
Wednesday, 14 July 2021
कोरोना मुक्त अंतर्गत रुई गावात रा.गे.शिंदे महाविद्यालयाच्या वतीने मास्क वाटप, वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न.
परंडा - दि. 14 जुलै 2021 परंडा येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने कोरोना मुक्त अंतर्गत रुई गावांमध्ये मास्क वाटप आणि वृक्ष लागवड कार्यक्रम घेण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ दीपा सावळे या उपस्थित होत्या . तर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ सचिन चव्हाण, प्रा सचिन साबळे आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले होते.
या कार्यक्रमासाठी रुई गावच्या सरपंच कुसुम जगताप, उपसरपंच मीराबाई राजेंद्र लिमकर व सदस्य सुमित लिमकर, सुहास मुळीक, राजेंद्र पाटील आणि पोलीस पाटील विलास पाटील हे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सचिन चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले होते. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ दीपा सावळे यांनी उपस्थित सर्व गावकऱ्यांना कोविड-19 च्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले . तसेच नॅक या अतिश्य महत्त्वाच्या टीमसोबत गावकऱ्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार मानले. गावातील सर्व लोकांनी स्वतःची काळजी घ्यावी गावामध्ये कोणताच रोग येणार नाही यासाठी सर्वांनी स्वतःची आणि गावाची स्वच्छता ठेवावी , प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून सर्वांनी लस घ्यावी स्वतःची घराची आणि समाजाची काळजी घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे . आम्ही महाविद्यालयाच्या वतीने आपल्या गावांमध्ये विविध उपक्रम राबवत आहोत रुई गाव हे महाविद्यालयाने दत्तक घेतले आहे तेव्हा आपला समन्वय महत्त्वाचा आहे असे यावेळी प्राचार्या डॉ दीपा सावळे यांनी सांगितले. यावेळी उपस्थित सर्व गावकऱ्यांना मास्क चे वाटप करण्यात आले तसेच सर्वांना एक एक झाड देण्यात आले व गावामध्ये वृक्ष लागवड करण्यात आली . या कार्यक्रमासाठी गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी कोविड - 19 चे पालन करत मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार डॉ सचिन चव्हाण यांनी मानले.

Subscribe to:
Post Comments (Atom)
तेरणा पब्लिक स्कूल मध्ये इको फ्रेंडली गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा संपन्न
तेरणा पब्लिक स्कूल मध्ये इको फ्रेंडली गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा संपन्न उस्मानाबाद, उस्मानाबाद येथील तेरणा पब्लिक स्कूलमध्ये पर्या...
-
तेरणा पब्लिक स्कूल उस्मानाबाद येथे विविध उपक्रमाने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरातेरणा पब्लिक स्कूल उस्मानाबाद येथे विविध उपक्रमाने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा उस्मानाबाद, येथील तेरणा पब्लिक स्कूल...
-
आरटीई अंतर्गत शाळा प्रवेशाची 23 जुलैपर्यंत मुदत वाढ उस्मानाबाद, वंची त व दुर्बल घटकातील आर.टी. ई. मोफत 25 टक्के प्रवेशा दि.23 जुलै 2021...
-
नळदुर्ग चे सुपुत्र झिया शेख याने सहकारी विद्यार्थ्यांसोबत तयार केला लो कॉस्ट ऑक्सिजन व्हेंटिलेटर नळदुर्ग :- नळदुर्ग चे सुपुत्र झ...
No comments:
Post a Comment