महिला रुग्णालयात स्त्री जन्माचे स्वागत.. अनोखी परीच्या वाढदिवसानिमित्त कपडे वाटप..
उस्मानाबाद :- महिला रुग्णालयात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांनी त्यांच्या मुलीचा अनोखी परीचा वाढदिवस जिल्हा शासकीय स्त्री रग्णालयात स्त्री जातीच्या जन्मलेल्या बाळाला नवीन कपडे व जन्म दिलेल्या बाळाच्या मातेला गुलाब पुष्प देऊन स्त्री जन्माचे स्वागत या सदराखाली साजरा करण्यात आला.गेल्या वर्षी याही वर्षी कोरोना जैविक विषाणुच्या महासंकटात हा कार्यक्रम शासनाच्या नियमानुसार घेतला.. 'काहीजण आजही मुलगी जन्माला आल्यानंतर नैराश्य,नाराजीचा सूर आरवतांना दिसताहेत,हि मनोवृत्ती बदलली पाहिजे,स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,बेटी बचाओ बेटी पढाओ ही भावना मनात बाळगली पाहिजे,आज एक मुलगी भविष्यात देश चालवू शकते तर अंतराळात यशस्वी कामगिरी करु शकते हे आपण पाहिले व पाहत आहोत,स्त्री जन्माचे स्वागत केले पाहिजे व स्त्री भ्रूणहत्या रोखुन तिचे संरक्षण केले पाहिजे,स्त्री जन्माचे स्वागत याला स्मरुन दरवर्षी श्री गणेश रानबा वाघमारे यांनी अनोखी परीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा जो वर्षानुवर्षे उपक्रम राबवित आहेत ते समाजहित व जनहितार्थ असुन स्तुत्य उपक्रम आहे,असे प्रतिपादन वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्मिताताई गवळी मॅडम यांनी व्यक्त केले.
तर सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे साहेब व तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ एकनाथ माले साहेब यांच्या कार्यकाळात स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्याची यशस्वी कामगिरी व देशात प्रथम क्रमांक पटकाविला होता ही बाब गौरवर्णीय होती,याची आठवण त्यांनी करून दिली.यात प्रामुख्याने वैद्यकीय अधीक्षक डॉ.स्मिता ताई गवळी मॅडम, परिचारिका भाटे मॅडम, पल्लवीताई चव्हाण,अनिता कोळी,गुरुनाथ माळी,गणेश रानबा वाघमारे,संजय गजधने सचीन चौधरी,दिपक पांढरे,विशाल घरबुडवे अन्य इतर उपस्थित होते,डाॅक्टर नर्स व उपस्थित मान्यवरांनी सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांना अनोखी परीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.


No comments:
Post a Comment