Monday, 30 May 2022

खा. सुप्रिया सुळे यांना आश्रम शाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत होण्याकरिता निवेदन

 आश्रम शाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत होण्याकरिता खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन

यावरती कायमचा तोडगा काढू असे खा. सुप्रिया सुळे यांचेआश्वासन

उस्मानाबाद,

वाड्या वस्ती वरती ज्ञानदानाचे काम करणारा शिक्षक दोन-दोन महिने वेतनापासून वंचित राहत आहे. त्यामुळे त्याच्याकडे खाजगी सावकाराकडे हात पसरण्याची वेळ आलेली आहे. समाज कल्याण विभागाअंतर्गत सुरू असलेल्या उस्मानाबाद जिल्हा तील आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन हे इतर विभागाप्रमाणे नियमित होत नसल्या कारणाने दोन-दोन महिने वेतने रखडली जात आहेत. त्यामुळे सदर शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांवरती उपासमारीची वेळ येऊन ठेपलेली दिसत आहे. 

   महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ उस्मानाबाद शाखेचे आश्रमशाळा प्रतिनिधी श्री सतीश कुंभार यांनी यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, शिक्षक आमदार विक्रम काळे, तसेच जिल्हाधिकारी' समाज कल्याण अधिकारी, आयुक्त, उपायुक्त यांकडे वारंवार निवेदने देऊनही त्यावरती कसलीच कारवाई झाली नसल्यामुळे आश्रम शाळा शिक्षक व कर्मचारी वृंद सदर मान्यवर यांवरती नाराज झालेला दिसत आहे. आज रोजी आश्रम शाळा प्रतिनिधी सतीश कुंभार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्यामध्ये त्यांना सदर आश्रम शाळा शिक्षकांच्या व्यथा सांगून निवेदन दिले. ह्या व्यथा ऐकून घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी "यावरती कायमचा तोडगा काढू "असे आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment