Sunday, 14 November 2021

आश्रम शाळेमध्ये बालदिन उत्साहात साजरा

शिंगोली आश्रम शाळेमध्ये   बालदिन साजरा

शिंगोली- येथील विद्या निकेतन माध्यमिक व आदर्श प्राथमिक आश्रम शाळेमध्ये बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला .सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आश्रम शाळेचे पर्यवेक्षक श्री शेख अब्बासअली व प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक श्री. कुमंत शिंदे हे होते. कार्यक्रमअध्यक्ष व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

"बालके हेच भारत देशाची संपत्ती आहेत. उद्याचे उज्ज्वल भविष्य त्यांच्या हातात आहे, त्यामुळे मुलांना च्या बौध्दिक, मानसिक, शारीरिक वाढ करण्यासाठी पालकांनी ,शिक्षकांनी लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे" 

अशा आशयाची भाषणे झाली. त्यावेळी सहशिक्षक दीपक ख, श्री. शामीने कैलास, श्री. सतीश कुंभार ,श्री. खंडू पडवळ, श्री. रत्नाकर पाटील व आश्रम शाळेचे कर्मचारी वसंत भिसे ,बबन चव्हाण, गोविंद बनसोडे, सचिन अनंतकळवासआदींची उपस्थिती होती.

शिक्षकांचा विविध मागण्यांसाठी मेळावा संपन्न

 


स्वाभिमानी शिक्षक संघटना मराठवाडा  विभाग मेळावा संपन्न

रायगड फंक्शन हॉल उस्मानाबाद येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रणित स्वाभिमानी शिक्षक संघटना मराठवाडा यांच्या शिक्षकांचा विविध मागण्यांसाठी मेळावा आयोजित केला होता त्या मेळाव्यासाठी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी साहेब उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील स्वाभिमानी शिक्षक पुरस्कार वितरित करण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने प्राचार्य दीपाताई साळवे, रा. गो. शिंदे महाविद्यालय परंडा, सौ मुंडे मॅडम परळी या दोन महिला शिक्षकांना पुरस्कार इत करण्यात आले.

    या मेळाव्याचे आयोजन स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे मराठवाडा समन्वयक डॉक्टर बिबीशन भैरट यांनी केले होते. या कार्यक्रमास पुजा ताई मोरे, गजानन बंगाळे पाटील, हुसे सर, गंभीरे सर,चौरे सर, सोनटक्के सर, रवींद्र इंगळे, तानाजी पाटील आदी उपस्थित होते.

सदर मेळाव्यात संबोधित करताना शिक्षक संघटना वैचारिक खाद्य पुरवणारा ही संघटना म्हणून व स्वाभिमानी शिक्षक घडविण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण व निर्णय घेण्यासाठी मोठा लढा उभा करण्याचा निर्धार व्यक्त केला व शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी लढा उभा करण्याचा निर्धार व्यक्त केला. हा ही शिक्षकांची स्वाभिमानी चळवळ चांद्यापासून बांद्यापर्यंत वाढवून महाराष्ट्रात नवीन सांस्कृतिक व सामाजिक वाटचाल निर्माण करण्याचे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पूर्णत्वाकडे स्वाभिमानी शिक्षकांच्या पाठीमागे उभा केली जाईल असा निर्धार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.

सदर कार्यक्रमाचे आभार ज्योतीताई सोनवणे यांनी व्यक्त केले.

Saturday, 13 November 2021

मुरूम येथे शहर व्यापारी संघटना, विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनेतील पदाधिकाऱ्यांची बैठक

 


सोशल मीडियासह अफवांवरील मेसेजवर विश्वास ठेवू नये-उपविभागीय पोलीस अधिकारी बरकते यांचे आवाहन 

मुरूम/प्रतिनिधी

 मागील कांही दिवसापासून सोशल मीडिया आणि कांही प्रसार माध्यमातून शांतता बिघडवणारे मेसेज व्हायरल होत आहेत अश्या मेसेजवर आणि होणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन उमरगाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी केले आहे मुरूम पोलीस ठाणेत शनिवारी सांयकाळी शहर व्यापारी संघटना, विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनेतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी सोशल मीडिया तसेच इतर समाजमाध्यमावरील अफवात्मक बातमीवर विश्वास ठेवू नये, त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडते, असे काही संशयित कृत्य निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस प्रशासनास कळवून सहकार्य करावे असे आवाहन केले .

यावेळी मुरूम शहरातील चंद्रशेखर मुदकण्णा,श्रीकांत मीणियार,बबन बनसोडे, अशोक मिनीयार, उल्हास घुरघुरे,विठ्ठल पाटील,शरणप्पा गायकवाड, बाबा कुरेशी,गुलाब डोंगरे,जगदीश निंबरगे, किरण गायकवाड, आनंद कांबळे, यासह शहरातील विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार आदी उपस्थित होते. यावेळी विविध सामाजिक संघटना,व्यापारी संघटना यांच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी बरकते यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी सहाययक पोलीस निरीक्षक ए .एन. माळी यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थितांचे आभार मानले.

रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील अतिथी गृहाचे उदघाटन

शिक्षकांनी विद्यार्थ्यांची ज्ञानदृष्टी वाढवावी - प्राचार्य अभयकुमार साळुंखे



 उस्मानाबाद(प्रतिनिधी)दि.१३ रामकृष्ण परमहंस महाविद्यालय म्हणजे एक ज्ञानमंदीर असून या ज्ञानमंदीरातून सुसंस्कारित विद्यार्थी घडवावेत त्यातूनच संस्कारित माणसं घडतील फुले,शाहू,आंबेडकर व संतांचा विचार हाच डाॅ.बापूजींचा विचार आहे डाॅ,बापुजी साळुंखे यांचा त्याग डोळ्यासमोर ठेवून आजच्या शिक्षकांनी या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संशोधक बनवावे व विद्यार्थ्यांची ज्ञानदृष्टी वाढवावी असे प्रतिपादन रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील अतिथी गृहाचे उदघाटना प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना १३नोव्हेंबर रोजी, प्राचार्य अभयकुमार साळुंखे(कार्याध्यक्ष श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था,कोल्हापूर)यांनी केले आहे.समारंभाच्या अध्यक्षस्थानी मकरंद राजेनिंबाळकर(नगराध्यक्ष न.प.उस्मानाबाद)हे होते.यावेळी कौस्तुभ गावडे(सी.ई.ओ श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था,) प्राचार्य व मराठवाडा विभाग प्रमुख डाॅ.जयसिंगराव देशमुख,श्रीराम साळुंखे( कोल्हापूर विभाग प्रमुख),माजी प्राचार्य डाॅ.युवराज भोसले,नानासाहेब पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख मान्यवरांनी डाॅ.बापुजी साळुंखे,संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे,श्री विवेकानंद यांचे प्रतिमांचे पुजन केले. प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी मान्यवरांचे स्वागत केले. 
               पुढे बोलतांना प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले की,रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या ईमारतीची उभारणी करतांना उस्मानाबाद मधील अनेक दानशुरांनी एक एक दगड प्रेमाने दिला आणि हे महाविद्यालय उभारले त्यामुळे हे महाविद्यालय विद्यापीठात व संस्थेत नाव टिकवून आहे.आज कोरोना काळात माणुसकी हरवली आहे पुंन्हा चांगली संस्कृती उभारली पाहिजे,आजचे विद्यार्थी इंटरनेटचा वापर करत आहेत त्यामुळे आजच्या शिक्षकांनी अभ्यास करण्याची गरज आहे.त्यामुळे शिक्षकांनी तयारी करायला हवी व आपले ज्ञान बळकट करायला हवे. अध्यक्षीय समारोप करताना नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर म्हणाले की,आपले महाविद्यालय नेहमीच नाविन्यपूर्ण समाजउपयोगी उपक्रम राबवत असते आपणास सहकार्य लागत असेल तर आंम्ही आपल्या पाठीशी आहोत.भविष्यात आपधास सहकार्य करू. प्रास्ताविक करतांना प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख म्हणाले की,या महाविद्यालयात के.जी.टू पी.जी शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी हायस्कूल सुरू करण्याची गरज आहे.या महाविद्यालयात संशोधन सेंटर झेप घेत आहे.त्याचा फायदा भविष्यात परिसरातील शेतक—यांना होईल. यावेळी नानासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्राचार्या डाॅ.सुलभा देशमुख,प्र.प्राचार्य पवार,प्र.प्राचार्य शिंदे उपस्थित होते. यावेळी मराठवाडा येथील विविध शाखेतून मुख्याध्यापक,माजी प्राध्यापक उपस्थित होते.यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक उपस्थित होते. सूञसंचालन प्रा.वैभव आगळे यांनी केले आभार प्रा.केशव क्षीरसागर यांनी मानले.

Tuesday, 9 November 2021

आत्महत्येचा विचार नको, फक्त एक फोन करा शेतकऱ्यांना शिवार संसदची भावनिक हाक

 आत्महत्येचा विचार नकोफक्त एक फोन करा


 
शेतकऱ्यांना शिवार संसदची भावनिक हाक

उस्मानाबाद:
 
 अतिवृष्टीच्या तडाख्याने प्रचंड नुकसान होऊन हातातोंडाशी आलेली पिके हिरावली गेली . बोगस बियाणेदुबार-तिबार पेरणीआर्थिक चिंता अशा एक ना अनेक परिस्थितीत आपण आतापर्यंत धीराने तोंड दिले आहे,

तसेच अतिवृष्टी पोटी शासनाचे अनुदान अदयाप पर्यन्त काही शेतकरयांना मिळालेले नाही. . अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान होवून देखील विमा कंपनी विमा देण्यास टाळाटाळ करीत आहे. बळीराजाच्या दुखावर मीठ चोळण्याचे काम विमा कंपनी करीत आहे. त्यात शासनाचे पंचनामे ग्राहय न धरता विमा कंपनीने त्यांचेचे निकष लावले आहेत. त्यामुळे बळीराजा पिक विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता जास्त आहे

शासकिय पंचनामे ग्राहय धरुन पिकाची नुकसान भरपाई दिली पाहीजे असा आग्रह बळीराजा करीत आहे.

शेवटी आताच्या परिस्थितीत त्यातून आलेली हतबलता यामुळे बेचैन होणे साहजिकच आहेपण तरीही कृपया मायबापानो कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नका किंवा विचार करू नकाहीसुद्धा वेळ निघून जाईलआम्ही तुमच्या सोबत आहोत.कोणतीही अडचण असोआपण त्यातून नक्की मार्ग काढण्याचा प्रयत्न करूपण हार मानू नका. फोन आल्यानंतर योग्य यंत्रणेशी जोडून देऊन मार्गदर्शन करून सल्लामार्गदर्शन देऊनत्रस्त शेतकरयांना समुपदेशन करून मानसिक आधार देण्यात येईल त्यातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत झालेली आहे.फक्त शिवार हेल्पलाइनला ८९५५७७१११५ एक फोन कराअसे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. तिर्थकर व  शिवार फाऊंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांनी केले आहे.
यासाठी मारिवाला हेल्थ इनिशिएटिव्ह,  तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट
उस्मानाबादकृषी महाविद्यालय,गडपाटीजिल्हा प्रशासनजिल्हा परिषदजिल्हा पोलीस दलकृषी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना या  शासकीयअशासकीयस्वयंसेवी अशा सर्वच संस्थाचे सहकार्य मिळत आहे.

 

Thursday, 4 November 2021

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा


 सर्व शिक्षक वृंद , अधिकारी व कर्मचारी वर्ग व  जनतेस दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा -

         सतीश शहाजी कुंभार (आश्रम शाळा प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे शाखा उस्मानाबाद.