Monday, 13 June 2022

मुख्याध्यापक विनायक बाबा गोरे यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप

 मुख्याध्यापक विनायक बाबा गोरे यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप


उस्मानाबाद,

उस्मानाबाद तालुक्यातील उपळे (मा) येथे आदर्श असे हरिभाऊ घोगरे हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री विनायक बाबा गोरे सर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त शाळेमध्ये भव्य निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते . विनायक गोरे सरांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला व त्यांना सतीश कुंभार सर ,आश्रम शाळा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कल्याण महासंघ शाखा उस्मानाबाद यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या प्रसंगाची प्रतिमा स्नेह पूर्वक भेट देण्यात आली.त्याप्रसंगी केंद्रप्रमुख अनुरथ नागटिळक, प्रभाकर दत्तात्रय घोगरे- अध्यक्ष,अरुण बळवंतराव घोगरे - सचिव,माणिक बाबा गोरे -माजी मुख्याध्यापक कुर्डूवाडी,भगवान बागल -ज्येष्ठ नाटककार,

 आदींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच आजी माजी विद्यार्थीही मोठ्या संख्येने हजर होते. श्री गोरे सरांना पुढील वाटचालीस सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

तेरणा पब्लिक स्कूल मध्ये इको फ्रेंडली गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा संपन्न

  तेरणा पब्लिक स्कूल मध्ये इको फ्रेंडली     गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा संपन्न उस्मानाबाद, उस्मानाबाद येथील तेरणा पब्लिक स्कूलमध्ये पर्या...