Wednesday, 30 June 2021

रक्त साठ्याच्या तुटवड्यामुळे रक्तदान शिबिर संपन्न




  रक्त साठ्याच्या तुटवड्यामुळे रक्तदान शिबिर संपन्न

रक्त साठ्याच्या तुटवड्यामुळे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र उस्मानाबाद यांच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न


उस्मानाबाद,

शासकीय जिल्हा रुग्णालय रक्त साठ्याच्या तुटवड्यामुळे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र उस्मानाबाद यांच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न येथील रक्त संक्रमण विभागात कोरोनाच्या पार्श्वभूमी मुळे रक्त साठा तुटवडा असल्याने खा. सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र उस्मानाबाद च्या वतीने दि. ३० जुन २०२१ रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

रक्तदान शिबीराचे उद्घाटन प्रतिष्ठानचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी केले. सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन रक्तदान शिबीरे आयोजित करुन मोठ्या संख्येने रक्तदान करावे असे आवाहन शासकीय जिल्हा रुग्णालय रक्त संक्रमण अधिकारी अश्विनी गोरे यांनी केले आहे.


यावेळी किरणताई निंबाळकर, अजित शेंडगे, असिफ शेख, सलिम इस्माईल शेख, फरदिन मुजावर, कृष्णा तेरकर, सोमनाथ जगताप, किशोर राऊत, जुलफैखों काझी, अजित घुटे, वाहेद मुजावर, नितीन घुले, अनिकेत ढंगेकर आदि युवक युवतींनी शिबीरात रक्तदान केले.

शिबीर यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष जीवनराव गोरे, उपाध्यक्ष प्रा. डॉ. जयसिंगराव देशमुख, सचिव बालाजी तांबे, कोषाध्यक्ष सुरेश टेकाळे. सदस्य प्राचार्य डॉ. रमेश दापके, आदित्य गोरे, डॉ. स्मिता शहापूरकर, सुरेखा जगदाळे, डॉ. तब्बसूम सय्यद, विशेष निमंत्रित सदस्य अरविंद (दादा) गोरे, भाई धनंजय पाटील, उत्तमराव लोमटे, अॅड. सुंदरराव हुंबे, बी. बी. ठोंबरे, समन्वयक सदस्य प्रदिप चालुक्य, संतोष हंबीरे, सुरेखा जाधव, भा. न. शेळके, किरणलाई निंबाळकर, रेखा लोमटे, खलील पठाण, रॉबीन बगाडे, जैनुद्दीन शेख, शम्सुल उर्दू शाळेतील शिक्षक आदींनी प्रयत्न केले.

स्वयंसहाय्यता समुहातील महिलांनी तयार केलेल्या पोषणबागेस विजयकुमार फड यांची भेट

 स्वयंसहाय्यता समुहातील महिलांनी तयार केलेल्या पोषणबागेस डॉ.  विजयकुमार फड  यांची भेट

उस्मानाबाद,

 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत उस्मानाबाद तालुक्यातील मौजे कनगरा येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. डॉ. विजयकुमार फड यांनी भेट दिली. कनगरा येथील स्वयंसहाय्यता समुहातील महिलांनी तयार केलेल्या पोषणबागेस त्यांनी भेट दिली. पोषण परसबागा आखणीत उस्मानाबाद जिल्हा राज्यात द्वितीय आहे. गावातील सर्व महिलांनी अशाच पद्धतीने पोषण परसबागा तयार करून आपल्या कुटुंबाच्या आहारात विषमुक्त, सेंद्रिय भाजीपाल्याचा समावेश करावा, कुटुंबाचे आरोग्य चांगले ठेऊन, आरोग्यावरचा खर्च कमी करावा असे मार्गदर्शन केले. यावेळी गावातील शेतकऱ्यांशी देखील त्यांनी संवाद साधला. गावात वृक्षलागवडीसाठी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने ग्रामस्थांनी 10 हजार वृक्षांची लागवड करावी असे सांगितले. 

उडान महिला ग्रामसंघातर्गत असलेल्या एन. पी.के. उत्पादक गटाच्या शिलाई युनिटला,तसेच घरकुल मार्टला देखील त्यांनी भेट दिली,त्यांनी मागील काळात केलेला व्यवसाय, बाजारपेठ, इ.बाबत जाणुन घेतले, जिल्हयातील उमेद अंतर्गत सर्व महिलांनी अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करावेत असे त्यांनी सांगितले. सद्यस्थितीत कोरोनामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असुन त्याला लसीकरण हाच एक पर्याय असल्याने आपल्या गावातील सर्वांचे लसीकरण पूर्ण होईल यादृष्टीने प्रयत्न करावेत असे सांगितले.

‌यावेळी गावच्या सरपंच मैनाबाई तिगाडे, उपसरपंच संजय दळवे, जिल्हा अभियान व्यवस्थापक डॉ.बलविर मुंडे , जिल्हा व्यवस्थापक समाधान जोगदंड, गोरक्षनाथ भांगे, तालुका अभियान व्यवस्थापक पुजा घोगरे, तालुका व्यवस्थापक राहुल मोहरे, ग्रामसेवक शिवाजी बोचरे, उडाण महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा जन्नत अजमेर शेख, तसेच उमेद अंतर्गत कार्यरत समुदाय संसाधन व्यक्ती उपस्थित होत्या.

लोकमंगल ने शेतकऱ्यांची थकीत बिले त्वरित वाटप करावी अन्यथा राष्ट्रवादी आंदोलन करणार

 लोकमंगल ने शेतकऱ्यांची थकीत बिले त्वरित वाटप करावी अन्यथा राष्ट्रवादी आंदोलन करणार

लोहारा /प्रतिनिधी

शेतकऱ्यांनी लोकमंगल कारखान्याला ऊस पाठवून आठ महिने झाले तरी अजून ही लोहारा येथील लोकमंगल साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत.अगोदरच कोरोनाने मेटाकुटीस आलेला शेतकरी पेरणीसाठी हवालदिल झाला असून हक्काचे पैसे ही मिळत नसल्याने उध्वस्त झाला आहे.आता याविरूध्द राष्ट्रवादी कॉग्रेस तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जगादिश पाटील यांनी तहसिलदारांना दिले आहे.

घराघरात कोरोनाचे पेशंट निघत असताना शेतकऱ्यांना खाजगी सावकारांचे उंबरठे झिझवावे लागत आहेत. परंतु पोटाला चिमटा मारून कष्टाने पिकवलेल्या ऊसाचे पैसे मिळालेच नाहीत.आता पेरणीसाठी उदारीने बि - बियाने ,खते किटकनाशके सारख्या इतर बाबीसाठी बळीराजा हवालदिल झाला आहे.उस्मानाबाद जिल्हा शेतकरी आत्महत्यांसाठी देशात आघाडीवर आहे.एका माजी सहकारमंत्र्यांच्या कारखान्याने शेतकऱ्यांची एवढी पिळवणूक करावी ही बाब योग्य नाही.शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये.

निवेदन देताना जिल्हा कोषाध्यक्ष जगदिश पाटील,राष्ट्रवादी शहर अध्यक्ष आयुब शेख,तौफिक कमाल,ताहेर पठाण,सरफराज इनामदार ,अमित कांबळे आदी उपस्थित होते.

Tuesday, 29 June 2021

वंचित बहुजन आघाडी उस्मानाबाद च्या वतीने छ्त्रपती राजर्षी शाहु महाराज यांची 147 वी जयंती साजरी

 वंचित बहुजन आघाडी उस्मानाबाद च्या वतीने छ्त्रपती राजर्षी शाहु महाराज यांची 147 वी जयंती साजरी


उस्मानाबाद,

आरक्षणाचे जनक लोकहितासाठी अनिष्ट रूढी परंपरा यांना लाथाडून लोक कल्याणकारी राज्य निर्माण करणारे लोकराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची 147 वी जयंती वंचित बहुजन आघाडी उस्मानाबाद जिल्हा कार्यकारणी व सर्व तालुका कार्यकारणी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती मध्ये शासकीय विश्राम ग्रह उस्मानाबाद येथे साजरी करण्यात आली. प्रथम छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण शिंदे व महिला आघाडी जिल्हाध्यक्षा ॲड.जिनत प्रधान यांच्या हस्ते धूप दिप प्रज्वलित करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.या वेळी फुले आंबेडकर विद्वत सभा महाराष्ट्र राज्य समन्वयक प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी विचार पुष्प गुंफताना सामाजिक राजकीय जीवनामध्ये कार्य करत असताना प्रत्येक पक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यां नी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा विचार डोळ्यासमोर ठेवून सामाजिक न्याया ची भूमिका घेऊन कार्य करावे असे मत मांडले. तर तोच धागा पकडून दुसरे पुष्प गुंफताना जेष्ठ नेते आर.एस.गायकवाड यांनी कार्यकर्ता कसा असावा तर तो छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांना प्रमाण मानून कार्य करणारा असावा असे सांगत विस्तृत असे मार्गदर्शन केले.या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण शिंदे,वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्षा ॲड. जिनत प्रधान,जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव,जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के,जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश घोडके,जिल्हा प्रवक्ते प्रा.अरविंद खांडके, जिल्हा प्रवक्ते ॲड.के टी गायकवाड,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कुंदन वाघमारे,लोहारा तालुकाध्यक्ष रविकिरण बनसोडे,परांडा तालुकाध्यक्ष दिपक ओव्हाळ,कळंब तालुकाध्यक्ष राजाभाऊ मळगे,उमरगा तालुकाध्यक्ष बाळासाहेब जमादार, तुळजापूर तालुका महासचिव कवी गोविंद भंडारे,परांडा तालुका महासचिव दयानंद बनसोडे,लोहारा तालुका महासचिव नितीन सितापूरे,ॲडव्होकेट प्रधान सर,ज्येष्ठ नेते आर एस गायकवाड तुळजापूर,शेखर बनसोडे ,बाबासाहेब वाघमारे,विद्यानंद वाघमारे, सुशिलकुमार बनसोडे,मोहन ओव्हाळ यावी असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के यांनी केली तर कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार प्रदर्शन जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव यांनी व्यक्त केले.

Monday, 28 June 2021

*प्रत्येक जिल्ह्याचा ऑक्सिजन व्यवस्थापन आराखडा करावा- मुख्य सचिव सीताराम कुंटे*

 कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा मुख्य सचिवांनी घेतला आढावा

प्रत्येक जिल्ह्याचा ऑक्सिजन व्यवस्थापन आराखडा करावा- मुख्य सचिव सीताराम कुंटे

मुंबई, दि. २८: कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आरोग्याच्या पायाभूत सुविधा वाढविताना लसीकरणावर भर द्यावा. प्रत्येक जिल्ह्याने ऑक्सिजन निर्मिती आणि साठवणुकीसाठी 'जिल्हा ऑक्सिजन व्यवस्थापन आराखडा' तयार करून त्यातील कामे जुलै पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले.

संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांनी दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांची बैठक घेतली. बैठकीस आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, वैद्यकिय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, आरोग्य आयुक्त डॉ. रामास्वामी, अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंग, परिवहन आयुक्त डॉ.अविनाश ढाकणे उपस्थित होते.

मुख्य सचिव यावेळी म्हणाले, राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ही लाट रोखण्यासाठी आरोग्यासाठीच्या पायाभूत सुविधा निर्मितीसाठी भर द्यावा. बेड्सची संख्या वाढवितानाच पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होईल यासाठीही प्रयत्न करावे. प्रामुख्याने ऑक्सिजन निर्मितीला चालना देताना त्याची कमतरता जाणवणार नाही याची दक्षता घेण्याचे मुख्य सचिवांनी सांगितले.

प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याचा ऑक्सिजन व्यवस्थापन आराखडा तयार करताना दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील सर्वाधिक कोरोना रुग्ण संख्येचा आधार घेऊन त्याच्या तिप्पट ऑक्सिजन उपलब्धतेबाबत नियोजन करावे. ऑक्सिजनची साठवणूक आणि निर्मितीसाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, पीएसए प्लांट, ऑक्सिजन सिलेंडर्स याबाबींचा व्यवस्थापन आराखड्यात समावेश करण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

ऑक्सिजनची सुविधा जिल्ह्यात कुठे करणार याची माहिती आराखड्यात द्यावी. ऑक्सिजनच्या वाहतूकीसाठी नियोजन करावे त्यासाठी सर्वसमावेशक धोरण राबवून विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन टीम करण्याचे मुख्य सचिवांनी सांगितले. 

शहरी भागात महापालिका आयुक्तांची भूमिका महत्त्वाची असून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवावा विभागीय आयुक्तांनी या सर्व कामावर सनियंत्रण ठेवून त्याला गती देण्यासाठी प्रयत्न करण्याचे मुख्य सचिवांनी सांगितले.

यासर्व बाबींच्या समन्वयाकरिता राज्यातील सहा महसुली विभागासाठी नियुक्त नोडल अधिकारी अमित सैनी (नाशिक व कोकण), सच्चिंद्र प्रतापसिंह (पुणे आणि औरंगाबाद) आणि अश्विन मुदगल (नागपूर, अमरावती) बैठकीला उपस्थित होते.



आरक्षण हक्क कृती समिती चे राष्ट्रपतींना निवेदन...

 मागासवर्गीयांच्या मागण्या मंजूर करणेबाबत 

राज्यस्तरीय आरक्षण हक्क कृती समिती चे राष्ट्रपतींना निवेदन...


उस्मानाबाद :- राज्यस्तरीय आरक्षण हक्क कृती समिती मुबंई यांच्या वतीने राज्यभर मध्ये एकाच वेळी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय समोर पुतळ्यास अभिवादन करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती ,पंतप्रधान, राज्यपाल , मुख्यमंत्री , यांना निवेदन देण्यात आले आहे.

 महाराष्ट्र शासनाकडे दि 16/03/2021 रोजी दिलेल्या निवेदन , महाराष्ट्रातील मागासवर्गीय शासकीय , निमशासकीय कर्मचा - यांना पदोन्नतीत आरक्षण मा . मुंबई हायकोर्टने नाकारल्यानंतर महाराष्ट्रातील विविध सामाजिक व कर्मचारी संघटनांनी मा . सुप्रीम कोर्टात अपील दाखल केली आहेत . त्याचा निकाल अद्याप प्रलंबीत आहे . मा . सुप्रीम कोटांचे निकालाच्या अधिन राहून पदोन्नतीत आरक्षण देण्यात यावे म्हणून बहुसंख्य कर्मचारी संघटनानी महाराष्ट्र शासनास यांपूर्वी निवेदने देऊन न्याय देयाची मागणी केलेली असता , न्याय देण्याऐवजी महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीयांचे पदोन्ततील आरक्षणच रद्द करण्याचा निर्णय घेऊन घोर अन्याय केला आहे . त्याचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत . सबब महाराष्ट्र शासनाने सकारात्मक , विधायक भूमिका घेऊन मागासवर्गीय कर्मचा - यांना पदोन्नतीत आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा त्याबरोबर केंद्रशासन व महाराष्ट्र शासनाशी संबंधीत पुढील मागण्या मंजूर कराव्यात .दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे.

 मागण्या 

1. दिनांक 7 मे 2021 चा महाराष्ट्र शासन निर्णय तात्काळ रद्द करावा .

2. नोकरीतील बलाख 50 हजार जागांचा अनुशेष ( बॅकलॉग ) भरण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात यावी .

3.मंत्री गटाची पुनस्थापना करण्यात यावी . 

4. 2006 च्या शिफारसी प्रमाणे ओ.बी.सी. ना पदोन्नतीत आरक्षण लागू करावे .

 5. जुनी पेन्शन योजना लागू करावी .

6.केंद्र शासनाने केलेले कामगार हितविरोधी कायदे रद्द करण्यात यावे .

7. परदेशी शिष्यवृत्तीसाठीची उत्पन्नाची अट रद्द करावी .

8. बारा बलुतेदारांसाठीची क्रिमीलियरची जाचक अट रद्द करण्यात यावी . असे निवेदनात नमुद केले आहे.


जिल्हा परिषद अध्यक्ष सौ .अस्मिता  कांबळे यांनी देखील या ठिकाणी भेट देऊन सहभाग नोंदविला.

निवेदनावर बापू शिंदे , बशीर तांबोळी , हरिभाऊ बनसोडे , जगदीश जाकते, अनुरथनागटिळक ,अभय यादव , विजय कांबळे , नागसेन शिदे , संजय धावारे , विजय गायकवाड , चंद्रकांत माळे , रामचंद्र शिंदे , प्रशांत माने , तिरुपती शेळके , श्रीमती सविता पांढरे , विलास ताकपिरे , सुखदेव भालेकर, प्रसिद्धी विभाग प्रमुख सतीश कुंभार  व इतर पदाधिकारी व शिक्षकांच्या यावर स्वाक्षर्‍या आहेत.

Tuesday, 1 June 2021

" अन्नदान हेच श्रेष्ठदान " " समाजसेवा हेच व्रत "

  "   अन्नदान हेच श्रेष्ठदान "

     "  समाजसेवा हेच व्रत "



उस्मानाबाद,

सध्या कोरोनाच्या काळामध्ये  स्थानिक पातळीवरील हजारो लोकांचे रोजगार बंद पडले आहेत. लॉक डाऊन च्या काळात उद्योगधंदे पुर्णता जमीनदोस्त झाले आहेत. अशा महामारी च्या काळात हाताला रोजगार नसल्याने उपासमारीची वेळ आलेली आहे. दवाखाने पूर्णपणे भरून गेली  आहेत. रुग्णालयाच्या बाहेर थांबायला ही जागा नाही हीच परिस्थिती सर्व ठिकाणी आहे. रुग्णां सोबतच रुग्णाच्या नातेवाईकांना तेथे राहण्याची व्यवस्था नाही, न खाण्याची सोय अशा परिस्थितीत अनेक दांशुरांचे हात मदतीला सरसावताना पहावयास मिळत आहेत. अशा महामारी च्या काळात ही महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मदतीला उतरून आता ते आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती येथे गरजू व त्याच्या मदतीला उतरताना पहावयास मिळतात आहेत. आपल्या नियोजन पद्धतीने सुपरिचित असणारे रिषी पांडे हे गरजूंना फक्त अन्नदान न करता त्याच बरोबर विटामिन युक्त असे लिंबू पाणी व शुद्ध पाण्याच्या बाटल्या देतात. त्याच बरोबर कोरोनाच्या संदर्भाने जनजागृतीही करताना पाहावयास मिळत आहेत. प्रशासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन व्हावे याकरिता अहोरात्र परिश्रम घेणारे खऱ्या अर्थाने कोरोना योद्धा म्हणावे असे पोलीस प्रशासन यांनकडे दुर्लक्ष करून कसे चालेल म्हणून ज्या ठिकाणी पोलीस त्या ठिकाणी सुरक्षा किट पोहंच करण्यात आल्या. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे पांडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव म्हणून कार्यरत आहेत त्यांनी गेल्या दहा दिवसापासून हजारो गरजूंच्या मदतीसाठी खरे उतरले आहेत.

 मदतकार्य सर्वच स्तरातून होणे गरजेचे 


सध्याच्या काळा फक्त सुरक्षितपणे जिवंत राहण्याचा आहे सध्या लोकांना भौतिक गोष्टींपेक्षा सुरक्षित आणि सुरक्षित उपचाराची गरज आहे ते मी करीत आहे अशी मदत सहकार्य सर्वच स्तरातून होणे गरजेचे आहे. सध्या हातचा रोजगार गेल्यामुळे उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. सध्याच्या काळात भूकबळी होऊ शकतात. म्हणून सर्वांनी अन्नदान करावे.राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम मी पार पाडत आहे.

                           रिषी पांडे

संघटक सचिव, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.(सदस्य,एल. ए. सी.) तिरुमाला तिरुपती देवस्थानं, तिरुपती, आंध्रप्रदेश

   -

तेरणा पब्लिक स्कूल मध्ये इको फ्रेंडली गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा संपन्न

  तेरणा पब्लिक स्कूल मध्ये इको फ्रेंडली     गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा संपन्न उस्मानाबाद, उस्मानाबाद येथील तेरणा पब्लिक स्कूलमध्ये पर्या...