न

  तेरणा पब्लिक स्कूल मध्ये इको फ्रेंडली     गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा संपन्न उस्मानाबाद, उस्मानाबाद येथील तेरणा पब्लिक स्कूलमध्ये पर्या...