Saturday, 13 November 2021

मुरूम येथे शहर व्यापारी संघटना, विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनेतील पदाधिकाऱ्यांची बैठक

 


सोशल मीडियासह अफवांवरील मेसेजवर विश्वास ठेवू नये-उपविभागीय पोलीस अधिकारी बरकते यांचे आवाहन 

मुरूम/प्रतिनिधी

 मागील कांही दिवसापासून सोशल मीडिया आणि कांही प्रसार माध्यमातून शांतता बिघडवणारे मेसेज व्हायरल होत आहेत अश्या मेसेजवर आणि होणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन उमरगाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी केले आहे मुरूम पोलीस ठाणेत शनिवारी सांयकाळी शहर व्यापारी संघटना, विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनेतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी सोशल मीडिया तसेच इतर समाजमाध्यमावरील अफवात्मक बातमीवर विश्वास ठेवू नये, त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडते, असे काही संशयित कृत्य निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस प्रशासनास कळवून सहकार्य करावे असे आवाहन केले .

यावेळी मुरूम शहरातील चंद्रशेखर मुदकण्णा,श्रीकांत मीणियार,बबन बनसोडे, अशोक मिनीयार, उल्हास घुरघुरे,विठ्ठल पाटील,शरणप्पा गायकवाड, बाबा कुरेशी,गुलाब डोंगरे,जगदीश निंबरगे, किरण गायकवाड, आनंद कांबळे, यासह शहरातील विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार आदी उपस्थित होते. यावेळी विविध सामाजिक संघटना,व्यापारी संघटना यांच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी बरकते यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी सहाययक पोलीस निरीक्षक ए .एन. माळी यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment