Tuesday, 27 April 2021

तुळजाभवानी कामगार संघटनेकडून कामगारांना आर्थिक मदतीसाठी ऑनलाइन नोंदणी यादी कामगार अधिकारी यांना सुपूर्त

 तुळजाभवानी  कामगार संघटनेकडून कामगारांना आर्थिक मदतीसाठी ऑनलाइन नोंदणी यादी कामगार अधिकारी यांना सुपूर्त



उस्मानाबाद,

महाराष्ट्रातील कोरोना महारीच्या दुसऱ्या लाटेचि वाढती तीव्रता पाहता!वाढत्या संसर्गामुळे धोका होवू नये यासाठी मा. ना. मुख्यमंत्री महोदयानी लॉकडाऊनची घोषणा केली. या काळात बांधकाम,रिक्षा चालक,दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, हेअर सलून, मनरेगा,या कामगारांची उपासमार होता कामानये म्हणून प्रत्येकांना रक्कम रुपये 1500/-आर्थिक मदतीची घोषणा केली. या घोषित आर्थिक मदत ग्रामीण भागातील गर्जुवंत घटका पर्यंत पोहोचवण्यासाठी आज दिनांक 26/04/2021 रोजी संघटनेच्या माध्यमातून सरकारी कामगार अधिकारी कार्यालय,उस्मानाबाद येथील संबंधित अधिकारी सुधाकर कुनाळे यांच्याकडे निवेदन सादर करून निवेदना सोबत 900 ऑन लाईन नोंदणी केलेल्या कामगारांची यादीही देण्यात येवून सर्वांना निरपेक्षपणे मदत मिळवून देण्यासाठी चर्चा केली. 

वाशी शहाराच्या काही भागात ताप,चिकून गुणिया सदृश्य आजाराची साथ

 वाशी शहाराच्या काही भागात ताप,चिकून गुणिया                     सदृश्य आजाराची साथ

सांडपाण्यात डासांची उत्पत्ति होऊन साथरोग पसरल्याचे तपासात निष्पन्न


वाशी :- शहरातील पारा रोड , आदर्श नगर, महावितरण कार्यालय या भागात ताप, चिकून गूणिया सदृश्य आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. मागील दहा ते पंधरा दिवसापासून सदरील भागात रुग्णाचे प्रमानात वाढ होत असून परिसरात कुठल्याही प्रकारची उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. आरोग्य विभाग व नगरपंचायत प्रशासनचे काम अत्यंत ढीम्मपने सुरू असून नगरीकातून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
 कोरोंनाच्या प्रादुर्भावामुळे अगोदरच हैराण असलेल्या वाशीकरांच्या चिंतेत ताप, चिकून गूणिया सदृश्य आजाराचे रुग्ण आढळून अधिकच भर पडली आहे. शहरातील पारा रोड , आदर्श नगर, महावितरण कार्यालय या भागात ताप, चिकून गूणिया सदृश्य आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. एकाच कुटुंबातील सर्वच व्यक्ति आळीपाळीने आजारी पडत असल्याचे निदर्शनास येत आहे. 
 सदरील आजारचे रुग्ण मागील दहा ते पंधरा दिवसापासून आढळून येत असून त्यावर कुठल्याही प्रकारची ठोस अशी तातडीची उपाययोजना करण्यात आलेली नाही. नगरपंचायत कडून केवळ धूळफवारणी करण्यात आली. त्याचा कुठलाही परिणाम दिसून आला नाही. मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असल्याचे लक्षात येऊनही आरोग्य विभागाला त्या ठिकाणी पाचारण करणे अपेक्षित होते मात्र तसे लवकर होताना दिसत नाही. परिणामी प्रशासनचे काम अत्यंत ढीम्मपने सुरू असल्याने निदर्शनास येत असून यामुळे त्या भागातिल नगरीकातून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने ठाम उपाययोजना राबवून आजारचे निदान करून त्यावर तत्काळ नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी वाशी शहरवासीयातून होत आहे. 
(लाखोंची उधळण तरीही स्वछता नाही : शहर स्वछतेसाठी नगरपंचायत कडून लोखो रुपयांचे टेंडर दिले आहे. मात्र लाखो रुपयांच्या निधीची उधळण करूनही शहरात स्वछता होताना दिसत नाही. ठेकेदारकडून नालेसफाई कामे व्यवस्थित होत नसल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही परिणामी डासांची उत्पत्ति मोठ्या प्रमाणात झाली असून त्यामुळेच या भागात साथरोगाचा फैलाव झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.)

खाजगी दवाखाने फुल्ल :- थंडी-ताप, सांधे दुखी यामुळे हैराण असलेले रुग्ण कोरोंनाच्या भीतीपोटी खाजगी दवाखान्याचा आधार घेत आहेत. परिणामी खाजगी दवाखानेही फुल्ल झाले असून औशोधोपचारासाठी ताटकळत राहण्याची वेळ येत आहे..

‘दर्जेदार’ नाले सफाईसह , शहर स्वछतेची गरज :- शहरस्वछतेवर नगरपंचायत कडून वर्षी लाखो रुपयांची उधळण केली जाते. तरीही शहरातील बहुतांशी भागात सांडपाणी वाहतूक करणार्या नाल्या तुंबल्या आहेत. परिणामी त्यातून पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे नाल्यात सांडपाण्याची डबकी साचली आहेत. परिणामी शहरात डासांचा उपद्व्याप वाढला आहे. त्यामुळे शहर स्वछता नियमित व दर्जेदार करण्याची मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे. 





 साचलेल्या सांडपान्यात डासांच्या आळयांची उत्पत्ति मोठ्या प्रमाणात झाली असून त्यामुळे या भागात चिकनगुणिया सदृश आजारचे रुग्ण दिसत आहेत. त्यासंबधिची माहितीही आम्ही नगरपंचायत प्रशासनाला दिली आहे. ज्या नागरिकाणा काहीही त्रास जाणवत असेल त्यांनी ग्रामीण रुग्णालयात उपचार घ्यावेत. नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. :
                                              डॉ. जी. आर. महेंद्रकर, 
                                             तालुका आरोग्य अधिकारी 

नळदुर्ग चे सुपुत्र झिया शेख याने सहकारी विद्यार्थ्यांसोबत तयार केला लो कॉस्ट ऑक्सिजन व्हेंटिलेटर

 नळदुर्ग चे सुपुत्र झिया शेख याने सहकारी विद्यार्थ्यांसोबत तयार केला 

      लो कॉस्ट ऑक्सिजन व्हेंटिलेटर


नळदुर्ग :-  नळदुर्ग चे सुपुत्र झिया शेख व त्यांच्या सहकारी विद्यार्थ्यांनी  कारच्या वायपर मोटारचा वापर करून बनविले आहे लो काॅस्ट ऑक्सिजन व्हेंटिलेटर.या विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकीचे शिक्षण येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागातुन झाले आहे. सध्या कोरोना महामारीमुळे आज अनेक रुग्णांना अत्यावश्यक असलेल्या ऑक्सिजन व्हेंटिलेटरची सोय करणे कठीण होत चालले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर याचा फार मोठा ताण पडत आहे. आरोग्य यंत्रणेवर येणारा हा ताण लक्षात घेता सोलापुर येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले झिया मुनीर शेख, संतोषी वाले व पुजा गुरव या विद्यार्थ्यांनी आपत्कालीन व्हेंटिलेटर सिस्टीम तयार केली आहे.



 यामध्ये प्रामुख्याने रुग्णाला जेवढ्या ऑक्सिजनची गरज आहे तेवढाच तो घेईल. यावरून या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या लो काॅस्ट व्हेंटिलेटरची कार्यक्षमता लक्षात येते. त्याचबरोबर ऑटोमॅटिक मशिनद्वारे त्याचे पल्स रेट मोजले जातील. जेणेकरून उपचार करताना डॉक्टरांना यामुळे सोपे पडेल. महागड्या व्हेंटिलेटर सिस्टिमच्या तुलनेत ही यंत्रणा अगदी कमी किमतीत असल्याने या व्हेंटिलेटरचे नाव विद्यार्थ्यांनी लो काॅस्ट ऑक्सिजन व्हेंटिलेटर असे ठेवले आहे. ही सिस्टीम बनविण्यासाठी या विद्यार्थ्यांना प्रा. डॉ. शशिकांत हिप्परगी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ऑक्सिजन व्हेंटिलेटरमुळे प्रत्येक रुग्णालयात त्याच्या अभावामुळे आज कित्येक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी व रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी कमी किमतीचे व्हेंटिलेटर बनविण्याचा आणि प्रत्येक छोट्या, छोट्या रुग्णालयात व ग्रामीण भागातील रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे असे झिया मुनीर शेख याने म्हटले आहे.          


*************************
हे व्हेंटिलेटर असे कार्य करते

या व्हेंटिलेटरमध्ये एएमवीयू बॅग, कृत्रिम मॅन्युअल ब्रिथिंग युनिट बॅग आणि त्यातुन बाहेर येणारी हवा दाबुन रुग्णाला योग्य असा ऑक्सिजन पुरवठा व्हावा अशी सोय करण्यात आली आहे. एएमवीयू बॅग दाबण्यासाठी मोटारीच्या वायपरची मोटार वापरली आहे. त्याचबरोबर मानवी श्वासोच्छ्वासानुसार त्या मोटारीचा वेग नियंत्रित करण्यासाठी स्पीड कंट्रोलर वापरला आहे. हा प्रकल्प सुरुवातीला सेन्सर वापरून रुग्णाच्या ह्रदयाचा ठोका तपासतो. त्याचा डाटा इनपुट म्हणुन दिला जातो. रुग्णाच्या ह्रदयाचा ठोका किंवा नाडीची स्थिती आर्दूनोच्या मदतीने दर्शवितो. यानंतर डॉक्टरांच्या मदतीने वायूबीजने सेट केले जाते. यामध्ये चार चाकी गाड्याचे वायपर मोटारीचा वापर करून अगदी कमी किमतीत हे व्हेंटिलेटर प्रयोजिक तत्त्वावर बनवले आहे. यामध्ये आरोग्य क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेऊन हे व्हेंटिलेटर बाजारात विक्री साठी असल्याचेही झिया शेख याने म्हटले आहे. 
*************************
नळदुर्गच्या झिया शेख व त्यांच्या सहकारी विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे लो काॅस्ट ऑक्सिजन व्हेंटिलेटर आजच्या कोरोनाच्या महामारीच्या काळात गरीबांसाठी दिलासा देणारे आहे. असे आरंभ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचिव व भाजयुमोचे शहर अध्यक्ष श्रमिक पोतदार यांनी म्हटले असुन झिया शेख ची ही कामगिरी दैदिप्यमान व कौतुकास्पद आहे असेही श्रमिक पोतदार यांनी म्हटले आहे.
**************************
 नळदुर्ग नगरपालिकेतील कर्मचारी मुनीर शेख यांचे चिरंजीव झिया शेख यांने लो कास्ट ऑक्सिजन व्हेंटिलेटर तयार करून नळदुर्ग शहराचा नावलौकिक केल्या बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक करुन अभिनंदन केले जात आहे.

नगराध्यक्षा रेखाताई जगदाळे यांचे संकटकालीन परिस्थितीमध्ये तरी शहरात आगमन होणार का ?

 बाहेरगावी राहुन पोस्टर्स च्या माध्यमातून जनजागृती करणाऱ्या नगराध्यक्षा रेखाताई जगदाळे यांचे संकटकालीन परिस्थितीमध्ये तरी शहरात आगमन होणार का ?


नळदुर्ग :- बाहेरगावी राहून पोस्टरच्या  माध्यमातून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव पासुन बचावासाठी जनजागृती करणाऱ्या नळदुर्ग नगरपालिकेच्या नगराध्यक्षा रेखाताई जगदाळे यांचे प्रत्यक्ष शहरात आगमन होऊन कोरोना महामारीच्या संकटकालीन परिस्थितीमध्ये सापडलेल्या नळदुर्गकरांना दिलासा देण्याचे काम करतील का ?  असा प्रश्न शहरवासीयांच्या वतीने उपस्थित होत आहे.कारण  कोरोनाने उस्मानाबाद जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव पासुन बचावासाठी व कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ संदीप पालवे, जिल्हा आरोग्य चिकित्सक धनंजय पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आरोग्य, पोलीस, महसूल व नगरपालिका प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता आपल्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र काम करीत आहेत. त्याच बरोबर खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील,आमदार कैलास पाटील या लोकप्रतिनिधींसह जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेचे नगराध्यक्ष कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना आरोग्य व इतर अडचणी दूर करण्यासाठी रस्त्यावर उतरून काम करीत आहेत.याच्या विपरीत परिस्थिती नळदुर्ग शहराची आहे. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित हानी होत असल्याने नागरिकांमध्ये एका प्रकारची भीती निर्माण झाली आहे.त्याच बरोबर शहरात देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असल्याने नळदुर्गकरांच्या समोर देखील कोरोना महामारीचे मोठे संकट उभे आहे. अशावेळी नळदुर्ग नगरीच्या प्रथम नागरिक या नात्याने नगराध्यक्षा रेखाताई  जगदाळे हे स्वतःशहरात उपस्थित राहून संकटकालीन परिस्थितीमध्ये नगरपालिका, पोलीस व आरोग्य  प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सोबत समन्वय साधून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव पासुन शहरवाशीयांचा कसा बचाव करता येईल यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे मात्र ज्यांचे कर्तव्य आहे ते  नळदुर्ग नगरपालिकेच्या नगराध्यक्षा रेखाताई जगदाळे हे  गेल्या अनेक महिन्यापासून  बाहेरगावी आहेत. कोणते ही युद्ध असो किंवा स्पर्धा असो त्याला लढण्यासाठी कॅप्टनची ( सेनापती)  ची गरज असते मात्र शहरात कोरोनाच्या विरोधातील युद्ध लढताना नळदुर्गच्या प्रथम नागरिक असलेल्या सेनापती (नगराध्यक्षा) गैरहजर असल्यामुळे हा युद्ध लढायचे कसं   जिंकायचं कसं हा प्रश्न नळदुर्ग शहरातील नागरिकांना पडला आहे. त्याचबरोबर उपनगराध्यक्ष पद देखील एक वर्षापेक्षा जास्त कालावधी पासून रिक्त असल्याने आपल्या समस्या सोडविण्यासाठी  कुठं जायचं असा प्रश्न शहरवासीयांच्या समोर उभा आहे. कारण नळदुर्ग नगरपालिकेच्या नगराध्यक्षा रेखाताई जगदाळे हे नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून सतत बाहेरगावी राहत असल्याने त्यांचे आगमन शहरात  राष्ट्रीय सण असलेल्या 15 ऑगस्ट, 26 जानेवारी किंवा नगरपालिकेत पालिकेत होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या वेळीच होते. त्यामुळे नॉटरिचेबल नगराध्यक्षा म्हणून त्यांची ओळख  शहरवाशीयां मध्ये निर्माण झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट  अतिशय घातक असल्याने बेड व ऑक्सिजनची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्याने अनेकदा रुग्णांना आपले जीव गमवावे लागत आहे अशी गंभीर परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाल्याने  नागरिकांमध्ये एका प्रकारची घबराट पसरली आहे अशावेळी पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती करण्यापेक्षा प्रत्यक्षात शहरात हजर राहून लोकांना दिलासा देण्याचे काम नगराध्यक्षांनी करणे गरजेचे आहे मात्र नळदुर्गकरांची शोकांतिका अशी आहे की सध्याच्या घडीला नळदुर्गकरांची समस्या सोडवून  दिलासा देणारा कोणी वालीच नसल्याने नळदुर्गकरांची अवस्था आईविना पोरका होऊन भरकटलेल्या मुलासारखी झाली आहे. आजच्या घडीला नळदुर्ग शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याकरिता नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत, सुधीर मोटे, पोलीस उपनिरीक्षक कैलास लहाने, मुसा शहा, मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, नळदुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ राहुल जानराव डॉ ज्योती तीर्थ, डॉ.एम.एम.शेख, डॉ यशवंत नरवडे यांच्यासह पोलीस, नगरपालिका व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी जनजागृती व इतर माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम करीत आहेत. मात्र ज्यांची जबाबदारी आहे. ते लोक  रस्त्यावर उतरून काम करण्याऐवजी केवळ पोस्टरच्या माध्यमातून स्वतःचा उदो उदो करून घेण्याकरिता व श्रेय लाटण्यासाठी मी केले मी केले म्हणून पोस्टरबाजी करीत आहेत. त्यामुळे एका प्रकारची नाराजगी शहरवासीयांच्या वतीने व्यक्त केली जात आहे. व शहरवासीयांच्या वतीने अशी मागणी केली जात आहे की नगराध्यक्षा रेखाताई जगदाळे यांनी तात्काळ शहरात येऊन कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव पासुन बचावासाठी रस्त्यावर उतरून उपाययोजना कराव्यात.

**************************
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः धुमाकूळ घातल्याने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव पासुन बचावासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लावल्याने  हातावर पोट असलेले लहान व्यापारी व मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे लोक पूर्णपणे आर्थिक अडचणीत सापडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे अशा वेळी  त्यांना मदत करणे गरजेचे आहे. त्यामुळे नाही त्यावेळी समाजसेवा, दानशूरपणाचा गाजावाजा करत  पोस्टरबाजी व सोशल मीडियातून स्वतःची वाहवा करून घेणारे  तथाकथित समाजसेवक अशा या संकटकालीन परिस्थितीमध्ये गरजुवंत लोकांना मदत करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माऊली प्रतिष्ठाणच्या कोविड सेंटरचे उदघाटन

 माऊली प्रतिष्ठाणच्या कोविड सेंटरचे उदघाटन


उमरगा/प्रतिनिधी

 उमरगा येथील माऊली प्रतिष्ठानच्या कोविड सेंटरचे उदघाटन दि २७ एप्रिल रोजी  सौ प्रतिभा गिरीश सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले

तहसिलदार संजय पवार वैद्यकीय अधिक्षक डॉ.अशोक बडे डॉ विक्रम आळंगेकर, तालुका आरोग्य अधिकारी सुहास साळुंके  मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, माऊली प्रतिष्ठाणचे अध्यक्ष उमाकांत माने, माधव पवार, डॉ अभिजित जगताप, बप्पा हराळकर, गिरीश सूर्यवंशी, बळी मामा सुरवसे बापू बिराजदार, नितीन होळे, अनिल बिराजदार अभिषेक पवार यांच्या उपस्थिती मध्ये करण्यात आल. 
यावेळी तहसिलदार संजय पवार आणि डॉ अशोक बडे आदीसह मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन  करण्यात आले दरम्यान कोरोना काळात सामाजिक काम करणारे विजय काका जाधव यांचा माऊली प्रतिष्ठान च्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक सिद्धेश्वर माने यांनी तर सूत्र संचलन प्रवीण स्वामी यांनी केले तर आभार सचिन सूर्यवंशी यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश चव्हाण, राहुल सुरवसे, स्वप्निल सोनकवडे, प्रसन्ना पुदाले, सिद्धू दुधभाते, दिपक काळे,  प्रथमेश राऊत मितेश राखेलकर आदींनी पुढाकार घेतला .

नगरसेवक चौधरी यांच्यामार्फत कोविड रुग्णांना मोफत अंडी वाटप

 नगरसेवक अजित चौधरी यांच्यामार्फत कोविड रुग्णांना  मोफत अंडी वाटप



मुरूम/प्रतिनिधी
मुरूम नगर पालिकाचे नगरसेवक तथा युवासेनेचे उमरगा तालुका प्रमुख अजित चौधरी  यांच्यामार्फत मुरूम येथील कोविड केअर सेंटर मधील  रुग्णांना आजपासून दररोज  मोफत अंडी वाटप करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आले आहे

कोरोनाच्या या  काळात रुग्णाची रोग प्रतिकार शक्ती वाढावी,
रुग्ण लवकर बरे होण्यासाठी बळ मिळावे म्हणून सामाजिक बांधीलकीच्या नात्याने रुग्णांना आजपासून  मोफत अंडी वाटप करण्यात येत आहे असे नगरसेवक अजित चौधरी यांनी सांगितले
 मागील वर्षभरापासून चौधरी यांच्याकडून गरजू लोकांना धान्य देण्याचे कार्य सुरू आहे
या उपक्रमाचे सुरुवात करताना आरिफ कुरेशी, विशाल मोहिते, जयसिंह खंडागळे तसेच कोविड सेंटर मधील कर्मचारी  उपस्थित होते.

तुळजापूर तालुक्यातील १ लाख ७७ हजार ६६७ ........लाभार्थ्यांना मिळणार मोफत धान्य

 तुळजापूर तालुक्यातील १ लाख ७७ हजार ६६७     ........लाभार्थ्यांना मिळणार मोफत धान्य



नळदुर्ग :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या कडक लॉकडाऊन सुरू असुन या लॉकडाऊनच्या काळात गरीबांची उपासमार होऊ नये यासाठी महाराष्ट्र तसेच केंद्र सरकारच्या वतीने राज्यातील अंत्योदय व प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना मोफत अन्नधान्य देण्यात येणार आहे. तुळजापुर तालुक्यातील अंत्योदय तसेच प्राधान्य गटातील १ लाख ७७ हजार ६६७ लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य मिळणार आहे यामध्ये अंत्योदय ४ हजार ९९२ व प्राधान्य गटातील २९ हजार २५९ शिधापत्रिकांचा समावेश असल्याचे तालुका पुरवठा अधिकारी संदीप जाधव यांनी म्हटले आहे. सध्या सर्वत्र विशेष करून महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड मोठया प्रमाणात वाढला आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तसेच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कोरोनाचा वाढता आलेख रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यात कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉकडाऊनची सर्वाधिक झळ सर्वसामान्य व गरीबांना बसली आहे. लॉकडाऊनमुळे छोटे व्यापारी, व्यावसायिक तसेच ज्यांचे हातावर पोट आहे अशांचे मोठे हाल होत आहेत. कामधंदा नसल्याने घर कसे चालवायचे हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला होता. या लॉकडाऊनच्या काळात कामगार तसेच मजुरांचेही मोठे हाल होत आहेत. लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य नागरीक, कामगार, मजुर, तसेच छोट्या व्यावसायिकांची उपासमार होऊ नये यासाठी राज्य व केंद्र सरकारने राज्यातील अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना प्रत्येकी ३ किलो गहु व २ किलो तांदुळ मोफत देण्यात येणार आहे तर अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी ३५ किलो अन्नधान्य मोफत देण्यात येणार आहे. यामध्ये २३ किलो गहु व १२ किलो तांदुळ देण्यात येणार आहे. शासनाच्या या मोफत अन्नधान्य देण्याच्या या निर्णयामुळे गरीबांना मोठा दिलासा मिळाला आहे. तुळजापुर तालुक्यात या मोफत अन्नधान्य वाटपाचा फायदा अंत्योदय व प्राधान्य गटातील जवळपास १ लाख ७७ हजार ६६७ लाभार्थ्यांना होणार आहे. तुळजापुर तालुक्यात अंत्योदय गटातील ४ हजार ९९२ तर प्राधान्य गटातील २९ हजार २५९ शिधापत्रिका आहेत. या सर्व शिधापत्रिकाधारकांना हे मोफत अन्नधान्य मिळणार असल्याचे तालुका पुरवठा अधिकारी संदीप जाधव यांनी म्हटले आहे.

Saturday, 24 April 2021

मी तुमचा “प्राणवायू” म्हणजेच “ऑक्सीजन” बोलतोय

          मी  तुमचा “प्राणवायू”                  म्हणजेच....“ऑक्सीजन” बोलतोय !

वाशी/ विक्रांत उंदरे 

 “नमस्कार, मी तुमचा “प्राणवायू” म्हणजेच “ऑक्सीजन” बोलतोय”; ‘आवाज येतोय ना माझा तुम्हाला?’ ‘आवाज पोहोचत असेल असच समजून मी आपल्याशी काही बोलायला आलो आहे. माझ्या “निसर्ग” नावाच्या कुटुंबाच्या काही अडीअडचणी आणि आमच्या भावना नेहमीप्रमाणेच आताही तुम्हाला सांगान्याचा प्रयत्न करतोय. यावेळी फक्त बदल एवढाच आहे की, माझ्या कुटुंबाने ही जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. आशा आहे आता तरी तुम्ही आमच्या समस्या समजून घेताल आणि तुमच्या वागण्यात काहीतरी ‘पर्यावरण पूरक’ बदल होईल. 

“तु तर खूप मोठा झालास रे” , “तु आता रेल्वेने , जहाजाने फिरू लागलास म्हणे”, असे म्हणून माझा मोठा भाऊ नायट्रोजन मला बोलत होता. एवढ्यातच माझा लहाना भाऊ कार्बनडाय ऑक्साइड मला म्हणाला “काल परवा तर न्यायालयानेच तुझी ‘भीक मागा, चोरी करा पण ऑक्सीजन उपलब्ध करा’ असेच निर्देश दिल्याचे एकायला आले.” हे सांगत असतानाच त्याने “महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे हात जोडून ‘पाया पडतो पण आम्हाला ऑक्सीजन द्या’ आशी आर्त विनवणी केली म्हणे , हे  खरय का ? अशी विचारणा केली. त्यावर मी निशब्द होतो.  तर आर्गोंन, नियोन, हेलियम, मिथेन, हयड्रोजन, ओझोन , झेंनिन, क्रिपटोण हे लहान बांधव यांची मात्र निरागसपणे  किलबिल सुरू होती. 

आमच्या आईसाहेब हवा हे शांतपणे एकूण घेत होत्या आणि मानसाच्या कोविड च्या या बिकट काळात सुरू असलेल्या चिंताजनक परिस्थितीच आकलन करत होत्या. त्यावर आईने मला जवळ घेतलं आणि मला म्हणाली “प्रथ्वीवरील प्रत्येक प्राण्याला तुझी गरज आहे. प्रत्येक साजिवात प्राण राहण्यासाठी तुझी आवश्यकता आहे. म्हणूनच तुझ नाव प्राणवायू आहे. हे खर आहे की, तुला तेवढं महत्व दिला जात न्हवत; कारण तु मोफत मिळतोस आणि सहज उपलब्ध होतास म्हणून दुर्लक्षित होतास. 

पण तुझं महत्व तर अनन्यसाधारण आहेच आणि आज मात्र ते अधोरेखीत होतय.” हे बोलतानाच तिला नाशिक येथे झालेल्या दुर्घटनेची आठवन झाली आणि तिचे डोळे पाणावले. दबक्या आवाजात हुंदका देत ती म्हणाली “काही रुग्णांनाच तुझा पुरवठा करण्यात मानव कमी पडतोय आणि तु न मिळाल्याने किती निष्पापाणा आपले प्राण गमवावे लागत आहेत रे” असे म्हणत तिने मला कवठाळले. मग मी विचार केला की माणूस सध्या कोट्यवधी रुपये खर्चूनही काही रुग्णांना ऑक्सीजन देण्यात कमी पडतोय तो पुरेसा पुरवठा करू शकत नाही.  निसर्ग मात्र अविरत पणे सातत्यापूर्ण ऑक्सीजनचा पुरवठा करतोय’ त्या बदल्यात माणूस निसर्गाला काय देतोय? तर फक्त पर्यावरण आणि निसर्गाची हानीच.


आणि मग मी ठरवलं आज मानवाला बोलायचच कसल्याही परिस्थितित ; त्याच्या चुकामुळे आमच्या निसर्गाला होत असलेल्या वेदना , आमची होत असलेली हानी त्याला सांगायचीच. “ आमची ही सहनशक्ति संपते कधी कधी आणि मग निसर्गाचा प्रकोप होतो ; तो तुम्हाला सहन होत नाही. म्हणून माझी एकच विनंती आहे तुमचा विकास करताना आमचा पण थोडातरी विचार करा , आमच्या पण भावना समजून घ्या. निसर्गाने केलेला प्रकोप हा प्रकोप नसतो. तर तुम्ही केलेल्या निसर्गाच्या हानी सुधारन्यासाठी ती दीलेली एक संधि असते. 

  ऑक्सीजनचा पुरवठा करण्यासंधरबात बैठकांचे सत्र सुरू आहेत. त्यातून ऑक्सीजनचे उत्पादन वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. ती आजची गरज आहेच ते करावेच लागेल यात शंकाच नाही. मात्र हे माणसा निसर्गातील ऑक्सीजन चे घटत चाललेले प्रमाण वाढवण्यासाठी तु काय करतोस. ऑक्सीजन सिलेंडर भरण्याठी तु मोठ मोठे प्लांट लावशील आणि ऑक्सीजन सिलेंडर रीफील करशील पण या प्रथ्वीतलावरील ऑक्सीजन रीफील करणारे वृक्षरूपी प्लांट कधी उभा करणार ?. आज होत असलेली झाडांची तोड, वाढत असलेले वायुप्रदूषण यावर कसा अंकुश लावणार?. काही लोकांना ऑक्सीजन पुरवठा करण्यात तुम्ही हतबल आहात तर  विचार करा जर वेळीच तुम्ही सुधारले नाहीत तर एक दिवस असाही येईल की प्रत्येकाला ऑक्सीजन पुरवावा लागेल. त्यावेळी तुमच्या यंत्रणा  कोलमडून जातील. एकच यंत्रणा अशावेळी तुम्हाला उपयोगी पडेल ती आमची निसर्गाची यंत्रणा. आणि तुमच्या चुका तिलाही पोखरून टाकत आहेत. जर निसर्गही हतबल झाला तर हे मानवा तुझ अस्तित्वला कुठे तरी धोका आहे. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. तुला आता माझे महत्व लक्षात आले आहे. आता तरी तुझ्या पृव्रत्तीत सुधार कर , तुझ्या “सेल्फिश” स्वभावात बदल कर आणि निसर्गाला जप.



म्हणून माझ एक सांगणं आहे. रोपे लावा आणि ती जगवून त्याची झाडे करा, उपलब्ध वृक्ष आता तरी तोडू नका त्याचे संवर्धन करा. ज्याप्रमाणे आज शासन ऑक्सीजन उपलब्धतेसाठी युद्धपातलीवर प्रयत्न करत आहे. तसेच प्रयत्न आता पर्यावरण रक्षणासाठी सुद्धा होणे गरजेचे आहेत. पर्यावरणाची जर अशीच हानी होत राहिली तर येणार्या् काळात माझी निसर्गातील उपलब्धता कमी होत जाईल. त्यामुळे पर्यावरण वाचवा माणूस वाचेल... 

आता थांबतो. तुमच्याकडून आमच्या भावनाचा आणि समस्यांचा विचार होईल आणि त्यावर अमलबजावणी सुरू होईल एवढी आशा बाळगतो.  माझ्या बोलण्याने कोणाला दुख झाले असले तर माफी मागतो आणि थांबतो. एवढच .. बोलतो पुन्हा कधीतरी असाच.

समाजसेवक तथा बौध्दाचार्य विजय माळाळे यांचे दु:खद निधन

  जनतेच्या कामी येणारे समाजसेवक तथा बौध्दाचार्य विजय माळाळे यांचे दु:खद निधन



उस्मानाबाद:- तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागात अंशकालीन म्हणुन काम करणारे,सर्वांच्या कामी पडणारे तथा बौध्दाचार्य विजय माळाळे यांचे दि २४ /०४/२०२१ रोजी कोरोनामुळे शासकीय रुग्णालयात उपचार दरम्यान दु:खद निधन झाले, निराधार,दिव्यांग,यांच्या सहित इतर योजना मिळवुन देणारे जनसेवक म्हणुन प्रचलित होते,त्यांच्याकडे कामासाठी जाणारा माणुस निराश होत नसत,घरातील मोठ्या कुटुंबाची जवाबदारी त्यांच्यावर होती,त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,आई,वडिल,तिन भाऊ त्यांची पत्नी मुले असा एकत्रीत कुटुंब परिवार आहे,सद्य परिस्थितीत त्यांचे सर्व कुटुंब कोरोना पाॅजिटिव्ह असुन शासकीय रुग्णालय व कोरोना सेंटर मध्ये त्यांच्यावरती उपचार चालु आहेत,बौध्द शमशान भुमीत त्यांच्यावरती शासनाने लावलेल्या कोरोनाच्या नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले,बुध्दवाशी विजय माळाळे यांच्या निधनाची बातमी फेसबुक,वाॅटस अॅप व इतर माध्यमातुन पसरली असता शहरात हळहळ व्यक्त होत होती,बिगविशम ग्रुप व समाजबांधवा तर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली,यात प्रामुख्याने गणेश रानबा वाघमारे,संजय बिटु माळाळे,शशी माने,महेश सरवदे,विनोद सरवदे,राजेंद्र बनसोडे, शिवलिंग लोंढे,अन्य इतर उपस्थित होते.

Thursday, 22 April 2021

विना मास्क व विनाकारण फिरणाऱ्यांच्या विरोधात प्रशासनाची धडक मोहीम राबवून कोरोना चाचणी व दंडात्मक कारवाई

 विना मास्क व विनाकारण फिरणाऱ्यांच्या विरोधात  प्रशासनाची धडक मोहीम राबवून केली कोरोना चाचणी व दंडात्मक कारवाई




नळदुर्ग /लतीफ शेख
नळदुर्ग बसस्थानकासमोरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वर  विनामास्क तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरीकांविरोधात तहसिलदार सौदागर तांदळे, साहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत, नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्याची संयुक्त धडक मोहीम राबविण्यात आली. यावेळी विनामास्क तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरीकांची कोरोना चाचणी करण्याबरोबरच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे विनामास्क तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असुन सर्वसामान्य नागरीकांनी मात्र प्रशासनाच्या या कारवाईचे स्वागत केले आहे. सध्या सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू आहे. दररोज कोरोनामुळे शेकडो लोकांचा मृत्यु होत आहे. तर हजारो लोक कोरोनामुळे बाधित होत आहेत. कोरोनाचा संसर्ग इतका वाढला आहे की परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 
        राज्य शासन नागरीकांचा जीव वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोरोनाचा वाढत चाललेला संसर्ग थांबविण्यासाठी तसेच कोरोनाची वाढत चाललेली साखळी तोडण्यासाठी अनेक कडक निर्बंध लावले आहेत. राज्यशासनाने लावलेल्या निर्बंधांचे पालन व्हावे यासाठी पोलीस, तहसील, नगरपालिका व आरोग्य प्रशासन प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे. असे असताना नागरीकांना मात्र कोरोनाचे कुठलेच भय नाही. नागरीक, व्यापारी, फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते हे अतिशय बेफिकीरीने वागत आहेत याचाच परीणाम म्हणुन आज कोरोना झपाट्याने वाढत चालला आहे. ही परिस्थिती थांबविण्यासाठी सरकार व प्रशासन अतिशय चांगले काम करीत आहे. मात्र काही बेफिकीरीने वागणाऱ्या नागरीकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. नळदुर्ग शहरात जे व्यापारी, भाजीपाला तसेच फळ विक्रेते मास्कचा वापर करीत नाहीत अशाना शहरात व्यापार करण्यास तसेच फळे व भाजीपाला विक्री करण्याची परवानगी देऊ नये. कारण अशा बेफिकीरीने वागणाऱ्या माणसांमुळेच आज कोरोना वाढत चालला आहे. 
   २२ एप्रिल रोजी नळदुर्ग बसस्थानकासमोर तहसिलदार सौदागर तांदळे  नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश राऊत, सुधीर मोटे, पोलिस उपनिरीक्षक कैलास लहाने, न.प.चे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, मंडळ अधिकारी अमर गांधले, नळदुर्ग बिटचे सतिश घंटे, विशाल सगर, रुपेश पाटील, मन्मत पवार,जाकेर काझी,भिमा गायकवाड, अमोल फतापुरे,गणपत मुळे,जिविशा चे धनंजय वाघमारे, नगरपालिकेचे मुनीर शेख, खालील शेख, राजाभाऊ सुतार, मुस्ताक पटेल, अण्णा जाधव ,ज्योती बचाटे, खंडू शिंदे ,शहाजी येडगे यांनी विनामास्क तसेच विनाकारण दुचाकीवरून किंवा पायी रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांविरोधात धडक कारवाई करण्याची मोहीम राबविली. यावेळी विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांची नळदुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ राहुल जानराव, डॉ यशवंत नरवडे यांनी कोरोना चाचणी केली याचबरोबर प्रशासनाने केलेल्या सूचनेचे पालन न करणाऱ्या विरोधात दंडात्मक कारवाईही करण्यात आली. यामुळे विनामास्क तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यामध्ये एकच खळबळ उडाली. वास्तविकपाहता आशा प्रकारची कारवाई प्रशासनाने नळदुर्ग शहरात वारंवार करण्याची गरज आहे. प्रशासनाच्या या कारवाईचे सर्वस्तरातुन स्वागत होत आहे.

Wednesday, 21 April 2021

सावधान - संसर्ग वाढतो आहे !

      सावधान - संसर्ग वाढतो आहे  !    .



उस्मानाबाद,
सदर छायाचित्र अगदी बोलके जाणवते, शासन लॉक डाऊनलोड चे प्रभावी पालन होण्यासाठी प्रयत्न करीत आहे आणि त्यात नित्याने बदल ही करीत आहे , मात्र याकडे नागरिकांनी व संबंधित विभागाने पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे. अशा ठिकाणी वाहतूक नियंत्रण शाखा नसल्यासारखी जाणवते . फळविक्रेते असोत किंवा पालेभाज्या विक्रेते यांना जणू सोशल डिस्टंसिंग चा लवलेशही माहीत नसावा, अशा पद्धतीने विना मास्क व्यापारी व वीणा मास्क ग्राहक अशी स्थिती सर्वत्र दिसत अशा गोष्टींकडे नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे जाणवते.मुख्य चौक असेल किंवा बाजार पेठ दिलेल्या वेळा बदलून ही अशी ट्रॅफिक जाम होईपर्यंत गर्दी होताना दिसत आहे. अशाने वाढता संसर्ग कसा रोखला जाऊ शकेल. शेवटी नागरिक जागरूक झाला पाहिजे.- बाळासाहेब अणदुरकर उस्मानाबाद

बेंबळी पोलीस स्टेशनच्या परिसरात अवैध धंद्यांना बहर

        बेंबळी पोलीस स्टेशनच्या परिसरात

                   अवैध धंद्यांना बहर

   पोलीसांचे माञ अक्षम्य दुर्लक्ष. लक्ष्य देण्याची मागणी



उस्मानाबाद/प्रतिनिधी
                        उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांना ऊत आला आहे.पोलीस अधिकारी येतात,जातात परंतू अवैध धंदेवाल्यांवर माञ काहीच परिणाम होत नाही.कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यासह जिल्ह्यात टाळेबंदी असल्याने जिल्हा प्रशासन प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी तारेवरची कसरत करत असताना अवैद्य धंदेवाल्यांनी डोके वर काढले आहे व राजरोसपणे विनापरवाना मद्यविक्री,गांजाविक्री,मटका यासारखे अवैद्य धंद्यांची दुकाने चालवण्यास सुरुवात केली आहे.बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येक गावातील चौकात व रस्त्याच्या कडेनी मोठ्या प्रमाणात मद्यविक्री विनापरवाना सुरु असून कोणाच्या आशीर्वादाने हे अवैद्य धंदे सुरु आहेत हे सर्वसामान्य जनतेला माहित आहे.त्यात नांदुर्गा,कनगरा,टाकळी,मेंढा,समुद्रवाणी व स्थानिक बेंबळी पोलीस ठाण्याचे गावही दारुविक्रीसाठी हाॅटस्पाॅट असून पोलीस या अवैद्य धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळण्यास सपशेल अपयशी ठरत आहेत.यामुळे सर्वसामान्यांचे संसार उघड्यावर येत आहेत.तरुण मुलेही व्यसनाकडे वळत असल्याने परिसरात तरुणांनाही कोणाचाच धाक राहिलेला नाही.त्यामुळे परिसरात गाड्या फिरवणे,कट मारने,मद्यधुंद राहाणे असे प्रकार तरुण करत असल्याने सामान्य नागरिकांना याचा नाहक ञास सोसावा लागत आहे.तसेच अशा गावाकडे पोलीस फिरकायला तयार नसल्याने पोलीस आणि अवैद्य धंदेवाले यांच्यातच साटेलोटे असल्याच सर्वसामान्यांतून बोलल जात आहे.
          तसेच अवैद्य धंदेवाल्यांकडे पोलीस ठाण्यातून चुकून मोर्चा वळलाच,तर याची खबर आधी अवैद्य धंदेवाल्यांना लागत असल्याने बेंबळी पोलीसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.पोलीस प्रशासनातील अशा काही कर्मचार्‍यांमुळे प्रामाणिक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचीही नाहक प्रतिमा मलिन होत आहे.अवैद्य धंदेवाल्यांना कोणाचा आशीर्वाद आहे याचीही चौकशी करण्याची गरज आहे.
      सध्या कोरोनासारख्या महाभयंकर माहामारीने राज्यासह जिल्ह्यातील अनेकांचा बळी घेतला आहे.राज्यात टाळेबंदीची घोषणा सरकारने केली असली,तरी मद्यविक्री,मटका,गांजा सारख्या ठिकाणी मोठी गर्दी होताना दिसत असून जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देण्याची गरच निर्माण झाली आहे.
               जिल्हा पोलीस अधिक्षकांनी जिल्ह्यातील अनेक गावातील अवैद्य धंदेवाल्यांच्या  मुसक्या आवळल्या असून,बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैद्य धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे.

संत निरंकारी मिशनच्या वतीने दिल्लीमध्ये १००० पेक्षाही अधिक बेड्सचे कोविड-१९ ट्रिटमेंट सेंटरमानवतेसाठी समर्पित

 संत निरंकारी मिशनच्या वतीने दिल्लीमध्ये १००० पेक्षाही अधिक बेड्सचे कोविड-१९ ट्रिटमेंट सेंटरमानवतेसाठी समर्पित



मुंबई,२१ एप्रिल, २०२१ : सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने संत निरंकारी मिशनच्या वतीने मिशनचे बुराडी रोड, दिल्ली येथील ग्राऊंड नं.८ च्या विशाल सत्संग भवनामध्ये कोविड-१९ महामारीने ग्रस्त रुग्णांच्या उपचारांसाठी १००० पेक्षाही अधिक बेड्सचे कोविड-१९ ट्रिटमेंट सेंटर संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरसहित दिल्ली सरकारला उपलब्ध करुन दिले जात आहे. सरकारच्या सहयोगाने या ट्रिटमेंट सेंटरमध्ये बेड इत्यादि व रुग्णांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था संत निरंकारी मिशनकडून करण्यात येत आहे.

या संदर्भात दिल्ली सरकारचे आरोग्य मंत्री मा.ना.श्री.सत्येन्द्र जैन यांनी आरोग्य विभागाच्या टीम समवेत या जागेची पाहणी केली आणि समाधान व्यक्त करुन याठिकाणी संत निरंकारी मिशनच्या वतीने कोविड-१९ ट्रीटमेंट सेंटर तयार करण्यास अनुमति प्रदान केली. संत निरंकारी मिशनने या कार्यामध्ये पुढाकार घेतल्याबद्दल मंत्री महोदयांनी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांना धन्यवाद दिले.



याशिवाय भारतातील सर्व सत्संग भवन कोविड लसीकरण केंद्रांसाठी उपलब्ध करुन देण्याबाबतही मिशनच्या वतीने भारत सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यास मंजूरी मिळाली असून मिशनची देशभरातील शेकडो सत्संग भवने कोविड लसीकरण केंद्रांमध्ये परिवर्तित झालेली आहेत. कित्येक निरंकारी भवन ‘कोविड -19 ट्रिटमेंट सेंटर’ म्हणून परिवर्तित करण्यात येत आहेत. त्याचबरोबर संत निरंकारी मिशनची कित्येक सत्संग भवनं मागील बऱ्याच कालावधीपासून क्वारंटाईन सेंटर म्हणून संबंधित प्रशासनांना उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. 

उल्लेखनीय आहे, की भारतात कोविड-१९ चा प्रादुर्भाव झाल्यापासूनच संत निरंकारी मिशनकडून राशन-लंगर वाटप करण्यापासून ते मा.पंतप्रधान सहायता निधी आणि अनेक राज्य सरकारांच्या मुख्यमंत्री सहायता निधींमध्ये आर्थिक सहाय्यदेखिल करण्यात आले आहे. तसेच पीपीई किटस, मास्क, सॅनिटायझर इत्यादीचा पुरवठाही वैद्यकीय कर्मचाऱ्यांकरिता उपलब्ध करुन देण्यात आला आहे. याशिवाय देशभर सातत्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे.

विनाकारण बाहेर फिरताय ? तर रॅपिड टेस्टला सामोरे जा!

 विनाकारण बाहेर फिरताय ? तर रॅपिड टेस्टला सामोरे जा!


उस्मानाबाद,
आज रोजी पासून उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा या सकाळी सात ते अकरा या कालावधीतच सुरू राहणार व आकरा नंतर संपूर्ण शहरामध्ये कडक संचारबंदी असे सुरू झाले . 

याप्रसंगी या प्रसंगाची जागृती होण्याचे हेतूने संबंधित सर्व विभागाने रूट मार्च करून जागृती केली व नागरिकांना घरातच राहण्याचे आव्हान केले व विनाकारण या संचार बंदी च्या काळामध्ये फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड टेस्ट करून घेतली जात आहे. व जे यामध्ये संसर्गित आहेत त्यांना शासकीय रुग्णवाहिकेचे मधून रुग्णालयात दाखल केले जात आहे. आज उस्मानाबाद येथील शिवाजी महाराज पुतळा चौकामध्ये विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांच्या रॅपिड टेस्ट केल्या. त्यामध्ये बरेच नागरिक हे बाधित असल्याचे आढळले.



Tuesday, 20 April 2021

ऑनलाइन शिक्षण; विद्यार्थ्यांच्या ‘मानगुटीवर ?

 ऑनलाइन शिक्षण; विद्यार्थ्यांच्या ‘मानगुटीवर ?

                    कोरोंना काळात शाळा बंदचा परिणाम
                   मान , मणका, डोळे यांच्या व्याधीत वाढ ; 
                       पाल्य मोबाईल गेमच्या आहारी



विक्रांत उंदरे  -

वाशी :- राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे शाळा,महाविद्यालये,कोचिंग क्लासेस बंद करण्यात आले. दरम्यानच्या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात आला. मात्र या पद्धतीतून बहुतांशी पाल्यांना शारीरिक व्याधी जडत असल्याचे निदर्शनास येत आहे. पाल्यांना मान, पाठीचा कणा, डोळे यांचे त्रास सुरू झाले असून पाल्यांना आता मोबाईलची सवय जडत आहे. त्याचबरोबर मोबाईल च्या वापराचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शरीरावर तसेच बालमनावर ही होत असल्याचे पालकाकडून संगितले जात आहे. 
कोरोंनाचे संक्रमण झपाट्याने होऊन रुग्णसंख्याचे आकडे दिवसेदिवस वाढत आहेत. कोरोंनाला प्रतिबंधीत उपाययोजना म्हणून गत वर्षी लॉकडाउन आणि यावर्षी राज्यभरात कडक निर्देशांसह संचारबंदी लागू करण्यात आली. शाळकरी मुले , महाविद्यालईन तरुण तरुणी यांना कोरोंनाची बाधा होऊ नये व कोरोंनाचे संक्रमण रोखले जावे म्हणून शासनाकडून शाळा,महाविद्यालये,कोचिंग क्लासेस बंद करण्यात आले. या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ‘ऑनलाईन शिक्षण’ या पर्यायाचा अवलंब करण्यात आला. मात्र हाच ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग विद्यार्थ्यांना घातक ठरत असून येणार्याी काळात विद्यार्थ्यांना शारीरिक व्याधी व मानसिक तानतनाव देत आहे. अभ्यासाच्या नावाखाली विद्यार्थी मोबाइल वापरत असून अभ्यास करून फावल्या वेळेत मोबाईलवर गेम खेळत असल्याचे निदर्शनास येत आहेत. परिणामी पाल्य मोबाईलच्या अधीन झाले असल्याचे पालकाकडून सांगन्यात येत आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरू होण्यागोदर आपला पाल्य मोबाइलवर गेम खेळत बसेल म्हणून पालक आपल्या पालांच्या हातात मोबाईल देत न्हवते.  मात्र आता अभ्यास करायचं आहे, शाळेचा क्लास आहे, कोचिंग क्लास आहे,  असे कारण पाल्याकडून संगितले जाते मग पालकांचा ईलाज संपतो आणि आभ्यासासाठी म्हणून मोबाईल दिला जातो. क्लास संपल्यानंतर पाल्याकडून पालकांना मोबाईल माघारी दिला जात नाही. यामध्ये पालकांना अभ्यास सुरू असल्याचा समज राहतो.  काही वेळा तर मुले पालकांचे लक्ष चुकवून गेम खेळत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी अभ्यासाच्या नावाखाली विद्यार्थी मोबाईलच्या आधीन होत चालली आहेत. 

“ विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर आणि मनावर परिणाम :- 
 मान खाली घालून मोबाइल वर अभ्यास करणे यामुळे मान आणि मनक्यावर तान येतो याच बरोबर एकटक मोबाइल कडे पाहणे यमुळे डोळ्यावर दुष्परिणाम नाकारता येत नाहीत. याच बरोबर अभ्यास झाल्यावर पाल्याकडून मोबाइल माघारी घेतल्यावर पाल्याकडून चीड-चीड करण्यात येते परिनामी पाल्याचा स्वभावही रागीट होत आहे. शिक्षणामद्धे खंड पडू नये म्हणून ऑनलाईन शिक्षण हा योग्य पर्याय असला तरी त्याचा प्रतिकूल परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर आणि मनावर होण्याची भीती पालकांकडून व तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.”  

“बौद्धिक, शैक्षणिक, शारीरिक, मानसिक नुकसान :-  कोरोंना काळात शाळा बंद होऊन ऑनलाइन शिक्षण सुरू झाले मात्र हे शिक्षण शाळा नाही शिक्षण नाही तरीही विद्यार्थी पास होऊन पुढक्या वर्गात उडी मारली. परिणामी ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्याचे बौद्धिक, शैक्षणिक, शारीरिक, मानसिक नुकसान होत असून ऑनलाइन शिक्षण फायद्याचे की तोट्याचे ? याचे उत्तर शोधावे लागणार आहे.”

“ सकाळी शाळेकडून मुलासाठी मोबाईलवर व्हिडिओ, पिडीएफ आशा स्वरुपात आभ्यास पाठवला जातो. तो करण्यासाठी मोबाईलची गरज पडते. आभ्यासासाठी मुलांना मोबाईल दिला असता मुलाकडून आभ्यास सुरू आहे की नाही सतत पाहणे शक्य होत नाही. बर्याोचदा मुले आभ्यास झाल्यावर गेम खेळताना दिसतात. मग त्यांना मोबाईल द्यायचा का नाही ? असाच प्रश्न पडतो आशा भावना पालकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.”
“ऑनलाइन शिक्षणात उजळणी , बराखडीचा  विसर :- शाळा बंद पण ऑनलाइन शिक्षण सुरू अशी स्थिति कोरोंनाच्या काळात आहे. या हायटेक शिक्षणात विद्यार्थ्यांना चक्क बाराखडी आणि उजळणीचा विसर पडला आहे. शाळेत विद्यार्थी समूहात पाठांतर घेऊन प्रत्यक्ष दिले जात असलेले शिक्षणच प्रभावी ठरत होते. पहिली दुसरीच्याच वर्गात विद्यार्थ्याकडून शिक्षक उजळणी , बराखडी मुखोद्गोत करून घेत होते. आता मात्र या हायटेक शिक्षणात पाठांतर हेच अडगळीला पडले आहे.”

“मोबाईल नेटवर्क नाही त्या गावात ऑनलाइन शिक्षणाचे तीन तेरा :- आजही  बहुतांशी खेड्यापाड्यात मोबाईलला रेंज नसते. त्या गावातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची स्थिति तर अत्यंत भयावह आहे. गावात मोबाईलला रेंजच नसल्याने शिक्षकांनी पाठवलेला अभ्यास विद्यार्थ्यांना पोहोचतच नाही. त्यामुळे अशा खेड्यातील विद्यार्थीचे शिक्षण तर वार्याठवरच आहे. त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात? याचे उत्तर अधांतरीच आहे.”

“विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास करताना त्यांनी शैक्षणिक एप्लीकेशन वगळता  इतर अनावश्यक गेम एप्लीकेशन, वेब ब्रौझर यासह इतर कंटेट न पहावेत यासाठी अद्यावत मोबाईल मध्ये काही सेटिंग्स बदलून अनावश्यक एप्लीकेशन वापरण्यावर निर्बंध लावता येतात जेणेकरून मुले मोबाईल मधीत गेम व सोशल मीडिया च्या एप्लीकेशन पासून दूर राहतील व केवळ शैक्षणिक अभ्यासासाठीच मोबाईल च उपयोग करतील.”

“कोविड-19 च्या या  प्रादुर्भावाच्या काळात शिक्षण न थांबण्यासाठी ऑनलाईन शिक्षण पद्धती गरजेची आहे. ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम विद्यार्थ्याच्या डोळ्यावर,माणेवर आणि मन या तीन गोष्टीवर प्रामुख्याने होत आहे. याचे प्रतिकूल परिणाम टाळन्यासाठी  शैक्षणिक विडिओ पाहताणा 10 मिनिटानंतर व्हिडिओ थांबवून ब्रेक घ्यावा, एकटक मोबाईल कडे न पाहता डोळ्यांची उघड झाप करत रहावी, माणेचे आणि मणक्याचे  व्यायाम करावेत. यासह मानसिक तानतनाव टाळन्यासाठी हेलिंग म्युझिक ऐकावे व एकाग्रतेने  केलेल्या आभ्यासाचे चिंतन करणे गरजेचे आहे. – 
                     डॉ. कपिलदेव पाटील, वैद्यकीय अधीक्षक , 
                     ग्रामीण रुग्णालय, वाशी ”

आश्रमशाळा शिक्षकांच्या वेतन राम भरोसे

   आश्रमशाळा शिक्षकांच्या वेतन राम भरोसे

शिक्षकांचे वेतन एक तारखेलाच करा अशी मागणी

  सध्या कोरोनाच्या काळात तरी वेतन व्हावे -  कास्ट्राईब 




उस्मनाबाद,
समाजकल्याण विभागांतर्गत येणाऱ्या निवासी आश्रम शाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन हे वेळेत न होण्याची ही पहिलीच वेळ नसून तो एक अलिखित नियमच बनला आहे. व सातत्याने दरमहा असाच अन्याय प्रशासनाकडून दप्तर दिरंगाईमुळे आश्रम शाळा कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे.
यापूर्वीही अनेक वेळा जिल्हाधिकारी यांना निवेदने दिली - बैठका झाल्या, आमदार-खासदारांच्याही शिफारशी दिल्या परंतु यात कसलाही बदल प्रशासनाने केला नाही. वेतन दिरंगाई नित्याने चालू ठेवली आहे असे कास्ट्राईब संघटनेचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. या आशयाचे निवेदन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व समाज कल्याण मंत्री सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्यामार्फत देण्यात आले होते मात्र दर महिन्याला असे निवेदने देऊन व संबंधित कार्यालयाचे खेटे मारूनही
वेळेत  वेतन होत नाही. सध्याच्या लॉकडाउनच्या काळामध्ये अशा आश्रमशाळांमधील शिक्षक, व त्यांचे नातेवाईक कोरोना बाधित असल्यामुळे उपचार घेत आहेत. ते जीवन-मरणाच्या उंबरठ्यावरती असताना त्यांना क्षणोक्षणी आधार व आर्थिक नियोजन करताना नाकीनऊ येत आहेत. तरीही याबाबत प्रशासन व संबंधित विभाग गांभीर्याने घेत नाही हे स्पष्टपणे दिसते.


                                                                                    
संबंधित विभागाशी यासंदर्भात संपर्क केला असता  " सदर आश्रम शाळेचा वेतन विलंबाचा प्रश्न  मंत्रालय स्तरावरून होत आहे. अनेक वेळा समाज सेवार्थ पोर्टल मध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे वेतन होण्यास विलंब होतो. त्याच बरोबर या  वेतनाचे बजेटची उपलब्ध होण्यावर अवलंबून राहते. बऱ्याच आश्रमशाळा या वेळेस बजेट सादर करत नाहीत" असे उत्तर मिळते .   - 







प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे आमचे वेतन वेळेत होत नाही आणि यामुळे कर्मचाऱ्यांनी काढलेले कर्जाचे हप्ते नियमित भरले जात नाहीत परंतु त्याचा ज्यादा फटका दंड व्याजाच्या स्वरूपात आम्हाला बसत आहे आणि हप्ते वेळेत भरल्यामुळे आमचे बँकेतील सिविल खराब होत आहे आणि यामुळे आम्हाला कोणतीही बँक नवीन कर्जही देण्यास तयार होत नाही अशामुळे आम्हाला खासगी सावकाराकडे धाव घेण्याची वेळ येत आहे त्यामुळे प्रशासनाने आमच्या व्यथा समजून घेऊन आम्हा आश्रम शाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडे सहानुभूतीने पाहून न्याय द्यावा. आणि इतर विभागाप्रमाणे आमच्याही विभागाचे मिळतं हे एक तारखेलाच होईल असे करावे.

सतीश कुंभार
आश्रम शाळा प्रतिनिधी. कास्ट्राईब उस्मानाबाद

आत्महत्याग्रस्त मनोज झेंडे यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात.


आत्महत्याग्रस्त मनोज झेंडे यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात.

 उस्मानाबाद ,


तालुक्यातील सांजा गावातील नाभिक समाजातील आत्महत्या ग्रस्त मयत कै. मनोज झेंडे यांच्या कुटुंबियांना आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीने मदतीचा हात म्हणून आर्थिक मदत केली गेली ,यावेळी राजसिंहा राजेनिंबळकर जिल्हाध्यक्ष भाजयुमो ,महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने ,मुकुंद बापू सूर्यवंशी ,संघटक किशोर राऊत ,मराठवाडा  उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पंडीत,शहर अध्यक्ष व्यंकट पवार व झेंडे कुटुंबिय तसेच  समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष खालील पठाण यांचे वतीने उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे मागणीचे निवेदन

अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष खालील पठाण यांचे  निवेदन


उस्मानाबाद / प्रतिनीधी 



उस्मानाबाद - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष खालील पठाण यांचे वतीने उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे मागणीचे निवेदन दिले.

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने उपायोजना म्हणून रेमडेसिव्हीर इंजेक्शन , ऑक्सीजन व बेड तात्काळ जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली. 

 सध्या उस्मानाबाद जिल्ह्या हा महाराष्ट्र प्रथम स्थानावर आहे कोरोना या रोगाने थैमान घातले असल्याने उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसेंदिवस पेशंटची संख्या वाढत आहे , त्यामुळे जिल्हा रूग्णालयासह खाजगी रूग्णालयात रेमडेसिव्हीर इंजेक्शन , ऑक्सीजन कमतरता आहे बेड उपलब्ध नाही कोरोना लस संपली असुन पॅरासिटेमॉल व कॅल्शियम औषध वगळता औषधसाठा नाही , यासह डॉक्टर स्टाफ अपुरी संख्या व अन्य समस्या कायम आहेत . तरी साहेबांना विनंती की , उस्मानाबाद जिल्ह्यात शासकिय रूग्णालयामध्ये तात्काळ बेड , ऑक्सीजन , रेमडेसिव्हीर इंजेक्शन , डॉक्टर स्फाट व कर्मचारी तसेच औषध साठा इ . ची तात्काळ ठोस उपाययोजना करून त्यावर योग्य तो निर्णय झाला पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी पार्टी चे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष खलील पठाण यांचे वतीने करण्यात आली...

Monday, 19 April 2021

ऑक्सिजनचा प्रश्न सोडविण्यासाठी आणखीन चार प्लांट उभे करणार ---पालकमंत्री गडाख

 


            उस्मानाबाद,दि .19 जिल्हयात कोरोनाचा उद्रेक वेगाने होत असल्याने माझे  कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन आजारी व्यक्तींचा  शोध घ्यावा व तातडीने  त्यांच्यावर उपचार करण्याची कारवाई सुरू करावी म्हणजे  मुख्यमंत्री यांचे या आवाहनाला यशस्वी करणे  शक्य होईल ,असे प्रतिपादन मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री शंकरराव गडाख . यांनी आज  येथे केले .  उस्मानाबाद जिल्हयात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर सद्यास्थितीचा आढावा आणि उपाय योजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात  आयोजित बैठकीत ते  बोलत होते.

          यावेळी खासदार ओमप्रकाश निबांळकर,आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास घाडगे-पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड, अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. डी. के.पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी हनुमंत वडगावे, जिल्हा पुरवठा अधिकारी चारूशिला देशमुख आदी उपस्थित होते.

          पालकमंत्री  म्हणाले , की रुग्णांची वाढती संख्या आणि संसर्गला आळा घालण्यासाठी लिक्विड ऑक्सिजन संख्या वाढवणे अत्यंत आवश्यक आहे- त्यासाठी प्रशासनाने आणखी चार ठिकाणी लिक्विड ऑक्सिजन प्लांट लवकर उभारण्यासाठी पूर्ण वेगाने काम करावे जिल्हयातील रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा होणे आणि ऑक्सिजन युक्त खाट उपलब्ध करण्यासाठी जिल्हयातील सर्व तालुक्यामध्ये लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्याची  नितांत गरज आहे.रुग्णांना रेमडेसीवीर इंजेक्शनपेक्षाही जास्त गरज ऑक्सिजनची  आहे .

 वेळेत आणि पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळाल्याने रुग्णांचे आयुष्य वाचविण्यास मदत होईल त्यामुळे हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या ऑक्सिजन  जनरेशन प्लांट उभारण्यासाठी  प्रशासनाने मागणी प्रस्ताव तातडीने सादर करावा,असे निर्देशही मंत्री श्री . गडाख यांनी   यावेळी दिले .

          रेमडेसीवीर हे इंजेक्शन म्हणजे अमृत नाही .  त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी या औषधीसाठी गरज नसतांना मागणी करू नये ,  अथवा यासाठी सर्वत्र पळापळ करू नये , डॉक्टरांनी प्रमाणीत केल्याशिवाय रेमडेसीवीर कोणलाही मिळणार नाही याची नोंद घ्यावी असेही पालकमंत्री श्री  गडाख यावेळी म्हणाले . प्रशासन आणि आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी खाजगी रुग्णालयांना कोविड नियमावलीचे पालन करण्याबाबत निर्देशित करण्याबाबतही सुचना केल्या-रेमडेसीवीर इंजेक्शन गंभीर रुग्णांना प्राधान्याने गरजेनुसार दिला जात आहे . याची शहनिशा खासगी रुग्णालयातील नियुक्त  नोडल अधिकाऱ्यांनी करणे अपेक्षित आहे . तसेच डॉक्टरांनी सुध्दा आवश्यक असेल तेव्हाच या इंजेक्शनचा उपयोग करावा , असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

          या महामारीला आटोक्यात आणण्यासाठी वेळेत कोरोना बाधितांची ओळख  पटणे आवश्यक आहे. यासाठी उस्मानाबाद जिल्हयात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी  या मोहिमेचा तिसरा टप्पा सुरू करण्यात आला असून  जिल्हयातील आशा वर्कर, ग्रामसेवक आणि शिक्षकांच्या माध्यमातून सर्वेक्षणाच्या कामास सुरूवात करावी . घरोघरी जाऊन चाचण्या करावे, प्रत्येक कर्मचाऱ्याने किमान 50 लोकांच्या तपासण्या कराव्यात यामध्ये सुरूवातीला थर्मल स्कॅनर आणि ऑक्सिजनमीटर  व्दारे ताप आणि जर ऑक्सिजनचे प्रमाण तपासावे तसेच सर्दी आणि खोकला असलयास  आरोग्य कर्मचाऱ्यांकडून  त्याच्या RAT (रॅपिड ॲटीजन टेस्ट) अथवा RTPCR चाचण्या कराव्यात या मोहिमेत कोराना बांधित रुग्ण आढळल्यास त्या भागातील किंवा बांधितांच्या शेजाऱ्याच्या घरातल्या व्यक्तींच्याही चाचण्या घ्याव्यात आणि रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करण्याची कार्यवाही करावी,अशी सुचनाही पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी यावेळी केली.

          यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी   उस्मानाबाद जिल्हयाची कोविडची सद्यस्थिती मांडली . ते म्हणाले आजपर्यंत जिल्हयात 29 हजार 532 कोरोना बांधित रुग्ण आढळले असून 5 हजार 882

रुग्णांवर  उपचार सुरू आहे. 22 हजार 966 रुग्णं बरे होऊन घरी गेले तर 684 जणांचा मृत्यू  झाल्याचे त्यांन सांगितले . रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77.8 आहे रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण 38.5 असून जिल्हयात एकुण रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण 2.3 आहे 684 मृतां पैकी 520


पुरूष 164 महिलांचा समावेश आहे.त्यात 487 रुग्णं  हे 60 वर्षापेक्षा जास्त  वयाचे होते.असेही जिल्हाधिकारी  दिवेगावकर यांनी नमूद केले. मृतांमध्ये उस्मानाबाद तालुक्यातील 352, तुळजापूर येथे 75 उमरगा येथील 70 कळंब तालुक्यातील 57 परंडा तालुक्यातील 49, भूम तालुक्यातील 34 वाशी येथील 31 आणि लोहारा तालुक्यात 16 जणांचे उपचार दरम्यान  मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली.आतापर्यंत जिल्हयात 1 लाख 90 हजार 774 लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्या असून त्यापैकी 69 हजार 271 RT-PCR आणि 1 लाख 21 हजार 503 RAT  टेस्ट घेण्यात आले

          जिल्हयात 9 डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल (DCH),15 डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरर्स आणि 29 कोविड केअर सेंटर्स आहेत.असे एकुण 53 इन्सीटिटयुर मध्ये 3 हजार 831 आयुसेलेशन खाटा 1 हजार 35 ऑक्सिजन युक्त खाटा 226 अतिदक्षता आणि 160 हेंटीलेटरर्स उपलब्ध असल्याचे ते म्हणाले ऑक्सिजन खाटांची वाढती आवश्यकता लक्षात घेता शासकीय रुग्णांलयात आणखीन 200 ऑक्सिजन युक्त खाटांचे काम प्रगतीपथावर असून तुळजापूर येथील भक्त निवास येथेही 50 बेडर्स तसेच जिल्हयातील 44 ग्रामीण रुग्णांलयात 300 ऑक्सिजन उपलब्ध असलेल्या खाटांचे नियेाजनही प्रशासनामार्फत करण्यात येत असल्याचे दिवेगाकर म्हणाले,

          कोरोना लसीकरणाबाबत माहिती देताना  जिल्हाधिकारी म्हणाले की, 16 जानेवारी 2021 पासून जिल्हयात लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली.एकूण-93 केंद्रावर लसीकरणाचे कार्य सुरु आहे- . यामध्ये शासकीय 85 तर प्रधानमंत्री जनारोग्य योजना अधिस्वीकृत 8 केंद्राच्या माध्यमातून लसीकरण करण्यात येत आहे.जिल्हयातील आरोग्य सेवक,फ्रंटलाईन वर्कर ..आणि 45 वर्षापेक्षा जास्त वय असलेले एक लाख 6 हजार 322 लोकांना पाहिला डोस देण्यात आले तर 21 हजार 665 जणांनी दुसरी लासही घेतली आहे.जिल्हयाला मिळालेल्या लसींपैकी 12050 लसी शिल्लक असून अधिक 25 हजार लसींची आवश्यकता असेल असेही जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी यावेळी नमूद केले. तत्पूर्वी पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी तामलवाडी येथील ऑक्सिजन प्लांटची पाहणी केली यावेळी त्यांच्या सोबत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड व कर्मचारी    उपस्थित होते.यावेळी त्यांनी ऑक्सिजन प्लांट बाबत माहिती घेतली आणि आवश्यक सूचनाही केल्या.