“ग्रामीण भागातील होतकरु तरुणांसाठी ‘रुरल टॅलेंट हंट’ या उन्हाळी शिबीराचे कळंब येथे आयोजन.”
ग्रामीण भागातील होतकरु व महत्त्वाकांक्षी तरुणांचा शोध घेउन त्यांना ध्येय प्राप्तीच्या उद्देशाने योग्य मार्गदर्शन होण्यासाठी ‘रुरल टॅलेंट हंट’ या उन्हाळी शिबीराचे आयोजन करण्याची संकल्पना मा. पोलीस अधीक्षक श्रीमती नीवा जैन यांनी मांडली होती. यातून कळंब उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी हा उपक्रम कळंब तालूक्यात राबविण्याचे ठरवले. कळंब तालूक्यातील निवडक अशा 150 विद्यार्थ्याकरीता दि. 02- 08 मे ‘रुरल टॅलेंट हंट’ या साप्ताहीक शिबीराचे आयोजन करण्यात आले असून मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कळंब श्री. महेश ठोंबरे यांच्या हस्ते दि. 02 मे रोजी या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. “जिद्द, चिकाटी व परिश्रम, आवड यांची जोड असल्यास यश नक्कीच मिळते.” असे आवाहन या प्रसंगी न्यायदंडाधिकारी महोदयांनी उपस्थितांना केले.
या कार्यक्रमास शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे प्राचार्य- श्री. सुनिल पवार, नायब तहसिलदार- श्री. सांगळे, कळंब पो.ठा.चे पोलीस निरीक्षक- श्री. यशवंत जाधव यांसह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.


No comments:
Post a Comment