आत्महत्येचा विचार नको, फक्त एक फोन करा
शेतकऱ्यांना शिवार संसदची भावनिक हाक
उस्मानाबाद:
अतिवृष्टीच्या तडाख्याने प्रचंड नुकसान होऊन हातातोंडाशी आलेली पिके हिरावली गेली . बोगस बियाणे, दुबार-तिबार पेरणी, आर्थिक चिंता अशा एक ना अनेक परिस्थितीत आपण आतापर्यंत धीराने तोंड दिले आहे,
तसेच अतिवृष्टी पोटी शासनाचे अनुदान अदयाप पर्यन्त काही शेतकरयांना मिळालेले नाही. . अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान होवून देखील विमा कंपनी विमा देण्यास टाळाटाळ करीत आहे. बळीराजाच्या दुखावर मीठ चोळण्याचे काम विमा कंपनी करीत आहे. त्यात शासनाचे पंचनामे ग्राहय न धरता विमा कंपनीने त्यांचेचे निकष लावले आहेत. त्यामुळे बळीराजा पिक विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता जास्त आहे
शासकिय पंचनामे ग्राहय धरुन पिकाची नुकसान भरपाई दिली पाहीजे असा आग्रह बळीराजा करीत आहे.
शेवटी आताच्या परिस्थितीत त्यातून आलेली हतबलता यामुळे बेचैन होणे साहजिकच आहे, पण तरीही कृपया मायबापानो कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नका किंवा विचार करू नका, हीसुद्धा वेळ निघून जाईल, आम्ही तुमच्या सोबत आहोत.कोणतीही अडचण असो, आपण त्यातून नक्की मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, पण हार मानू नका. फोन आल्यानंतर योग्य यंत्रणेशी जोडून देऊन मार्गदर्शन करून सल्ला, मार्गदर्शन देऊन, त्रस्त शेतकरयांना समुपदेशन करून मानसिक आधार देण्यात येईल त्यातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत झालेली आहे.फक्त शिवार हेल्पलाइनला ८९५५७७१११५ एक फोन करा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. तिर्थकर व शिवार फाऊंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांनी केले आहे.
यासाठी मारिवाला हेल्थ इनिशिएटिव्ह, तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट
उस्मानाबाद, कृषी महाविद्यालय,गडपाटी, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, कृषी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना या शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी अशा सर्वच संस्थाचे सहकार्य मिळत आहे.
No comments:
Post a Comment