Tuesday, 20 April 2021

ऑनलाइन शिक्षण; विद्यार्थ्यांच्या ‘मानगुटीवर ?

 ऑनलाइन शिक्षण; विद्यार्थ्यांच्या ‘मानगुटीवर ?

                    कोरोंना काळात शाळा बंदचा परिणाम
                   मान , मणका, डोळे यांच्या व्याधीत वाढ ; 
                       पाल्य मोबाईल गेमच्या आहारी



विक्रांत उंदरे  -

वाशी :- राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे शाळा,महाविद्यालये,कोचिंग क्लासेस बंद करण्यात आले. दरम्यानच्या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात आला. मात्र या पद्धतीतून बहुतांशी पाल्यांना शारीरिक व्याधी जडत असल्याचे निदर्शनास येत आहे. पाल्यांना मान, पाठीचा कणा, डोळे यांचे त्रास सुरू झाले असून पाल्यांना आता मोबाईलची सवय जडत आहे. त्याचबरोबर मोबाईल च्या वापराचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शरीरावर तसेच बालमनावर ही होत असल्याचे पालकाकडून संगितले जात आहे. 
कोरोंनाचे संक्रमण झपाट्याने होऊन रुग्णसंख्याचे आकडे दिवसेदिवस वाढत आहेत. कोरोंनाला प्रतिबंधीत उपाययोजना म्हणून गत वर्षी लॉकडाउन आणि यावर्षी राज्यभरात कडक निर्देशांसह संचारबंदी लागू करण्यात आली. शाळकरी मुले , महाविद्यालईन तरुण तरुणी यांना कोरोंनाची बाधा होऊ नये व कोरोंनाचे संक्रमण रोखले जावे म्हणून शासनाकडून शाळा,महाविद्यालये,कोचिंग क्लासेस बंद करण्यात आले. या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ‘ऑनलाईन शिक्षण’ या पर्यायाचा अवलंब करण्यात आला. मात्र हाच ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग विद्यार्थ्यांना घातक ठरत असून येणार्याी काळात विद्यार्थ्यांना शारीरिक व्याधी व मानसिक तानतनाव देत आहे. अभ्यासाच्या नावाखाली विद्यार्थी मोबाइल वापरत असून अभ्यास करून फावल्या वेळेत मोबाईलवर गेम खेळत असल्याचे निदर्शनास येत आहेत. परिणामी पाल्य मोबाईलच्या अधीन झाले असल्याचे पालकाकडून सांगन्यात येत आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरू होण्यागोदर आपला पाल्य मोबाइलवर गेम खेळत बसेल म्हणून पालक आपल्या पालांच्या हातात मोबाईल देत न्हवते.  मात्र आता अभ्यास करायचं आहे, शाळेचा क्लास आहे, कोचिंग क्लास आहे,  असे कारण पाल्याकडून संगितले जाते मग पालकांचा ईलाज संपतो आणि आभ्यासासाठी म्हणून मोबाईल दिला जातो. क्लास संपल्यानंतर पाल्याकडून पालकांना मोबाईल माघारी दिला जात नाही. यामध्ये पालकांना अभ्यास सुरू असल्याचा समज राहतो.  काही वेळा तर मुले पालकांचे लक्ष चुकवून गेम खेळत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी अभ्यासाच्या नावाखाली विद्यार्थी मोबाईलच्या आधीन होत चालली आहेत. 

“ विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर आणि मनावर परिणाम :- 
 मान खाली घालून मोबाइल वर अभ्यास करणे यामुळे मान आणि मनक्यावर तान येतो याच बरोबर एकटक मोबाइल कडे पाहणे यमुळे डोळ्यावर दुष्परिणाम नाकारता येत नाहीत. याच बरोबर अभ्यास झाल्यावर पाल्याकडून मोबाइल माघारी घेतल्यावर पाल्याकडून चीड-चीड करण्यात येते परिनामी पाल्याचा स्वभावही रागीट होत आहे. शिक्षणामद्धे खंड पडू नये म्हणून ऑनलाईन शिक्षण हा योग्य पर्याय असला तरी त्याचा प्रतिकूल परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर आणि मनावर होण्याची भीती पालकांकडून व तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.”  

“बौद्धिक, शैक्षणिक, शारीरिक, मानसिक नुकसान :-  कोरोंना काळात शाळा बंद होऊन ऑनलाइन शिक्षण सुरू झाले मात्र हे शिक्षण शाळा नाही शिक्षण नाही तरीही विद्यार्थी पास होऊन पुढक्या वर्गात उडी मारली. परिणामी ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्याचे बौद्धिक, शैक्षणिक, शारीरिक, मानसिक नुकसान होत असून ऑनलाइन शिक्षण फायद्याचे की तोट्याचे ? याचे उत्तर शोधावे लागणार आहे.”

“ सकाळी शाळेकडून मुलासाठी मोबाईलवर व्हिडिओ, पिडीएफ आशा स्वरुपात आभ्यास पाठवला जातो. तो करण्यासाठी मोबाईलची गरज पडते. आभ्यासासाठी मुलांना मोबाईल दिला असता मुलाकडून आभ्यास सुरू आहे की नाही सतत पाहणे शक्य होत नाही. बर्याोचदा मुले आभ्यास झाल्यावर गेम खेळताना दिसतात. मग त्यांना मोबाईल द्यायचा का नाही ? असाच प्रश्न पडतो आशा भावना पालकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.”
“ऑनलाइन शिक्षणात उजळणी , बराखडीचा  विसर :- शाळा बंद पण ऑनलाइन शिक्षण सुरू अशी स्थिति कोरोंनाच्या काळात आहे. या हायटेक शिक्षणात विद्यार्थ्यांना चक्क बाराखडी आणि उजळणीचा विसर पडला आहे. शाळेत विद्यार्थी समूहात पाठांतर घेऊन प्रत्यक्ष दिले जात असलेले शिक्षणच प्रभावी ठरत होते. पहिली दुसरीच्याच वर्गात विद्यार्थ्याकडून शिक्षक उजळणी , बराखडी मुखोद्गोत करून घेत होते. आता मात्र या हायटेक शिक्षणात पाठांतर हेच अडगळीला पडले आहे.”

“मोबाईल नेटवर्क नाही त्या गावात ऑनलाइन शिक्षणाचे तीन तेरा :- आजही  बहुतांशी खेड्यापाड्यात मोबाईलला रेंज नसते. त्या गावातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची स्थिति तर अत्यंत भयावह आहे. गावात मोबाईलला रेंजच नसल्याने शिक्षकांनी पाठवलेला अभ्यास विद्यार्थ्यांना पोहोचतच नाही. त्यामुळे अशा खेड्यातील विद्यार्थीचे शिक्षण तर वार्याठवरच आहे. त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात? याचे उत्तर अधांतरीच आहे.”

“विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास करताना त्यांनी शैक्षणिक एप्लीकेशन वगळता  इतर अनावश्यक गेम एप्लीकेशन, वेब ब्रौझर यासह इतर कंटेट न पहावेत यासाठी अद्यावत मोबाईल मध्ये काही सेटिंग्स बदलून अनावश्यक एप्लीकेशन वापरण्यावर निर्बंध लावता येतात जेणेकरून मुले मोबाईल मधीत गेम व सोशल मीडिया च्या एप्लीकेशन पासून दूर राहतील व केवळ शैक्षणिक अभ्यासासाठीच मोबाईल च उपयोग करतील.”

“कोविड-19 च्या या  प्रादुर्भावाच्या काळात शिक्षण न थांबण्यासाठी ऑनलाईन शिक्षण पद्धती गरजेची आहे. ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम विद्यार्थ्याच्या डोळ्यावर,माणेवर आणि मन या तीन गोष्टीवर प्रामुख्याने होत आहे. याचे प्रतिकूल परिणाम टाळन्यासाठी  शैक्षणिक विडिओ पाहताणा 10 मिनिटानंतर व्हिडिओ थांबवून ब्रेक घ्यावा, एकटक मोबाईल कडे न पाहता डोळ्यांची उघड झाप करत रहावी, माणेचे आणि मणक्याचे  व्यायाम करावेत. यासह मानसिक तानतनाव टाळन्यासाठी हेलिंग म्युझिक ऐकावे व एकाग्रतेने  केलेल्या आभ्यासाचे चिंतन करणे गरजेचे आहे. – 
                     डॉ. कपिलदेव पाटील, वैद्यकीय अधीक्षक , 
                     ग्रामीण रुग्णालय, वाशी ”

No comments:

Post a Comment