नळदुर्ग चे सुपुत्र झिया शेख याने सहकारी विद्यार्थ्यांसोबत तयार केला
लो कॉस्ट ऑक्सिजन व्हेंटिलेटर
नळदुर्ग :- नळदुर्ग चे सुपुत्र झिया शेख व त्यांच्या सहकारी विद्यार्थ्यांनी कारच्या वायपर मोटारचा वापर करून बनविले आहे लो काॅस्ट ऑक्सिजन व्हेंटिलेटर.या विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकीचे शिक्षण येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागातुन झाले आहे. सध्या कोरोना महामारीमुळे आज अनेक रुग्णांना अत्यावश्यक असलेल्या ऑक्सिजन व्हेंटिलेटरची सोय करणे कठीण होत चालले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर याचा फार मोठा ताण पडत आहे. आरोग्य यंत्रणेवर येणारा हा ताण लक्षात घेता सोलापुर येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले झिया मुनीर शेख, संतोषी वाले व पुजा गुरव या विद्यार्थ्यांनी आपत्कालीन व्हेंटिलेटर सिस्टीम तयार केली आहे.
यामध्ये प्रामुख्याने रुग्णाला जेवढ्या ऑक्सिजनची गरज आहे तेवढाच तो घेईल. यावरून या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या लो काॅस्ट व्हेंटिलेटरची कार्यक्षमता लक्षात येते. त्याचबरोबर ऑटोमॅटिक मशिनद्वारे त्याचे पल्स रेट मोजले जातील. जेणेकरून उपचार करताना डॉक्टरांना यामुळे सोपे पडेल. महागड्या व्हेंटिलेटर सिस्टिमच्या तुलनेत ही यंत्रणा अगदी कमी किमतीत असल्याने या व्हेंटिलेटरचे नाव विद्यार्थ्यांनी लो काॅस्ट ऑक्सिजन व्हेंटिलेटर असे ठेवले आहे. ही सिस्टीम बनविण्यासाठी या विद्यार्थ्यांना प्रा. डॉ. शशिकांत हिप्परगी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ऑक्सिजन व्हेंटिलेटरमुळे प्रत्येक रुग्णालयात त्याच्या अभावामुळे आज कित्येक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी व रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी कमी किमतीचे व्हेंटिलेटर बनविण्याचा आणि प्रत्येक छोट्या, छोट्या रुग्णालयात व ग्रामीण भागातील रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे असे झिया मुनीर शेख याने म्हटले आहे.


No comments:
Post a Comment