आश्रमशाळा शिक्षकांच्या वेतन राम भरोसे
शिक्षकांचे वेतन एक तारखेलाच करा अशी मागणी
सध्या कोरोनाच्या काळात तरी वेतन व्हावे - कास्ट्राईब
उस्मनाबाद,
समाजकल्याण विभागांतर्गत येणाऱ्या निवासी आश्रम शाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन हे वेळेत न होण्याची ही पहिलीच वेळ नसून तो एक अलिखित नियमच बनला आहे. व सातत्याने दरमहा असाच अन्याय प्रशासनाकडून दप्तर दिरंगाईमुळे आश्रम शाळा कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे.
यापूर्वीही अनेक वेळा जिल्हाधिकारी यांना निवेदने दिली - बैठका झाल्या, आमदार-खासदारांच्याही शिफारशी दिल्या परंतु यात कसलाही बदल प्रशासनाने केला नाही. वेतन दिरंगाई नित्याने चालू ठेवली आहे असे कास्ट्राईब संघटनेचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. या आशयाचे निवेदन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व समाज कल्याण मंत्री सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्यामार्फत देण्यात आले होते मात्र दर महिन्याला असे निवेदने देऊन व संबंधित कार्यालयाचे खेटे मारूनही
वेळेत वेतन होत नाही. सध्याच्या लॉकडाउनच्या काळामध्ये अशा आश्रमशाळांमधील शिक्षक, व त्यांचे नातेवाईक कोरोना बाधित असल्यामुळे उपचार घेत आहेत. ते जीवन-मरणाच्या उंबरठ्यावरती असताना त्यांना क्षणोक्षणी आधार व आर्थिक नियोजन करताना नाकीनऊ येत आहेत. तरीही याबाबत प्रशासन व संबंधित विभाग गांभीर्याने घेत नाही हे स्पष्टपणे दिसते.
संबंधित विभागाशी यासंदर्भात संपर्क केला असता " सदर आश्रम शाळेचा वेतन विलंबाचा प्रश्न मंत्रालय स्तरावरून होत आहे. अनेक वेळा समाज सेवार्थ पोर्टल मध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे वेतन होण्यास विलंब होतो. त्याच बरोबर या वेतनाचे बजेटची उपलब्ध होण्यावर अवलंबून राहते. बऱ्याच आश्रमशाळा या वेळेस बजेट सादर करत नाहीत" असे उत्तर मिळते . -
प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे आमचे वेतन वेळेत होत नाही आणि यामुळे कर्मचाऱ्यांनी काढलेले कर्जाचे हप्ते नियमित भरले जात नाहीत परंतु त्याचा ज्यादा फटका दंड व्याजाच्या स्वरूपात आम्हाला बसत आहे आणि हप्ते वेळेत भरल्यामुळे आमचे बँकेतील सिविल खराब होत आहे आणि यामुळे आम्हाला कोणतीही बँक नवीन कर्जही देण्यास तयार होत नाही अशामुळे आम्हाला खासगी सावकाराकडे धाव घेण्याची वेळ येत आहे त्यामुळे प्रशासनाने आमच्या व्यथा समजून घेऊन आम्हा आश्रम शाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडे सहानुभूतीने पाहून न्याय द्यावा. आणि इतर विभागाप्रमाणे आमच्याही विभागाचे मिळतं हे एक तारखेलाच होईल असे करावे.
सतीश कुंभार
आश्रम शाळा प्रतिनिधी. कास्ट्राईब उस्मानाबाद


No comments:
Post a Comment