रक्त साठ्याच्या तुटवड्यामुळे रक्तदान शिबिर संपन्न
रक्त साठ्याच्या तुटवड्यामुळे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र उस्मानाबाद यांच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न
उस्मानाबाद,
शासकीय जिल्हा रुग्णालय रक्त साठ्याच्या तुटवड्यामुळे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र उस्मानाबाद यांच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न येथील रक्त संक्रमण विभागात कोरोनाच्या पार्श्वभूमी मुळे रक्त साठा तुटवडा असल्याने खा. सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र उस्मानाबाद च्या वतीने दि. ३० जुन २०२१ रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान शिबीराचे उद्घाटन प्रतिष्ठानचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी केले. सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन रक्तदान शिबीरे आयोजित करुन मोठ्या संख्येने रक्तदान करावे असे आवाहन शासकीय जिल्हा रुग्णालय रक्त संक्रमण अधिकारी अश्विनी गोरे यांनी केले आहे.
यावेळी किरणताई निंबाळकर, अजित शेंडगे, असिफ शेख, सलिम इस्माईल शेख, फरदिन मुजावर, कृष्णा तेरकर, सोमनाथ जगताप, किशोर राऊत, जुलफैखों काझी, अजित घुटे, वाहेद मुजावर, नितीन घुले, अनिकेत ढंगेकर आदि युवक युवतींनी शिबीरात रक्तदान केले.
शिबीर यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष जीवनराव गोरे, उपाध्यक्ष प्रा. डॉ. जयसिंगराव देशमुख, सचिव बालाजी तांबे, कोषाध्यक्ष सुरेश टेकाळे. सदस्य प्राचार्य डॉ. रमेश दापके, आदित्य गोरे, डॉ. स्मिता शहापूरकर, सुरेखा जगदाळे, डॉ. तब्बसूम सय्यद, विशेष निमंत्रित सदस्य अरविंद (दादा) गोरे, भाई धनंजय पाटील, उत्तमराव लोमटे, अॅड. सुंदरराव हुंबे, बी. बी. ठोंबरे, समन्वयक सदस्य प्रदिप चालुक्य, संतोष हंबीरे, सुरेखा जाधव, भा. न. शेळके, किरणलाई निंबाळकर, रेखा लोमटे, खलील पठाण, रॉबीन बगाडे, जैनुद्दीन शेख, शम्सुल उर्दू शाळेतील शिक्षक आदींनी प्रयत्न केले.
No comments:
Post a Comment