Monday, 30 May 2022

खा. सुप्रिया सुळे यांना आश्रम शाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत होण्याकरिता निवेदन

 आश्रम शाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत होण्याकरिता खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन

यावरती कायमचा तोडगा काढू असे खा. सुप्रिया सुळे यांचेआश्वासन

उस्मानाबाद,

वाड्या वस्ती वरती ज्ञानदानाचे काम करणारा शिक्षक दोन-दोन महिने वेतनापासून वंचित राहत आहे. त्यामुळे त्याच्याकडे खाजगी सावकाराकडे हात पसरण्याची वेळ आलेली आहे. समाज कल्याण विभागाअंतर्गत सुरू असलेल्या उस्मानाबाद जिल्हा तील आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन हे इतर विभागाप्रमाणे नियमित होत नसल्या कारणाने दोन-दोन महिने वेतने रखडली जात आहेत. त्यामुळे सदर शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांवरती उपासमारीची वेळ येऊन ठेपलेली दिसत आहे. 

   महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ उस्मानाबाद शाखेचे आश्रमशाळा प्रतिनिधी श्री सतीश कुंभार यांनी यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, शिक्षक आमदार विक्रम काळे, तसेच जिल्हाधिकारी' समाज कल्याण अधिकारी, आयुक्त, उपायुक्त यांकडे वारंवार निवेदने देऊनही त्यावरती कसलीच कारवाई झाली नसल्यामुळे आश्रम शाळा शिक्षक व कर्मचारी वृंद सदर मान्यवर यांवरती नाराज झालेला दिसत आहे. आज रोजी आश्रम शाळा प्रतिनिधी सतीश कुंभार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्यामध्ये त्यांना सदर आश्रम शाळा शिक्षकांच्या व्यथा सांगून निवेदन दिले. ह्या व्यथा ऐकून घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी "यावरती कायमचा तोडगा काढू "असे आश्वासन दिले.

उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करा स्वतंत्र विद्यापीठ निर्माण कृती समितीचे राज्यपालांना निवेदन

 उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करा

स्वतंत्र विद्यापीठ निर्माण कृती समितीचे राज्यपालांना निवेदन


उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठास मान्यता द्यावी, त्याचबरोबर 

या विद्यापीठाला मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर यांचे नाव द्यावे


उस्मानाबाद - 

उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी स्वतंत्र विद्यापीठ निर्माण कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना आज (दि.30) जिल्हाधिकार्‍यांनामार्फत मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. 


स्वतंत्र विद्यापीठ निर्मितीच्या अनुषंगाने उस्मानाबाद येथे कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची आज बैठक होऊन त्यानंतर मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांमार्फत राज्यपालांना पाठविण्यात आले. 

निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद जिल्हा हा नीती आयोगाच्या सर्वेनुसार देशातील मागासलेल्या जिल्ह्यांच्या यादीत तिसर्‍या क्रमांकावर आहे. सतत दुष्काळात होरपळत असलेला हा जिल्हा निजाम राजवटीपासून मागासलेलाच आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात मुलींचे शिक्षणाचेप्रमाण आजही अल्यल्प आहे. तसेच उस्मानाबाद ते औरंगाबाद हे अंतर 250 किलोमीटर आहे. उस्मानाबाद जिल्ह्याची प्रगती करावयाची असेल तर शैक्षणिक प्रगती होणे आवश्यक आहे आणि येथील शैक्षणिक मागासलेपण दूर करायचे असेल तर उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ होणे आवश्यक आहे. म्हणून राज्यपाल महोदयांनी उस्मानाबादकरांच्या भावनांचा विचार करुन जिल्ह्यात लवकरात लवकर स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करुन येथील विद्यार्थ्यांना जागतिक व देशातील विविध स्पर्धेत टिकण्याची संधी उपलब्ध करुन द्यावी. 


सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र आहे. उपकेंद्राकडे 60 एकर मालकीची जागा आहे. यु.जी.सी.च्या निकषानुसार स्वतंत्र विद्यापीठासाठी लागणार्‍या आवश्यक बाबी सदर उपकेंद्रात असल्याने स्वतंत्र विद्यापीठ निर्मितीसाठी कसलीही अडचण नाही. सध्याच्या उपकेंद्राची इमारत सुसज्ज असून मुलांचे वसतिगृह आहे. विविध दहा विभाग आहेत. तरी उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठास मान्यता द्यावी, त्याचबरोबर या विद्यापीठाला मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनावर कृती समितीचे अध्यक्ष धनंजय शिंगाडे, उपाध्यक्ष प्रा.संजय कांबळे, सचिव राजाभाऊ ओव्हाळ, सदस्य संजय वाघमारे, प्रा.महेंद्र चंदनशिवे, दिलीप वाघमारे, संजय बनसोडे, हरिष डावरे, बाबासाहेब बनसोडे, प्रा.रवि सुरवसे, प्रा.राजा जगताप, दिलीप भालेराव, प्रा.जे.जी. लोकरे, मारुती बनसोडे, राम बनसोडे, आनंद पांडागळे, तानाजी माटे, बंडूभाऊ बनसोडे, अरुण बनसोडे, तानाजी बनसोडे, उदय बनसोडे, पृथ्वीराज चिलवंत, विजय बनसोडे, कानिफनाथ देवकुळे, सतीश कसबे, भागवत शिंदे, रमेश माने, अ‍ॅड.प्रदीप हुंबे, भाई फुलचंद गायकवाड, प्रताप कदम, दादा सरवदे, उमेश गायकवाड, सुरवसे, सोमनाथ गायकवाड, भालचंद्र कटारे, अरुण माने, बाबुराव शिंदे, प्रदीप बनसोडे आदींची स्वाक्षरी आहे. 


स्वतंत्र विद्यापीठ निर्माण व्हावे ही मागणी आम्ही अनेक वर्षापासून महाराष्ट्र शासन आणि विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे करीत आहोत. उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ निर्माण झाले तर मागास म्हणून ओळखल्या जाणार्‍या या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक उद्दिष्ट पूर्ण होऊ शकणार आहे.

*- धनंजय शिंगाडे*

अध्यक्ष, स्वतंत्र विद्यापीठ निर्माण कृती समिती


उस्मानाबाद येथे आज आंबेडकरी चळवळीतील शिक्षणप्रेमी विधिज्ञ, साहित्यिक, सामाजिकसह विविध क्षेत्रातील व्यक्तींची बैठक झाली. या बैठकीत उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ निर्मितीसाठी कृती समितीची स्थापन करण्याचा निर्णय झाला. स्वतंत्र विद्यापीठ निर्माण होईपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार आहोत.

*- राजाभाऊ ओव्हाळ*

सचिव, स्वतंत्र विद्यापीठ निर्माण कृती समिती



महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ.प्रकाश बच्छाव यांनी स्वतंत्र विद्यापीठ निर्मितीच्या अनुषंगाने नुकतीच उस्मानाबाद येथील उपकेंद्रास भेट देऊन पाहणी केलेली आहे. येथील भौगोलिक विचार करता उस्मानाबाद येथे विद्यापीठ होणे गरजेचे असून हे विद्यापीठ आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

*- प्रा.संजय कांबळे*

उपाध्यक्ष, स्वतंत्र विद्यापीठ निर्माण कृती समिती

Sunday, 8 May 2022

डाॅ.शंकरराव खरातांनी साहित्यातून वंचित मानसांच्या वेदनांचे चिञण मांडले—प्रा.राजा जगताप


डाॅ.शंकरराव खरातांनी साहित्यातून वंचित मानसांच्या वेदनांचे चिञण मांडले—प्रा.राजा जगताप



उस्मानाबाद दि.८(प्रतिनिधी) 

डाॅ.शंकरराव खरात यांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास मिळाला होता व त्यांचे समवेत कार्य ही केले होते ,त्यामुळे डाॅ.शंकरराव खरातांच्या वडीलांनी तराळकी करत त्यांना उच्य शिक्षण देऊन तेंव्हाचे मराठवाडा विद्यापीठ ,आताचे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू केले होते त्याचा इतिहास त्यांनी "तराळ अंतराळ"या आत्मकथनात मांडलेला आहे.डाॅ.शंकरराव खरातांनी आटपाडी सारख्या ठिकानी जे भोगले होते व अनुभवले होते ते कधीही विसरले नाहित सूरवातीला त्यांनी पुण्यासारख्या ठिकानी वकीली केली व उपेक्षित माणसाला न्याय दिला.त्यांनी दहा कादंब—या,बारा कथासंग्रह,पाच ललित संग्रह,वैचारिक आठ ग्रंथ लिहीले व केवळ दलित साहित्यच नाही तर मराठी साहित्य त्यांनी समृध्द केले. त्यामुळेच १९८४ला जळगाव येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष झाले होते.आपल्या साहित्यातून त्यांनी गावकुसाबाहेरील व भटक्या विमुक्त व बारा बलुतेदारी करणा—या उपेक्षित व वंचित माणसांच्या व्यथा व वेदना त्यांनी साहित्यातून मांडल्याचे प्रतिपादन लेखक प्रा.राजा जगताप यांनी डाॅ.शंकरराव खरात प्रतिष्ठान आटपाडी, जि.सांगली.व बहुजन संघटक लाईव्ह फेसबुक पेज यांनी डाॅ.शंकराव खरात यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्त नुकत्याच आॅनलाईनने आयोजित केलेल्या "डाॅ.शंकरराव खरात व्यक्ती आणि वाड्:मय"" या विषयावर बोलताना उस्मानाबाद येथून केले आहे.अध्यक्षस्थानी डाॅ.शंकरराव खरात प्रतिष्ठानचे सचिव विलास खरात होते.यावेळी आॅनलाईनने महाराष्ट्रातील शंकरराव खरात यांचेवर प्रेम करणारे मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रमुख वक्ते यांचा परीचय बहुजन संघटकचे राहूल खांडेकर यांनी करून दिला.

पुढे बोलताना प्रा.जगताप म्हणाले की,डाॅ.शंकरराव खरातांनी साहित्य लेखन करतानाच सामाजिक व शैक्षणिक क्षेञातही योगदान दिले आहे.सांगोला तालुक्यातील चोपडी येथे ,त्यावेळी पिण्याच्या पाण्याच्या विहीरीचे उदघाटन करून त्यांनी तेथील होलार समाजातील नाना भागाप्पा केंगारच्या अकरावी पास झालेल्या शंकरला सरकारी नौकरी लावायला मदत केली होती.१९४६मध्ये आटपाडी येथील डबई कुरणातील जमिन त्यावेळी सरकारने दलित समाजाला कसायला दिली होती परंतु सनदी अधिकारी आडकाठी आणत होते ती जमिन डाॅ.शंकरराव खरातांनी डाॅ.बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मिळवून दिली होती.

डाॅ.शंकरराव खरातांनी देशाचा सुवर्ण महोत्सव सूरू असताना ते आटपाडी परीसरातील दलित समाज,भटका व विमुक्त समाज आणि बलुतेदारी करणारा वंचित समाज यांचे दारोदारी जाऊन त्यांचा विकास झाला का? याचा शोध घेऊन त्यांनी "स्वातंञ्य कुणाच्या दारी?" हा ललित लेख संग्रह लिहीला व उपेक्षितांच्या व्यथा,वेदना त्यांनी मांडल्या.

शेवटी व्याख्यानाचा समारोप करताना आटपाडी गावचे भूषण, साहित्यरत्न डाॅ.शंकरराव खरात यांच्या साहित्याची जपनुक होण्यासाठी त्यांचे जन्मशताब्दी वर्षात त्यांचे स्मारक बांधावे व त्यासाठी राज्य शासनाने सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

यावेळी डाॅ.शंकरराव खरात प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डाॅ.शकुंतला शंकरराव खरात,उपाध्यक्ष डाॅ.रविंद्र खरात ,बहुजन संघटकचे राहूल खांडेकर,हरिष स्थुल,सौरभ गणार उपस्थित होते.

Thursday, 5 May 2022

“ग्रामीण भागातील होतकरु तरुणांसाठी ‘रुरल टॅलेंट हंट’ या उन्हाळी शिबीराचे कळंब येथे आयोजन.”

 ग्रामीण भागातील होतकरु तरुणांसाठी ‘रुरल टॅलेंट    हंट’ या उन्हाळी शिबीराचे कळंब येथे आयोजन.

             ग्रामीण भागातील होतकरु व महत्त्वाकांक्षी तरुणांचा शोध घेउन त्यांना ध्येय प्राप्तीच्या उद्देशाने योग्य मार्गदर्शन होण्यासाठी ‘रुरल टॅलेंट हंट’ या उन्हाळी शिबीराचे आयोजन करण्याची संकल्पना मा. पोलीस अधीक्षक श्रीमती नीवा जैन यांनी मांडली होती. यातून कळंब उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी हा उपक्रम कळंब तालूक्यात राबविण्याचे ठरवले. कळंब तालूक्यातील निवडक अशा 150 विद्यार्थ्याकरीता दि. 02- 08 मे ‘रुरल टॅलेंट हंट’ या साप्ताहीक शिबीराचे आयोजन करण्यात आले असून मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कळंब श्री. महेश ठोंबरे यांच्या हस्ते दि. 02 मे रोजी या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. जिद्द, चिकाटी व परिश्रम, आवड यांची जोड असल्यास यश नक्कीच मिळते. असे आवाहन या प्रसंगी न्यायदंडाधिकारी महोदयांनी उपस्थितांना केले.


या शिबीरात युवकांना बौध्दीक दृष्टीकोनातून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन करण्यात येत असून दि. 08 मे या शेवटच्या दिवशी ‍मॅरेथॉन स्पर्धा व रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. अशी माहिती सहायक पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी या प्रसंगी देउन शिबीराचा अधिकाधीक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

या कार्यक्रमास शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे प्राचार्य- श्री. सुनिल पवार, नायब तहसिलदार- श्री. सांगळे, कळंब पो.ठा.चे पोलीस निरीक्षक- श्री. यशवंत जाधव यांसह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

Sunday, 1 May 2022

रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाराष्ट्र दिनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न


  रामकृष्ण परमहंस     महाविद्यालयात
 महाराष्ट्र दिनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न


उस्मानाबाद (प्रतिनिधी)दि.१

  •  येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिनामित्त मा. प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी रामकृष्ण परमहंस महाविद्यालय,श्रीमती सुशिलादेवी साळुंखे अध्यापक विद्यालय, डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय, डीएड अध्यापक विद्यालय या चार शाखांचा एकञित संयुक्त कार्यक्रम डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय मध्ये संपन्न झाला.

  •  समारंभाच्या अध्यक्षस्थानी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य व श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख डाॅ. जयसिंगराव देशमुख होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. व्हि.जे.शिंदे यांनी केले यावेळी माजी प्राचार्य बी. एस चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. सदर समारंभामध्ये रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील अकरावी आर्टस, कॉमर्स व सायन्स या वर्गाचा महाराष्ट्र दिनी निकाल जाहीर करण्यात आला. विज्ञान विभागात श्री. जंगम ओम सिध्देश्वर ९४% प्रथम क्रमांक, कुमारी धिमधिमे मानसी राजेंद्र ८८.८३% द्वितीय , कुमारी शिंदे स्नेहा संतोष ८८%तृतीय, वाणिज्य शाखेमध्ये कुमारी मगर वैष्णवी दत्तात्रेय ८०.६६% प्रथम, कुमारी देशमुख साक्षी प्रशांत ७९.८३%% द्वितीय, कुमारी बोबडे ज्योती मारुती ७९.३३% तृतीय क्रमांक, कला शाखेमध्ये श्री अमृतराव अर्जुन दत्तात्रेय ७५.५०% प्रथम क्रमांक, कुमारी ढोले प्रतीक्षा विश्वनाथ ७१.५०% द्वितीय, कुमारी घार्गे प्रजाक्ता प्रकाश ७१.३३% तृतीय,एम.सी.व्ही.सी. विभागात श्री. इंगळे विजय कुमार मकरंद ७६.१६% प्रथम ,श्री वडजे दीपक बाळासाह७३.८३%द्वितीय,श्री.गाजरे शिवप्रसाद शंकर ७२%तृतीय या गुणवंत विद्यार्थ्यांच्या बरोबरच गांधी विचार संस्कार परीक्षा(२१-२२)मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातून ११वी विज्ञानची कुमारी नंदिनी काकासाहेब प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक श्री.इंगळे आदित्य विजय १२वी वाणिज्य यांचा सत्कार प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख,प्राचार्या डाँ.सुलभा देशमुख,माजी प्राचार्य डाॅ.बी.एस.चौधरी,प्र.प्राचार्य डाॅ.व्ही.जे.शिंदे,प्र.प्राचार्य आर.आर.पवार,यशवंतराव चव्हाण म.मुक्त विद्यापीठाचे केंद्रप्रमुख प्रा.डी.एम.शिंदे या मान्यवरांचे हस्ते संपन्न झाला.प्रास्ताविक प्र.प्राचार्य डाॅ.व्हि.जे.शिंदे यांनी केले .

  1. यावेळी अध्यक्षीय समारोप करतांना प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख म्हणाले की,देशाच्या आर्थिक विकासात कामगारांच्या श्रमाला महत्व आहे.त्यांच्या श्रमामुळेच उद्योग व व्यापाराला चालना मिळते सामान्य कामगाराच्या घामावरच आज राज्याची प्रगती होत आहे.माहिती व तंत्रज्ञानात आणि यांञिकीकरणात आज आपण प्रगती केली आसली तरी कामगाराच्या श्रमाला विसरता येणार नाही.यावेळी ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार संपन्न झाले त्यांनी भविष्यात अधिक अभ्यास करून आपली प्रगती करून महाविद्यालयाचे नाव कमवावे.

  • यावेळी विस्तारअधिकारी जंगम,व पालक आणि चारही शाखेतील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
  • सूञसंचलन प्रा.डाॅ.संजय आंबेकर यांनी केले आभार प्रा.चांदणी घोगरे यांनी मानले.