Tuesday, 10 August 2021

मुख्याध्यापक सहविचार सभा संपन्न

    मुख्याध्यापक सहविचार सभा संपन्न 

शिंगोली - आदर्श विमुक्त जाती प्राथमिक आश्रमशाळा शिंगोली ता. उस्मानाबाद  या शाळेमध्ये येडशी बीट स्तरीय जिल्हा परिषद व खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांची पाक्षिक /मासिक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शिक्षण विस्तार अधिकारी श्री. पारवे कार्यक्रमाचे अध्यक्ष तर प्रमुख अतिथी केंद्रप्रमुख नागटिळक (उपळा केद्र) केंद्रप्रमुख मंडलिक (येडशी केंद्र ) केंद्रीय मुख्याध्यापक श्री. पडवळ साहेब उपळा केंद्र तर श्रीमती माने मॅडम केंद्रीय मुख्याध्यापक येडशी तसेच मुख्याध्यापक श्री. राठोड सर मुख्याध्यापक शिंदे सर उपस्थित होते. दिप प्रज्वलित करून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्व मान्यवरांचे पुष्पहार ,शाल-श्रीफळ, फेटा बांधून स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील आर. बी. सरांनी केले तर अनुमोदन .खबोले सरांनी दिले. या कार्यक्रमाला परीश्रम सतिश कुंभार सर, खबोले सर व पाटील आर. बी. , शानिमे याांनी घेतले. कार्यक्रमात श्री. सतिश कुंभार सर, श्री. आमदापूरे सर ,श्रीमती कांबळे, श्रीमती तोगरगे ,श्रीमती सुर्यवंशी , तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सतिश कुंभार सरांनी मानले अल्पोपहार व चहापान ने सहविचार सभा संपन्न झाली.

No comments:

Post a Comment